26/06/2026
सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे, लोककल्याणकारी राज्यकारभाराचे आदर्श निर्माण करणारे, वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज.
शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळाली पाहिजे आणि न्याय हा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, या उदात्त विचारांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजाला परिवर्तनाची नवी दिशा दिली. त्यांनी शिक्षण, आरक्षण, सामाजिक समता आणि लोककल्याणकारी धोरणांच्या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्राचा भक्कम पाया रचला.
त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. समता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये जपत सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#राजर्षीशाहूमहाराज