Dr Ashok Kolhe

Dr Ashok Kolhe Entered Zilla Parishad Administrative service as a Dy.CEO. Worked as a BDO, CDPO, Addi.CEO & CEO in various Zilla Parishads.

Worked in field of rural development & Social work,Irrigation,Rural Roads ,Health,Education,Water supply & poverty alleviation.

महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस म्हणजेच *पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती...
18/02/2025

महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस म्हणजेच *पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती* छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा🙏💐💐🙏

Posted on SARTHI's facebook.
18/02/2025

Posted on SARTHI's facebook.

22/08/2024

*भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणस..!!!*

रायगड १००० वेळा चढून जायचा प्रण कोणी करेल का....???
पण *श्री सुरेश वाडकरांनी* तो केला, आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत.
सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसाद देतात.

*ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते.*

ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात.

*एक जेधे नावाच्या तरुण आहे.*
हा तरुण *२७ जानेवारी* आणि *१६ ऑगस्टला* एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. *हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून...!!!* कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.

*डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत.*
रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की रूळ ओलांडू नका, पुलावरून जा. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर. तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार...? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील.

*मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच "वेडा" सिंधी दिसतो.*
दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात *"जलसेवा"* असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने ह्या सिंध्याला बोलत केलं होतं. त्याने सांगितलं,
"आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो." आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण साहब, अब वक्त बदल गया..., आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.

*ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात.*

खरंच हे जग चालवतो कोण..???

स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री म्हणत; खंडाळा घाटात आडवा आलेला डोंगर फोडून त्यात बोगदा बनवण्याचं वेड काहींना लागलं होतं. म्हणून मुंबईची रेल्वे घाटातून वर चढून सगळीकडे गेली. *ज्यांना वेड लागतं तेच हे जग घडवत आहेत, सुंदर बनवत आहेत.*

वरवर पाहता ही माणसे वेडी वाटतात. कारण जे चारचौघे करत नाहीत ते हे करत असतात. पण त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे.

*एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही..!!!*

किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची.
आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका...!!! आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले आहे. प्रत्येकाने वरील माणसासारखा *"वेडा"* विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल.

एक छोटी प्रतिज्ञा देशाच्या अर्थकारणात बदल घडवेल.

अमेरिका, युरोप सुंदर आहेत हे आपण खूप ऐकलं. आता आपला देशही सुंदर घडवू. थोडा वेडेपणा करू.

*अजून एक उदाहरण. शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो.*
जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसील, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या असे उपाय सुचवतो.

सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो.
म्हणून ह्या माणसाला *"ऍसिडिटी मॅन"* नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्या शिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो...??? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो.

*असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी.*
पती-पत्नी दोघेही *सायकिऍट्रिस्ट* आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. *म्हणून त्यांना Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.*

*अशी ही बिघडलेली माणसे आहेत.* आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. *अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं.*
*आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.*

एक अभंग आहे....

"आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना.."

नीट वाचलं की समजतं;
आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना..!!
☺🙏🏻

31/07/2024

आदरणीय श्री. सुमंत भांगे सर, भा.प्र.से., सचिव (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य) हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. तरी आदरणीय सरांना सेवानिवृत्त निमित्त सारथी संस्था परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आदरणीय भांगे सरानी त्यांचे संपूर्ण कार्यकाळामध्ये सारथी संस्थेच्या कामकाजासाठी नेहमी उत्तम मार्गदर्शन केले आहे. निवत्तीनंतर सरांना आरोग्यमय, आणि सुखी समाधानाचे आयुष्य लाभो हीच सदिच्छा.💐💐🌹🌹

23/03/2024

🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇

*MPSC राज्यसेवा 2022 चा निकाल घोषित : सारथी संस्थेचे 174 विद्यार्थी यशस्वी.*

*या 174 विद्यार्थ्यांपैकी*

🔸 *13 विद्यार्थ्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी*
🔸 *9 विद्यार्थ्यांची डीवायएसपी पदासाठी*
🔸 *8 विद्यार्थ्यांची तहसीलदार पदासाठी.*
🔸 *4 विद्यार्थ्यांची गट विकास अधिकारी पदासाठी*
🔸 *4 विद्यार्थ्यांची शिक्षण अधिकारी पदासाठी*
🔸 *19 विद्यार्थ्यांची सहाय्यक आयुक्त राज्य कर या पदासाठी* व
🔸 *उर्वरित विद्यार्थ्यांची राज्य शासनाच्या वर्ग एक व वर्ग दोन पदासाठी निवड झाली आहे*

*सारथी संस्थेच्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!!* 💐💐💐

*अशोक काकडे IAS*
*व्यवस्थापकीय संचालक, सारथी.*

21/01/2024

*आपलेपणा,आधार आणि वेळ*
*ही खूप मोठी संपत्ती आहे...*
*कुणालाही देण्यासाठी यापेक्षा*
*चांगली भेटवस्तू नाही...*
🌹 *शुभ सकाळ*🌹

13/01/2024

Recently, my Facebook account is hacked or else, someone has created new fake account in my name using the above mentioned profile picture. And he is requesting my friends to send their phone numbers. After that he is requesting for money and requesting to buy secondhand furniture at low cost. So please don't respond to him and please block that account and report to the META or Facebook administrator.. Sorry for inconvenience and trouble..ok. Ashok kolhe.

