Bhandara District Congress Committe SC Dept.

Bhandara District Congress Committe SC Dept. Official page of Bhandara District Congress Committee SC Dept.

19/03/2022

नफ़रत फैलाने वाली फ़िल्में Tax free हो रही हैं और पढ़ाई, दवाईयों, Oxygen और यहाँ तक कि कफ़न तक पर जीएसटी लग रहा है।
स्वागत है आपका विश्वगुरु भारत में 🌶️

11/12/2017
भंडारा नगर परिषदे कडून घर टॅक्स मध्ये करण्यात आलेली अवाढव्य करवाढ तत्काळ कमी करण्यात यावेभंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीची ...
29/11/2017

भंडारा नगर परिषदे कडून घर टॅक्स मध्ये करण्यात आलेली अवाढव्य करवाढ तत्काळ कमी करण्यात यावे
भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीची मागणी * आंदोलनाचा इशारा
(भंडारा) नगर परिषदे द्वारे घर टॅक्स मध्ये फेरमूल्यांकन करून मालमत्ता कर ,वृक्ष कर ,अग्निशामन कर ,शिक्षण कर इत्यादी वर तीन ते चार पटीने किमती वाढवून एकप्रकारे शहरातील नागरिकांच्या खिशाला चुना लावण्याचा गोरखधंधा उचलला जात आहे . घर टॅक्स मध्ये जि वाढ केली ती फार मोठ्या प्रमाणात असल्याने ती कमी करून पूर्ववत करण्यात यावे अन्यथा नगर परिषदेचे शासन व प्रशासनाच्या विरोधात कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल अशा इशारा जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आज मुख्याधिकारी यांना निवेदना द्वारे नगर परिषद कार्यालय येथे देण्यात आला .
भंडारा नगर परिषदे द्वारे सन २०१७ ते १८ मध्ये फेरमूल्यांकन करून शहरातील सामान्य नागरिकांना घर टॅक्सचे बिले पाठविली त्यात मालमत्ता कर ,वृक्ष कर ,अग्निशामन कर ,शिक्षण कर यात पूर्वीच्या किमतीपेक्षा तीन-चार पात अधिक कर आकारण्यात आले .ज्या नागरिकाकडे ४००/- रु. घर टॅक्स यायचे त्यांना आता १४००/- रुपये घर टॅक्सचे बिल पाठविले आहे .हे एक प्रकारे अन्याय करणारे आहे व सर्व सामान्याना न परवडणारे आहे.एकदम एवढया मोठ्या प्रमाणात घर टॅक्स आकारणी केली .ती सामन्य नागरिक देवू शकत नाही .ज्या प्रमाणे कर वाढवून घेतले जाते त्या प्रमाणे शहराचा विकास का होत नाही? ना पिण्याकरिता शुद्ध पाणी ,ना पार्किंग ,ना बगीचे ,ना शौचालय असा प्रश्न या वेडी उचलण्यात आला.एकीकडे शिक्षण करात वाढ केली मात्र नगर परिषद शाळा बंद पडत आहेत काही शाळा बंद पडल्या ,विध्यार्थी नाही ,मोडकळीस आलेल्या इमारती ,शैषणिक गरजा खालावलेल्या असतानाही शिक्षण करात पुन्हा वाढ अशा अनेक बाबी असतानी भंडारा नगर परिषदेने पुन्हा घर टॅक्स वाढ एकप्रकारे शहरातील नागरिकांच्या खिशातून लुटमार करण्याचा गोरखधंदा भंडारा न.प.ने चालविला आहे तो त्वरित बंद करावा अधिक आकारलेले घर टॅक्स खपवून घेतले जाणार नाही .व नवीन आकारणी करून पाठविलेले अवाढव्य अवाजवी बिल न.प.येथे भरण्यात येणार नाही .भंडारा न.प.चे शासन जि हुकुमशाही चालवत आहे ती खपवून घेतली जाणार नाही सामन्य नागरिकासाठी रस्त्यावर उतरण्यास जिल्हा कॉंग्रेस मागे पुढे पाहणार नाही अस इशारा यावेळी न.प.मुख्यधिकारी यांना देण्यात आला . शिष्टमंडळात माजी.जिप उपाध्यक्ष दिपक गजभिये ,माजी नगर सेवक धनराज साठवणे ,जिल्हा सचिव प्रशांत देशकर,अनु.जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष अजय गडकरी,अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अनिकजमा ,युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष कमलेश बाहे ,माजी नगर सेवक पृथ्वी तांडेकर ,जिवन भजनकर ,रवी येरकडे,टेकचंद मारबते ,संजय वरगणटीवार ,प्रकाश डोनेकर,अंबादास मंदुरकर,दिलीप देशमुख इत्यादि कॉंग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते .

