Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड

  • Home
  • India
  • Bhir
  • Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड

Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड This page is created for updating information about Collector Office Beed.

मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग पार्क व ट्रॅफिक पार्क उभारणीला दिशा! 🌳♿🚦बीड जिल्ह्यातील नागरिक व विद्य...
05/09/2026

मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग पार्क व ट्रॅफिक पार्क उभारणीला दिशा! 🌳♿🚦
बीड जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा दिव्यांग पार्क आणि ट्रॅफिक पार्क संकल्पनेचे सादरीकरण मा. जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्यासमोर करण्यात आले.
♿ दिव्यांग पार्क — सर्वसमावेशक आनंदाचे ठिकाण!
दिव्यांग मुलांसाठी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारची मनोरंजनाची खेळणी, खेळाच्या सुविधा तसेच उपचार व पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजना समाविष्ट करण्याच्या सूचना मा. जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
🚦 ट्रॅफिक पार्क — प्रात्यक्षिकातून वाहतूक नियमांचे शिक्षण!
शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम केवळ सांगण्याऐवजी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सहज आणि प्रभावीपणे समजावून देणारे आधुनिक ट्रॅफिक पार्क विकसित करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच या उद्यानाच्या प्रभावी व शाश्वत संचालनासाठी व्यवसायाभिमुख उपक्रमांची जोड देण्याबाबतही सूचना करण्यात आली.
✨ समावेशकता, सुरक्षितता आणि शिक्षण यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून बीडच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे!
#दिव्यांगपार्क #ट्रॅफिकपार्क #बीड #समावेशकविकास #वाहतूकसुरक्षा #विद्यार्थीसुरक्षा

05/09/2026

मा. अजितदादा पवार साहेबांनी पाहिलेलं एक स्वप्न…
आणि मा. सुनेत्राताई पवार मॅडम मनापासून पुढे नेत असलेला हा प्रवास.

बीड जिल्हा क्रीडा संकुलाला दिलेली ही भेट — केवळ पाहणी नाही, तर स्वप्न पाहणाऱ्या युवा खेळाडूंसाठी अधिक चांगल्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेलं एक भावनिक आणि आश्वासक पाऊल. 🏟️

🗳️ विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ : सुनावणी प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग संपन्न 🗳️विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ अंतर...
04/09/2026

🗳️ विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ : सुनावणी प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग संपन्न 🗳️

विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ अंतर्गत Unmapped/Anomalies मतदारांच्या सुनावणी प्रक्रियेचे प्रभावी नियोजन, कार्यवाही आणि ERONET प्रणालीचा योग्य वापर याबाबत बीड जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षण वर्गात मा. विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे सादरीकरण मनोज घोडेपाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले.

📌 प्रशिक्षणातील प्रमुख बाबी :
▪️ सुनावणीची संख्या लक्षात घेऊन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना यादी भागांचे वाटप
▪️ ERONET प्रणालीमध्ये यादी भागांचे मॅपिंग
▪️ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना ERONET सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण
▪️ Unmapped/Anomalies मतदारांसाठी आवश्यक १२ प्रकारच्या कागदपत्रांबाबत व्यापक जनजागृती
▪️ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्राधान्यक्रम निश्चित करणे
▪️ दावे व हरकतीच्या कालावधीत BLA मार्फत फॉर्म सादर करण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
▪️ मतदारांना सुनावणी आदेशाविरुद्ध जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करता येते, याबाबत माहिती देणे

या प्रशिक्षणास बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी, नियुक्त १०३ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच सर्व तालुक्यांचे निवडणूक डेटा एन्ट्री ऑपरेटर उपस्थित होते.

🎯 अचूक मतदार यादी, पारदर्शक प्रक्रिया आणि प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज!

#विशेषसखोलपुनरिक्षण2026 #मतदारयादी #मतदारजनजागृती #बीड

04/09/2026

👣 मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावणाऱ्या आईच्या जिद्दीला सलाम! ❤️

आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने रमाबाई रणवीर यांनी अमृत-२ मॅरेथॉनमध्ये अनवाणी पायाने धावत विजेतेपद मिळविले.

रमाबाईंच्या या प्रेरणादायी संघर्षाची दखल घेत जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी त्यांचा सन्मान करून ₹५० हजारांची आर्थिक मदत सुपूर्द केली.

“एका आईच्या संघर्षाला मिळालेली प्रशासनाची साथ… आणि मुलींच्या शिक्षणाला नवे बळ!” 🌸📚

संवेदनशील प्रशासन • सामाजिक बांधिलकी • मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन

#रमाबाईरणवीर #विवेकजॉन्सन #जिल्हाप्रशासनबीड #मुलींचेशिक्षण #संवेदनशीलप्रशासन #महिलासक्षमीकरण #सामाजिकबांधिलकी

👣 मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावणाऱ्या रमाबाई रणवीर यांचा जिल्हा प्रशासनाकडून सन्मानअंबाजोगाई येथे आयोजित अमृत-२ मॅरेथ...
04/09/2026

👣 मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावणाऱ्या रमाबाई रणवीर यांचा जिल्हा प्रशासनाकडून सन्मान

अंबाजोगाई येथे आयोजित अमृत-२ मॅरेथॉन स्पर्धेत आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळविण्याच्या उद्देशाने अनवाणी पायाने धावत विजेतेपद मिळविणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्या संघर्षाची जिल्हा प्रशासनाने संवेदनशीलतेने दखल घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या हस्ते रमाबाई रणवीर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासन व महसूल अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ₹५० हजारांची आर्थिक मदत त्यांना सुपूर्द करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. जॉन्सन यांनी रमाबाईंच्या संघर्षाचे कौतुक करत, “आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आई किती कष्ट सोसू शकते, याचे रमाबाई रणवीर हे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,” अशी ग्वाही दिली.

