Shivrajya Sena

Shivrajya Sena Shivrajya Sena, Barshi

स्वातंत्र्याचा क्रांतिकारी इतिहास..!हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचा इतिहासातुन भारतीयांचा मनावर पध्दतशीरपणे बिंबवलं गेलंय...
15/08/2026

स्वातंत्र्याचा क्रांतिकारी इतिहास..!

हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचा इतिहासातुन भारतीयांचा मनावर पध्दतशीरपणे बिंबवलं गेलंय की भारताला स्वातंत्र्य अहिंसेने मिळाले आहे... वास्तविक भारतीय स्वातंत्र्याची सुरवात ही 1857 च्या रक्तरंजित उठवातून झाली...राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, बहादुरशहा जफर,तात्या टोपे, कुवरसिंह व इतर संस्थानिकांनी उभा केलेल्या सशस्त्र लढ्याने देशात राष्ट्रीय भावना उत्पन्न केली..लढा अयशस्वी ठरला पण हिंदुस्थानी लोकांच्या झुंजार पराक्रमाने बलिदानाच्या इतिहासाला झळाळी दिली..पुढे त्याला लोकमान्य टिळक यांच्या जहाल विचारातून काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली...लोकमान्य टिळकांच्या क्रांतिकारी विचारांमुळे अनेक तरुण क्रांतिकार्यात सहभागी झाले..पुढे रासबिहारी बोस, लाला लजपतराय, बकीनचंद्र पाल, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी हा जहाल विचार पुढे चालवला वाढवला...शस्त्रास आता शस्त्राने उत्तर विचारातून देशातील लाखो तरुण क्रांतिकार्यात सहभागी झाले..

खुदिराम बोस यांच्या बलिदानापासून सुरू झालेली शहिदांची क्रांतिकारी चळवळ...चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू,बटूकेश्वर दत्त हे देशाच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले..चापेकर बंधूंनी केलेली रँडची धाडसी हत्या क्रांतिकारकांसाठी प्रेरणा ठरली...अनंत कण्हेरे यांनी जॅक्सनचा वध करुन असंतोषाला वाट करून दिली..पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीचे राष्ट्रीय नेतृत्व बनले..हजारो सैनिकांची आझाद हिंद फ़ौज उभा करून त्यांनी हिंदुस्थानचा काही भाग काबीज केला..या क्रांतीलढ्यात हजरो तरुण फाशीवर गेले..असंख्य तरुण बंदिवासात खितपत शहिद झाले...

भारतमातेच्या स्वातंत्र्यसाठी हजारो तरुणांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घातला...असंख्य कुटुंब उध्दवस्त झाले..

देशाला स्वातंत्र्य अहिंसेने मिळले तर क्रांतिकारक फाशीवर कुणासाठी गेले??

क्रांतिकारकानी छातीवर गोळ्या कुणासाठी झेलल्या??

स्वातंत्र्याच श्रेय ठराविक लोकांना देणे हा क्रांतिकारकांवर अन्याय नाही का??

यापुढे देशाला स्वातंत्र्य हे अहिंसेने नाही तर बलिदानाने दिले असे अभ्यासक्रमात शिकवावे ही शिवराज्य सेनेची सरकार कडून अपेक्षा🙏🏻

वंदे मातरम... राष्ट्र प्रथम🇮🇳

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन...
01/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन...

हिंदुत्वाचा विवेक🔥शिवराज्य सेनेचे निष्ठावान सदस्य, कट्टर शिवभक्त, हिंदुत्वनिष्ठ व्यक्तिमत्वमा.विवेकजी भागवत आपणास वाढदिव...
21/06/2026

हिंदुत्वाचा विवेक🔥

शिवराज्य सेनेचे निष्ठावान सदस्य, कट्टर शिवभक्त, हिंदुत्वनिष्ठ व्यक्तिमत्व
मा.विवेकजी भागवत आपणास वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा...

शिवराज्य सेना🚩

Vivek Aravind Bhagavat

शिवराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
20/06/2026

शिवराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!

भावपूर्ण श्रद्धांजली..!आपल्या बार्शीचे माजी आमदार, ज्येष्ठ सहकार नेते किसनराव नानासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन.१९७८ साल...
12/06/2026

भावपूर्ण श्रद्धांजली..!

आपल्या बार्शीचे माजी आमदार, ज्येष्ठ सहकार नेते किसनराव नानासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन.

१९७८ साली विधानसभा निवडणुकीत विजयी होत त्यांनी बार्शीच्या जनतेचे नेतृत्व केले. बार्शी तालुका पंचायत समितीचे सभापती तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी ग्रामीण विकास, सहकार आणि जनहितासाठी उल्लेखनीय कार्य केले.

