MBMC- Mira Bhaindar Municipal Corporation

MBMC- Mira Bhaindar Municipal Corporation Mira Bhayandar is a city which has its own Historic value. It was an important port for business during past. As we all know that India was governed by British.

This port has seen some most important Historic Legends right from Alexander to Peshwas and some great kings who have travelled through this port. The city is surrounded by big mountains on both the side boundaries along with Arabian Sea guarding the west side of the city. The North side of the city is surrounded by Vasai (Basin) Creek. So is the city of Bhayandar Situated at the Heart of the Natu

re. British also came to Bhayandar but it was far time after as Bhayandar and Vasai were governed by Portuguese . Portuguese were the first one to rule on this part. But British also ruled over Bhayandar for quite some time. The example of British existence can be seen by the Railway Bridge over Vasai (Basin) Creek. A large estate of 3688 acres, exclusive of salt marsh was granted by deed dated 1870 to Ramchandra Laxmanji of Bombay, on a lease of 999 years, in the village of Ghodbunder, Bhayandar and Mira. The condition attaching to this grant were that the lessee should pay a yearly rent of Rs. 6790/-; that he should keep the embankments, dams, and sluic s in repair; that he should demand no rent from Inamdars; that he should demand only survey rates for Suti and Varkas lands; that he should keep boundary marks in repair; that he should pay Patil’’s and hereditary officers’ claims and allowances; that he should not interfere with the rights of way; that he should surrender land free of cost for the Bhayandar Railway Station; that he should give the Notice for the assignment of the lands; that he should not assign lands without leave; and that the salt marsh lands were liable for resumption if not reclaimed within twenty years. This estate has been the cause of much litigation, owing to an attempt of the leaseholder to levy from the yearly tenants one-half instead of one-third of the produce. The District court and the High Court on appeal (appeal 292 and 1880) have decided that the leaseholder’s claim to levy one-half is contrary to the custom of the country. (Source : Gazetteer Of The Bombay Presidency, Volume XIII, Part II, Chapter VIII)

The Devnar Estate include five villages : Devnar, Borla, Kirol, Chene and Varsava Borbhat . It was granted in perpetual lease to Mr. Dhakji Dadaji in 1809 on a rental of Rs. 5180. In addition to this a sum of Rs. 390/- is paid for lands held by husbandmen direct from Government. Only two of the villages Chene and Varsava Borbhat remain in the family of the original grantee. The other three have been sold to different buyers. (Source : Gazetteer Of The Bombay Presidency, Volume XIII, Part II, Chapter VIII)

03/08/2026

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या Pothole Reporting & Repair System ॲपद्वारे रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार काही मिनिटांत नोंदवा. फोटो अपलोड करा, अचूक लोकेशन शेअर करा आणि आपल्या तक्रारीच्या कार्यवाहीची स्थितीही ऑनलाइन पाहा.

आपला सहभाग म्हणजे अधिक सुरक्षित आणि खड्डेमुक्त मिरा-भाईंदर!

03/08/2026

आता जन्म प्रमाणपत्रासाठी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही!

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे घरबसल्या जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करा. सोपी नोंदणी, ऑनलाइन अर्ज, शुल्काचा भरणा आणि प्रमाणपत्र डाउनलोड – सर्व प्रक्रिया आता काही क्लिकमध्ये!

आजच डिजिटल सेवांचा लाभ घ्या आणि वेळेची बचत करा.

आज सोमवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित...
03/08/2026

आज सोमवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) व मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून एकल वापर प्लास्टिक (Single Use Plastic) विरोधात विशेष तपास...
03/08/2026

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून एकल वापर प्लास्टिक (Single Use Plastic) विरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर ₹१०,०००/- दंडात्मक कारवाई करण्यात आली.

आज रविवार, दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त मा. राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या उपस्थित...
02/08/2026

आज रविवार, दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त मा. राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत प्रभाग समिती क्रमांक ०१ अंतर्गत उत्तन नाका येथील ‘सागर दर्शन’ या धोकादायक घोषित इमारतीवर तोडक कारवाईस प्रारंभ करण्यात आला.