27/12/2023

मराठा आरक्षणावर विविध प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्याला सर्वांनी अलिप्तपणे समजून घेणे गरजेचे आहे. एका माणसाबरोबर/व्यक्तिच्या मागे एवढ्या मोठ्या संख्येने करोडो लोक गोळा होत असतील तर त्याला ही काही महत्व आहे..लोक एवढे वेडे नाहीत. आता जनजागृती झाली आहे. आता पर्यंत आपल्याच समाजाची सर्वपक्षीय नेते मंडळीं आपल्याला उल्लू बनवित होते. आता सर्वांचा बुरखा फाटला आहे. आपण सर्वांनी एक आणखी पथ्य पाळणे आवश्यक आहे की जो पर्यंत नेत्यांना, मतदान विकत मिळेल ( विविध प्रकारच्या वस्तू, अथवा अन्य कुठलाही खर्च करून) , आपण ही जो पर्यंत कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून किंवा भावनेच्या भरात मतदान देऊ, तो पर्यंत आपण उपाशी राहू.. ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाही, तसेच आपण कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता ( सामूहिक व सामाजिक विचार करून) मतदान करणे जरूरी आहे. त्या शिवाय परिस्थिती बदलणार नाही.. जय जिजाऊ, जय शिवराय...

03/12/2023

*Sunday bigstory*
*पेडगावचे शहाणे*

बऱ्याच वेळा आपण..
*पेडगावचे शहाणे* किंवा *वेड पांघरून पेडगावला जाणे*. असे वाक्प्रचार वापरतो...पण असा कधी विचार केला आहे का ? ...की पेडगावच का ? दुसरे कुठले गाव का नाही ?
पाहुया तर मग :- ..............................
६ जून १६७४,ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्या साठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ? त्याची ही गमतीशीर हकीगत आणि गनिमीकाव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण -
*अहमदनगर जिल्ह्यात 'पेडगाव' नावाचं एक गाव आहे*. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता.
आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की *२०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये* (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे.

शिवाजी महाराजांना ही माहिती मिळताच त्यानी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट(ऐवज व अरबी घोडे) लुटून आणेल.
कोणासठाऊक कशी.. पण खानाला ही बातमी समजली, तेव्हा तो मजूर्डा चेष्टेने हसत म्हणाला, "सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किले के दरवाजे खोल दो. अंदर आतेही खदेड देंगे,काट देंगे."
तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादुरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले. धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर, आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तो लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षित पणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली, खूप जवळ आली तशी त्यांचे नशीबा बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादुरखान स्वतः त्यांच्या समाचारस मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली. कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले, संपूर्ण २०००ची फौज वाचली !
खानाच्या फौजेत एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावलं हे काही छोट काम नाहीच. शिवबांची फौज हरली, पळ काढला! ही जीत औरंगजेबास कळाल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादुगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, "अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?" "कोई नही जहांपन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढ़ाई करनी है ". आता किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज आला. आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं. आणि ज्याची भीती खरी ठरली.

एक घोडेस्वार दौडत आला, आणि , "हुज़ूर, गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. *आप सब वहां २००० मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके सब लूट लेके चले गए हुज़ूर*!".

अशा प्रकारे राज्याभिषेकाचा खर्च एक कोटी ही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात. आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही नसांडता ! ............................
हे 👆🏻 सगळं नाट्य घडलं पेडगावला. खानाला वेडं बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून...

*पेडगावचे शहाणे*
आणि
*वेड पांघरून पेडगावला जाणे*

हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले.

जय रामजी की,
🌹सुप्रभात🌹

03/12/2023

ज्याने रचना केली त्याला 100000 सलाम...!*

👍👍👍

घरटे उडते वादळात
बिळा-वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी? कोणतं पाखरू?
म्हणून आत्महत्या करते?
🐜🕊

प्रतिकूल परिस्थितीतही
वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनुदान मागत नाही.
🐅

घरकुलासाठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज?
🎭

हात नाहीत सुगरणीला
फक्त चोच घेऊन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते?
🕴

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेऊन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी?

घरधन्याच्या संरक्षणाला
धावून येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का?
असं विचारत नाही मित्रा!
🐕

राब राब राबून बैल
कमावून धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्तीवेतन घेतात?
🐂

कष्टकऱ्याची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपासारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे
🤕

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन् कोकिळ गाते मंजुळ गीत
🐧

मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही
🐝

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जीव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकावूण सांग
😎

काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का?
कितीही तापला सूर्य तरी
समुद्र कधी सुकला का?
🌊💦

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तू फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय
🎑

निर्धाराने जिंकू आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ...
फक्त हिमतीने लढ...!!
👊

आवडली तर इतरांनाही Share करा!!🙏🏻🙏🏻🙏🏻

18/11/2023
18/11/2023

The great controversy. सगळ्यात मोठा विरोधाभास..

Address

Kabad Galli , Beed
Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Ashok Kolhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category