शोकाकुल- शिवराज्य सेना, बार्शी

सुवर्णसोहळा 💫दुर्गराज राजधानी किल्ले रायगड 🔥
06/06/2026

सुवर्णसोहळा 💫

दुर्गराज राजधानी किल्ले रायगड 🔥

🔥श्री शिवराज्याभिषेक दिन🔥संपुर्ण हिंदुस्थान परकीय सत्तांच्या विळाख्यात अडकलेला असताना शिवप्रभुंनी मर्द मराठ्यांच्या सोबत...
05/06/2026

🔥श्री शिवराज्याभिषेक दिन🔥

संपुर्ण हिंदुस्थान परकीय सत्तांच्या विळाख्यात अडकलेला असताना शिवप्रभुंनी मर्द मराठ्यांच्या सोबतीने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकुन हिंदवी स्वराज्याचे शिवधनुष्य पेलले..⚔

६ जुन १६७४ रोजी शेकडो वर्षींची गुलामी नेस्तनाभुत करून हिंदु पदपातशाही अर्थात हिंदवी स्वराज्य निर्माण झाली.. मराठ्यांचा राजा हिंदुस्थानाचा 👑छत्रपती👑 झाला..
पोरक्या झालेल्या मायभुमीला भुमीपुत्रांच "छत्र" मिळाले..

याच सुवर्ण दिवसाची महती समस्त समाजाला व्हावी यासाठी शिवराज्य सेनेकडुन शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो..यंदाचे हे १७ वे वर्ष आहे

तरी सर्व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक व अभिवादन करण्यासाठी उपस्थित रहावे

दिनांक - ६ जुन २०२६
सकाळी - १० वाजता
स्थळ - छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती, श्री शिवाजी कॉलेज बार्शी

🚩शिवराज्य सेना🚩Shivrajya Sena

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने हिंदूंची राजकिय सत्ता स्थापन केली...धर्मवीर संभाजी महाराज,  छत्रपती राजाराम...
31/05/2026

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने हिंदूंची राजकिय सत्ता स्थापन केली...धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांनी प्राणाची आहुती देऊन स्वराज्य वाढवले..पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात मराठी सैन्य संपूर्ण उत्तर भारतात आपली तलवार गाजवू लागली..शिंदे, होळकर,गायकवाड, पेशवे असे अनेक सरदारांनी संपूर्ण उत्तर भारतात मराठेशाहीचा धाक निर्माण केला..देशभरात मुघलांना शह देऊन हिंदवी स्वराज्य विस्तारले जात होते..राजकीय सत्ता एका पाठोपाठ मराठ्यांच्या पराक्रमाने हातात येत होत्या..

हिंदवी स्वराज्य विस्तार करण्यात सिंहाचा वाटा असणारे थोर पराक्रमी मल्हारराव होळकर यांनी पुढे आपल्या सुनेला म्हणजे अहिल्यामाता होळकर यांना आपला राजकीय वारसा दिला..अहिल्यामातांनी आपल्या पराक्रमाने आणी कुशाग्र बुद्धिमत्ता यांच्या जोरावर उत्तर मध्य भारतात मराठेशाही बळकट केली..राजकीय विस्तार करताना त्यांनी सांस्कृतिक आक्रमणाला पण जोरदार प्रतिउत्तर दिले..हिंदू धर्मात अतिशय महत्व असणारे बारा ज्योतिर्लिंगांचा त्यांनी जीर्णोद्धार केला..हजारो मंदिरांचे पुनरुद्धार केले. .अनेक ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्या..राजमाता अहिल्यादेवी यांचे हिंदुस्थानचा इतिहासातील योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे..आज त्यांचा जन्मदिवस..राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना शिवराज्य सेनेतर्फे त्रिवार प्रणाम..!

जय जिजाऊ..जय अहिल्यामाता🚩

अन् पत्रकारांनीदेखील त्याग केला!जगातलं एकमेव असं उन्हात कठोर उपोषण चालु आहे बाजुला सर्व मिडीयाचे पत्रकारदेखील उन्हातच उभ...
30/05/2026

अन् पत्रकारांनीदेखील त्याग केला!

जगातलं एकमेव असं उन्हात कठोर उपोषण चालु आहे बाजुला सर्व मिडीयाचे पत्रकारदेखील उन्हातच उभे आहेत त्यांना विचारण्यात आलं तुम्हाला ऊन लागेल मंडप टाकुन द्यायचा का? तेव्हा ते म्हणले पाटिल उन्हात आहेत आम्हाला देखील मंडप नकोय...आम्ही देखील उन्हातच थांबणार!

Address

Barshi
413411

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivrajya Sena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shivrajya Sena:

Shortcuts

Share

Category