रमाबाई रणवीर यांच्या जिद्द, त्याग आणि संघर्षाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या या मदतीमुळे त्यांच्या मुलींच्या शिक्षणाला मोठे बळ मिळणार आहे.

यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता, अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरांगे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी मनोज घोडे पाटील तसेच उपविभागीय अधिकारी दिपक वजाळे उपस्थित होते.

या उपक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शिवकुमार स्वामी यांच्या पुढाकारातून मदत निधी संकलित करण्यात आला.

संवेदनशील प्रशासनातून सामाजिक बांधिलकी…
रमाबाईंच्या संघर्षाला जिल्हा प्रशासनाची साथ! 🌸

#जिल्हाधिकारीबीड #विवेकजॉन्सन #जिल्हाप्रशासन #बीड #रमाबाईरणवीर #मुलींचेशिक्षण #महिलासक्षमीकरण #संवेदनशीलप्रशासन #सामाजिकबांधिलकी

दोन वेठबिगर गोशाळेतूने मुक्त
04/09/2026

दोन वेठबिगर गोशाळेतूने मुक्त

🚆✨ बीडच्या विकासाला रेल्वेची नवी गती! ✨🚆१७ सप्टेंबरला धावणार ‘बीड–पुणे’ रेल्वे!डिसेंबरअखेर ‘बीड–मुंबई (पनवेल)’ रेल्वे से...
02/09/2026

🚆✨ बीडच्या विकासाला रेल्वेची नवी गती! ✨🚆

१७ सप्टेंबरला धावणार ‘बीड–पुणे’ रेल्वे!

डिसेंबरअखेर ‘बीड–मुंबई (पनवेल)’ रेल्वे सेवेसाठी प्रयत्नांना वेग!

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच ‘बीड–पुणे’ आणि ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर २०२६ रोजी, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ऐतिहासिक मुहूर्तावर सुरू करण्याबाबत माहिती देण्यात आली. या सेवेसाठी आवश्यक सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

तसेच डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

💫 दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या दूरदृष्टीला पुढे नेत बीडच्या विकासाचा रेल्वेमार्ग अधिक वेगाने खुला होत आहे.

गतवर्षी १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीडकरांची तब्बल ४० वर्षांची प्रतीक्षा संपवत ‘बीड–अहिल्यानगर’ रेल्वे सेवा सुरू झाली. आता याच ऐतिहासिक दिनी यावर्षी ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवा सुरू होत असल्याने बीडच्या विकासाला नवी दिशा आणि नवी गती मिळणार आहे.

🚆 बीड–पुणे रेल्वेमुळे—
🔹 कृषी क्षेत्राला नवी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत
🔹 औद्योगिक व व्यापार क्षेत्राला चालना
🔹 विद्यार्थ्यांसाठी पुण्याशी अधिक सुलभ संपर्क
🔹 रोजगार व व्यवसायाच्या संधींना वेग
🔹 नागरिकांचा प्रवासाचा वेळ व खर्च कमी
🔹 संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला बळ

“बीडच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची असून, बीड–पुणे आणि बीड–मुंबई रेल्वे सेवेमुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल.”
— उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार

या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (निर्माण) बी. के. सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव आदी उपस्थित होते.

#बीड #बीडपुणेरेल्वे #बीडमुंबईरेल्वे #अहिल्यानगरबीडपरळी #रेल्वे #विकासाचीगती #मराठवाडा #मराठवाडामुक्तीसंग्रामदिन #सुनेत्राअजितपवार #बीडजिल्हा

🗳️ विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ अंतर्गत बीड जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध! 🗳️विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) २०२६ अंतर...
02/09/2026

🗳️ विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ अंतर्गत बीड जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध! 🗳️

विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) २०२६ अंतर्गत बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

या प्रारूप मतदार यादीचे मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मा. जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी श्री. विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड; श्री. मनोज घोडेपाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

📋 पारदर्शक, अचूक आणि अद्ययावत मतदार यादीसाठी विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे.

#विशेषसखोलपुनरिक्षण2026 #मतदारयादी #बीड #मतदारजागृती

27/08/2026

🇮🇳 नेपाळमध्ये अडकलेल्या बीड जिल्ह्यातील नागरिक व पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन! 🇮🇳

नेपाळमधील सध्याच्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यांतील अनेक नागरिक व पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील कोणताही नागरिक किंवा पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकला असल्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्यास, त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.

📞 जिल्हा आपत्कालीन कार्यकक्ष, बीड
☎️ 02442-299299
📱 टोल फ्री : 1077

📌 माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील तसेच कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक नमूद करावा.

🔗 माहिती नोंदणीसाठी लिंक:
https://geospatial.mahaesic.in/Sahayata_gulf/

नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासन, बीड यांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.

🤝 आपत्कालीन परिस्थितीत घाबरू नका; तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधा.

#आपत्तीव्यवस्थापन #जिल्हाप्रशासन #बीड #नेपाळ #आपत्कालीनमदत

25/08/2026

📚✨ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे मार्गदर्शन! ✨📚

शिरूर कासार येथील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहास जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मार्गदर्शन व आवश्यक सूचना दिल्या. 🌱📖

Address

Collector Office Beed
Bhir
431122

Telephone

02442222201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Collector Office Beed - जिल्हाधिकारी कार्यालय बीड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share