09/09/2021
नगर परिषद भद्रावती
पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा
महाराष्ट्रात साजरा केल्या जाणाऱ्या घरगुती गणेश उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. या उत्सवातून कौटुंबिक स्नेह जसा वृद्धिंगत होतो तसे सामाजिक बांधिलकीतून देश प्रेमाची भावना निर्माण होईल, देशाप्रती असणारी राष्ट्रनिष्ठा सामाजिक जाणीवा प्रखर करेल याची पक्की खुणगाठ बांधत लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेचा अंगार फुलवण्यासाठी या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. त्याच प्रमाणे वर्तमानात आपण सर्वानी बदलत्या हवामानाची, बदलत्या ऋतुचक्राची दखल घेण्यासाठी हा गणेश उत्सव पर्यावरणस्नेही साजरा करणं आणि माझी वसुधंरा पर्यावरणपुरक गणेशउत्सवाची लोकचळवळ उभी करणं ही बदलत्या काळाची गरज आहे.
त्याअनुषंगाने नगर परिषद भद्रावती मार्फत माझी वसुधंरा पर्यावरणपुरक गणेशउत्सव अशी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.त्यातील अति शर्ती खलील प्रमाणे-
1.बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीची, धातूची किंव्हा ज्या मूर्तीमुळे निसर्गाला हानी होणार नाही अशी असावी, मूर्तीवरील रंग पर्यावरण पूरक असावी.
2.सजावट पानं फुलांनी करण्यात यावी प्लास्टिक व थर्माकोलचा अजिबात वापर करण्यात येऊ नये.
3.सार्वजनिक मंडळामार्फत आजूबाजुचा परिसरात स्वच्छता करण्यात यावी.
4.दरम्यान कोविड-19 च्या सूचनांचे पूर्णपणे पालन करून पर्यावरण विषयक, आरोग्य विषयक कार्यक्रम घेण्यात यावे उदा. वृक्ष रोपण, स्वच्छता अभियान, रोगनिदान शिबिर,रक्तदान शिबिर इत्यादी.
5.ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी.
6.प्रार्थना व आरती दरम्यान सर्व धर्म समभावाची प्रेरणा मिळेल असे नियोजन करण्यात यावे.
7.ध्वनी प्रदूषण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात यावी.
8.महाप्रसाद वितरण प्रमाणेच गरीब गरजूंना वह्या पुस्तक वाटप करण्यात यावे.
9.बाप्पांचे विसर्जन कमीत कमी जल्लोषात व पर्यावरण पूरक करण्यात यावे.
10.बाप्पाच्या पूजेतील निर्माल्य नदीत, तलावात न टाकता त्यापासून सेंद्रिय खत निर्माण करण्यात यावे किंवा न.प ला देण्यात यावे.
वरील प्रमाणे अटींची पूर्तता करून आपल्याकडून सुद्धा नवनवीन उपक्रम राबवून त्याचे फोटो, व्हिडीओ व स्पष्टीकरण सोबत दिलेल्या लिंकवर टाकण्यात यावीत.
https://forms.gle/6c5TN4zdBtLetQK37
3 सार्वजनिक गट
3 घरगुती गट
विजेत्यांना न.प. मार्फत आकर्षक बक्षिसे देण्यात येईल ....
अधिक माहितीसाठी स्वच्छ सर्वेक्षण विभाग न.प.भद्रावती येथे भेट दयावी