तुमसर शहर  कॉंग्रेस कमिटीचे अनु.जाती विभागाचे अध्यक्ष शिव बोरकर यांनी संविधान वाचवा देश वाचवा हा कार्यक्रम संविधान दिनी ...
27/11/2017

तुमसर शहर कॉंग्रेस कमिटीचे अनु.जाती विभागाचे अध्यक्ष शिव बोरकर यांनी संविधान वाचवा देश वाचवा हा कार्यक्रम संविधान दिनी २६/११/२०१७ ला तुमसर येथे शहर कॉंग्रेस कार्यालयात पार पाडला

साकोलीतालुका कॉंग्रेस कमिटीचे अनु.जाती विभागाचे अध्यक्ष नरेश बेलेकर यांनी संविधान वाचवा देश वाचवा हा कार्यक्रम संविधान द...
27/11/2017

साकोलीतालुका कॉंग्रेस कमिटीचे अनु.जाती विभागाचे अध्यक्ष नरेश बेलेकर यांनी संविधान वाचवा देश वाचवा हा कार्यक्रम संविधान दिन २६/११/२०१७ ला साकोली येथे कॉंग्रेस कमिटी कार्यालयात पार पाडला.

साकोली शहर कॉंग्रेस कमिटीचे अनु.जाती विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश गायकवाड यांनी संविधान वाचवा देश वाचवा हा कार्यक्रम संविधा...
27/11/2017

साकोली शहर कॉंग्रेस कमिटीचे अनु.जाती विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश गायकवाड यांनी संविधान वाचवा देश वाचवा हा कार्यक्रम संविधान दिन २६/११/२०१७ ला लाखनी येथे कॉंग्रेस कमिटी कार्यालयात घेतला

पवनी शहर कॉंग्रेस कमिटी  अनु.जाती विभागाचे अध्यक्ष आनंद बक्षी वाहणे यांनी संविधान वाचवा देश वाचवा हा कार्यक्रम संविधान द...
27/11/2017

पवनी शहर कॉंग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे अध्यक्ष आनंद बक्षी वाहणे यांनी संविधान वाचवा देश वाचवा हा कार्यक्रम संविधान दिन २६/११/२०१७ ला पवनी येथे गांधी भवन येथे घेतला

मोहाडी तालुका कॉंग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.दिलीप मेश्राम यांनी संविधान वाचवा देश वाचवा हा कार्यक्रम संविध...
27/11/2017

मोहाडी तालुका कॉंग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.दिलीप मेश्राम यांनी संविधान वाचवा देश वाचवा हा कार्यक्रम संविधान दिन २६/११/२०१७ ला मोहाडी येथे घेतला

लाखनी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अनु.जाती विभागाचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य  पंकज श्यामकुवर यांनी संविधान वाचवा देश वाच...
27/11/2017

लाखनी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अनु.जाती विभागाचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य पंकज श्यामकुवर यांनी संविधान वाचवा देश वाचवा हा कार्यक्रम संविधान दिन २६/११/२०१७ ला लाखनी येथे घेतला

(भंडारा) आज दिनांक २६ नोव्हेंबर २०१७ ला स.११.३० वाजता डॉ.बाबासाहेब स्मारक त्रिमूर्ती चौक भंडारा येथे भंडारा शहर कॉंग्रेस...
27/11/2017

