Indian National Congress Bhandara

Indian National Congress Bhandara Bhandara Branch of Indian National Congress

जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा 📍 आगामी भंडारा/गोंदिया जिल्हा (स्थानिक स्वराज्य संस्था) विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभू...
01/06/2026

जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा 📍

आगामी भंडारा/गोंदिया जिल्हा (स्थानिक स्वराज्य संस्था) विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. आमदार श्री. दिलीपजी बन्सोड यांचा नामनिर्देशन अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे सुपूर्त केला.

यावेळी भंडारा/गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, मा. आमदार गोपालदास अग्रवाल, भंडारा/गोंदिया जिल्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#विधानपरिषद #निवडणूक #भंडारागोंदिया

भंडारा - गोंदिया विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. प्रफुल्ल गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल...
01/06/2026

भंडारा - गोंदिया विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. प्रफुल्ल गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले, खासदार श्री. प्रशांत पडोळे, गोंदिया नगरपरिषदेचे अध्यक्ष श्री. सचिन भाऊ शेंडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री.अशोक गप्पूजी गुप्ता, सौ. जयश्रीताई बोरकर यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील समर्थक ग्रा.पं.व न.प. सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवास सहजीवनाचा....आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना पत्नीची खुप मोलाची साथ मिळत र...
01/06/2026

प्रवास सहजीवनाचा....

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना पत्नीची खुप मोलाची साथ मिळत राहिली आणि यापुढेही मिळत राहील याबद्दल त्यांचे खुप खुप आभार.

त्यांच्या भक्कम साथी मुळेच मतदारसंघातील व राज्यातील लाखो लोकांच्या समस्या प्रश्न जाणून त्या सोडवण्यासाठी बळ मिळते.

समाजकारण आणि राजकारण करत असताना जनता हेच माझे प्रथम कुटुंब हे मी मानत आलो आहे यामुळेच कदाचीत कुटुंबासाठी जास्त वेळ देता येत नाही याबद्दल पत्नी म्हणून कोणतीही तक्रार न करता माझ्या पाठीशी खंभीरपणे उभ्या राहणाऱ्या धर्मपत्नी आपणांस वैवाहिक जीवनातील या सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला पक्ष नेतृत्वाने भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. सलग सहा वर्...
21/05/2026

माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला पक्ष नेतृत्वाने भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. सलग सहा वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाची ध्येय - धोरणे अनेक कार्यक्रम व आंदोलनाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केला. अनेक निवडणुकांना सामोरे जाताना आपली जी साथ व प्रेम मिळाले, त्याबद्दल सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे मी मनस्वी आभार मानतो...

आपला
मोहनभाऊ पंचभाई

भव्य जलसमाधी आंदोलन चलो कारधा    चलो कारधा     #जलसमाधी_आंदोलन  #आंदोलन
10/05/2026

भव्य जलसमाधी आंदोलन

चलो कारधा चलो कारधा

#जलसमाधी_आंदोलन #आंदोलन

Address

Bhandara
441904

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian National Congress Bhandara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share