29/01/2024
लाखनी तालुका व शहर महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी महिला मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सौ. मंगलाताई नानाभाऊ पटोले, यांच्या प्रमुख उपस्थितीत कच्ची मेमन हॉल लाखनी येथे संपन्न झाला.
मकरसंक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव आहे.
नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, यांचे यथाशक्ती या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तीळगूळ देतात. सुवासिनी हळदी–कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात. असे मार्गदर्शन सौ. मंगलाताई पटोले यांनी उपस्थित महिला भगिनींना केले.
मराठी-हिंदी गाणी, विनोद, गप्पा या माध्यमातून महिला भगिनींनी धमाल करत कार्यक्रमाचा आनंद लुटला. दररोजच्या कामातून आवर्जून वेळ काढून आलेल्या भगिनींना या कार्यक्रमामुळे जणू एक नवी ऊर्जाच मिळाली.
यावेळी पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला होता. महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संगीत खुर्ची आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलां मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती राहिली.
यांच्यासह सभापती सौ. स्वातीताई वाघाये, भंडारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. जयश्रीताई बोरकर, लाखनी प. स. सभापती सौ. प्रणाली सार्वे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनिषाताई निंबार्ते, जिल्हा परिषद सदस्या सौ. विद्याताई कुंभरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिताताई कापसे, लाखनी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. पुष्पाताई डुंभरे, लाखनी शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. कल्यानीताई भिवगडे, सौ. योगिताताई झलके सदस्या पंचायत समिती लाखनी, सौ. मनिषाताई हलमारे सदस्या पंचायत समिती लाखनी, सौ. अश्विनीताई कान्हेकर सदस्या पंचायत समिती लाखनी, सौ. सुचिता आगाशे आणि लाखनी तालुक्यातील अनेक मान्यवर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Nana Patole