शहरातील धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीवित व वित्तहानीचा धोका निर्माण होऊ नये, तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात येत आहे.

यावेळी, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त (अतिक्रमण) स्वप्नील सावंत, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग समिती क्रमांक ०१ सहाय्यक आयुक्त दिपाली पवार तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आज शनिवार, दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मा. महापौर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना अधिक जलद...
01/08/2026

आज शनिवार, दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मा. महापौर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ नागरी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या तीन महत्त्वपूर्ण डिजिटल सेवांचे लोकार्पण मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या शुभहस्ते व मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांना अनेक महत्त्वाच्या सेवांचा लाभ घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने घेता येणार असून, नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाच्या दिशेने महानगरपालिकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

लोकार्पण करण्यात आलेल्या सेवांमध्ये ऑनलाइन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सेवा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडप परवानगी प्रमाणपत्र (NOC) पोर्टल तसेच Pothole Reporting & Repair System या मोबाईल ॲपचा समावेश आहे. यावेळी, मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, शहर अभियंता दिपक खांबित, महिला व बालकल्याण समिती उपसभापती हेमा बेलानी, सिस्टम मॅनेजर राज घरत, नगरसेविका दिप्ती भट, हेतल परमार, सुरेखा सोनार, स्नेहा पांडे, रूपाली मोदी, नगरसेवक तरुण शर्मा, विशाल पाटील, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

आज शनिवार, दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या वाढदिवसानिमित...
01/08/2026

आज शनिवार, दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने नागरिक तसेच महानगरपालिकेच्या कर्मचारी बांधवांसाठी आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या आरोग्य शिबिरात नागरिकांनी रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग तपासणी तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्मान भारत) व वयवंदना कार्ड नोंदणी यांसारख्या विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.

समाजोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरला. "आरोग्य हीच खरी संपत्ती" या संदेशाला अनुसरून मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवून या उपक्रमाचे स्वागत केले.

यावेळी मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवकगण, पदाधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#आरोग्यशिबिर #मिराभाईंदरमहानगरपालिका #जनसेवा #आरोग्य

आज शनिवार, दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या वाढदिवसानिमित...
01/08/2026

आज शनिवार, दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त २५,००० वृक्षलागवड उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक मिरा-भाईंदर घडविण्याच्या संकल्पातून २५,००० वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वृक्षलागवड ही केवळ पर्यावरण संवर्धनाची गरज नसून भावी पिढ्यांसाठीची अमूल्य गुंतवणूक आहे.
यावेळी मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.), मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर मन्साराम पाटील, नगरसेवकगण, पदाधिकारी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#वृक्षलागवड #25000वृक्ष #हरितमिराभाईंदर #पर्यावरणसंवर्धन #माझेशहरमाझाअभिमान

मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर!📅 ०१ ऑगस्ट २०२६ | 🕚 सकाळी ११.०० वाजत...
31/07/2026

मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर!

📅 ०१ ऑगस्ट २०२६ | 🕚 सकाळी ११.०० वाजता
📍अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह, दिपक हॉस्पिटल रोड, मिरा रोड (पूर्व)

आपल्या आरोग्यासाठी नक्की उपस्थित राहा!

मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात मा. आयुक्त श्री. राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सखोल पु...
31/07/2026

मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात मा. आयुक्त श्री. राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR 2026) कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत मतदार नोंदणी, मतदार यादी अद्ययावत करणे, नवमतदार नोंदणी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तसेच SIR प्रक्रियेची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाज अधिक गतिमान, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना मा. आयुक्तांनी दिल्या.

Address

Indira Gandhi Bhawan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Bhayandar West,
Bhayandar

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when MBMC- Mira Bhaindar Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MBMC- Mira Bhaindar Municipal Corporation:

Shortcuts

Share