महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

  • Home
  • India
  • Belgaum
  • महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी तसेच सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी शाळा संवर्धन करण्यास कटिबद्ध..! "जय शिवराय" "जय महाराष्ट्र"

बेळगावमधील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य विकास मराठी संस्थेच्या वती...
04/08/2026

बेळगावमधील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य विकास मराठी संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी सर्वांचे स्वागत करून, युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, युवा समितीच्या वतीने मराठी शाळा टिकाव्या, पटसंख्या वाढावी यासाठी मागील नऊ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. शाळा टाकल्यानंतर मातृभाषा टिकणार आहे आणि मातृभाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकणार आहे. यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे, सरचिटणीस श्रीकांत कदम, आणि पदाधिकारी सुरज कुडुचकर, अक्षय बांबरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण यांसारख्या विविध क्षेत्रांत आपल्या अलौकिक कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे माजी राज्यपाल, शिक्षण महर...
04/08/2026

शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण यांसारख्या विविध क्षेत्रांत आपल्या अलौकिक कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे माजी राज्यपाल, शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून. त्यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेले कार्य पिढ्यानपिढ्या सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने देशाच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण       महाराष्ट्र एकीक...
03/08/2026

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कुप्पतटगिरी गावांतील मराठी प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
मराठी शाळा जगल्यावर मराठी भाषा टिकणार आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून मराठी शाळा वाचविण्यासाठी
कटिबद्ध राहिले पाहिजे असे
सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
मा.ग्रामपंचायत सदस्या आणि तथा सी. ए. पद्मश्री पाटील यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे व युवा कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
गेल्या नऊ वर्षांपासून युवा समितीच्या माध्यमातून सीमाभागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हा उद्देश ठेवून हा उपक्रम राबविण्यात येतो.
यावेळी विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण उपस्थितीतांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुप्पटगिरी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष गणपती मुतगेकर. उपाध्यक्ष गजानन पाटील आणि सदस्य शंकर पाटील, सारंग पाटील, विश्वनाथ बुवाजी, कल्लाप्पा पाटील, गोपाळ पाटील, शंकर पाटील, भाऊ पाटील, निळकंठ मुतगेकर, गोविंद पाटील आणि पल्लवी पाटील मुख्याध्यापिका वंदना पाटील आणि इतर शिक्षकवर्ग महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापुरचे कार्यकर्ते श्री पाटिल, शुभम कांबळे, लक्ष्मण भातकांडे, सुदेश घाडी, पराशरराम पाटील,मुकेश गुरव, आदित्य कांबळे,साईनाथ मळीक, कृष्णा खांबले , श्रीहरी पाटील, तुषार देसाई आणि प्रज्योत पाटिल आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, खानापुर
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगांव

01/08/2026
01/08/2026
31/07/2026

अंकलिपी मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य! 😊📚

विद्यानिकेतन, बेळगाव येथे आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अंकलिपी हाती पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. 👍🏻

सदाशिवगड कारवारचे रहिवासी, कोंकणी कवी, लेखक व नाटककार. युवा समितीचे हितचिंतक *श्री संदेश श्रीकांत बांदेकर* यांनी आपल्या ...
27/07/2026

सदाशिवगड कारवारचे रहिवासी, कोंकणी कवी, लेखक व नाटककार. युवा समितीचे हितचिंतक *श्री संदेश श्रीकांत बांदेकर* यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी मदत युवा समितीकडे सुपूर्द केली आहे,
*श्री संदेशदादा* यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
आणि धन्यवाद💐💐💐
🙏🏻🚩🚩🙏🏻

Address

Belgaum
590006

Telephone

+917795800448

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव:

Shortcuts

Share