31/12/2025
लाखनी तालुक्यातील सेलोटी गावचे सुपुत्र व नागपूर येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे सर यांचे आकस्मिक निधन अत्यंत दुःखद आहे.
मेंदूशस्त्रक्रियेतील अपूर्व कौशल्य, रुग्णांप्रती असलेली करुणा व त्यांचा नम्र, सेवाभावी स्वभाव यामुळे ते वैद्यकीय क्षेत्रासह समाजमनात सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने समाजाने एक कर्तव्यनिष्ठ व संवेदनशील सेवक गमावला असून, अनेक रुग्णांच्या आयुष्यात त्यांनी पेटवलेला आशेचा दीप सदैव तेवत राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तस्वकीयांना लाभो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ॐ शांती । शांती । शांती ।
#भावपूर्ण_श्रद्धांजली #श्रद्धांजली