(भंडारा) आज दिनांक २६ नोव्हेंबर २०१७ ला स.११.३० वाजता डॉ.बाबासाहेब स्मारक त्रिमूर्ती चौक भंडारा येथे भंडारा शहर कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अनु.जाती विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांच्या निर्देशानुसार व जिल्हा कॉंग्रेस अनु.जाती विभागाचे अध्यक्ष अजय गडकरी यांच्या मार्गदर्शनात संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रेमसागर गणवीर जिल्हाध्यक्ष जिल्हा कॉंग्रेस कमिटी,व प्रमुख पाहुणे म्हणून शिशिर वंजारी महासचिव जिल्हा कॉंग्रेस,अजय गडकरी जिल्हाध्यक्ष अनु.जाती विभाग ,सचिन घनमारे शहर अध्यक्ष ,राजकपूर राऊत तालुका अध्यक्ष ,आनिक जमा पटेल अध्यक्ष जिल्हा अल्पसंख्याक विभाग ,दिपक गजभिये माजी जि.प.उपाध्यक्ष ,धनराज साठवणे माजि नगर सेवक ,प्रशांत देशकर जिल्हा सचिव ,प्रसन्ना चकोले उपाध्यक्ष लोकसभा युवक कॉंग्रेस ,सौ.भावना शेंडे महिला शहर अध्यक्ष ,शमीम शेख पक्ष नेता न.प.भंडारा ,जाबीर मालाधारी नगर सेवक ,अभिजित वंजारी उपस्थित होते,सवर्प्रथम डॉ.बाबासाहेबाच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.व मोम्बती प्रज्ल्वीत करण्यात आली. मार्गदर्शन करताना प्रेमसागर गणवीर म्हणाले संविधान प्रास्तापविका वाचनाचा उद्देश हा विदयार्थी व नागरीक यांना संविधानाबद्दलची माहिती व्हा्वी, आपले अधिकार, हक्कय आणि कर्तव्येम यांची जाणीव व्हाावी, असा आहे. त्या,चबरोबर आपल्याउ देशाचा आणि राज्यां चा कारभार कसा केला जातो, कसा करावा याची माहिती मिळते. कार्यपालिका, मंत्रिमंडळ, न्याियपालिका, निवडणूक आयोग इत्यारदींची माहिती मिळते. त्याितूनच जबाबदार नागरिक कसे होता येईल, हेही समजते. त्यामुळे संविधान दिन साजरा केलाच पाहिजे त्याचप्रमाणे मार्गदर्शन करताना अजय गडकरी म्हणाले संविधान म्हरणजे आपली आचारसंहिता आहे. आचारातून आपल्यााला शिक्षण मिळते. ते शिक्षण हे आपल्याि जीवनाचा पाया आहे. संविधान प्रास्तााविकेमध्येा सर्व संविधानाचे मूळ आहे, तो संविधानाचा पाया आहे. म्हंणूनच त्यारचे वाचन करणे ही प्राथमिकता आहे. शासनात होणारे कायदे हे जनहिताचे असावेत. परंतु ते संविधानावरच आधारित असावेत. त्या मध्येआ संविधानाचे उल्लंजघन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. म्हरणूनच त्यामसाठी सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यानसाठी सक्षम विरोधी पक्षाची आवश्यतकता असते . कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शपथ दिली .त्यानंतर घटना बचाव –देश बचावो,घटना वाचवा- देश वाचवा असे नारे देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन अनु.जाती विभागाचे शहर अध्यक्ष विनीत देशपांडे व आभार प्रदर्शन पराग खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रामुख्याने इरफान पटेल,प्रा.टेकचंद मारबते,किशोर राउत माजी नगर सेवक,दिलीप देशमुख,पराग व्यवहारे,सचिन गिरेपुंजे,हिरामण लाजेवार सर,धर्मेंद्र सुखदेवे,जिवनभाऊ भजनकार,प्रशांत सरोजकर,शीतल नागदेवे,सौ.भारती लिमजे,सौ.शमिम पठाण,पराग खोब्रागडे,निखील कुंभलकर,मंगेश हुमणे,सचिन फाले,शाहीद मून,सुहास गजभिये,शर्मिल बडोले,कमलेश फाये,ललित देवचारी,सौ.ज्योती गणवीर,श्रद्धा डोंगरे,सविता इलमकार,सौ.विद्याताई सुखदेवे,रोहित धकाते इत्यादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

माड़गी(टेकेपार)येथील रमेश भांडारकर या तरुण शेतकरयानी  कर्जपोटी आत्महत्या केली।परंतु अजूनही प्रशासना कडून आत्महत्या ग्रस्त...
23/11/2017

माड़गी(टेकेपार)येथील रमेश भांडारकर या तरुण शेतकरयानी कर्जपोटी आत्महत्या केली।परंतु अजूनही प्रशासना कडून आत्महत्या ग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबाला मदतीचे आश्वासन मिळाले नाही।त्याच्या कुटुम्बियाची सांत्वना भेट करीता कांग्रेस चे जिल्हा अध्यक्ष प्रेम सागर गणवीर,अनु.जातीचे जिल्हाध्यक्ष अजय गडकरी,माजी जिल्हापरिषदचे उपाध्यक्ष दिपक गजभिये,जिल्हा परिषदेचे सदस्य निलकंत कायते यांनी भेट घेतली.यावेळी कॉंग्रेस चे पदाधिकारी ,सरपंच,ग्राम सदस्य ,व नागरिक उपस्थित होते .

Address

Bhandara
441904

Telephone

9422133833

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandara District Congress Committe SC Dept. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhandara District Congress Committe SC Dept.:

Share

Category