08/04/2025
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
प्रेस नोट
श्री. अनमोल सागर (भा.प्र.से.) आयुक्त तथा प्रशासक यांनी दिनांक २६/०३/२०२५ रोजीच्या बैठकीमध्ये भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक १ ते ५ क्षेत्रातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते व मुख्य बाजारपेठा इ. ठिकाणी असणारे अतिक्रमण, अनधिकृत हातगाड्या, ठेलागाड्या, बाकडे, स्टॉल, फुटपाचवर अनधिकृतपणे ठेवण्यात आलेले फलक, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स इ. वर कारवाईचे आदेश दिलेले होते.
त्यानुसार दिनांक ०७/०४/२०२५ रोजी प्रभाग समिती क्रमांक १ हद्दीमधील बागे फिरदोस समोरील पेट्रोलपंप पासून खंडूपाडा रोड ते तय्यब मस्जिद पर्यंत अवचित पाडा, प्रभाग समिती क्र. २ हद्दीमधील साईबाबा नाका, अरिहंत सिटी, एस. के.एन. विट भट्टी, रणजीत नाईक घर ते साईबाबा मंदिर, प्रभाग समिती क्र. ३ हद्दीमधील धामणकरनाका मुख्य रस्ता तसेच बी.एन.एन कॉलेज रस्ता पुढे पद्मानगर वॉटर सप्लायकडे जाणारा रस्ता, कामतघर शिवसेना कार्यालय, गणेशनगर, अंजुरफाटा, शुभशांती रेल्वे स्टेशन रोड, प्रभाग समिती क्र. ४ हद्दीमधील सारिका हॉटेल, ठाणा रोड ते धामणकर नाका ते रतन टॉकीज रोड व धामणकर नाका उड्डाणपुलाखालील १७० अनधिकृतपणे फुटपाथवर ठेवण्यात आलेल्या अतिक्रमणांवर अतिक्रमण पथकामार्फत कारवाई करून सदरचे साहित्य मनपा भांडारगृहात जमा करण्यात आले आहे.
मा. प्रशासक तथा आयुक्त यांचे निर्देशान्वये रस्त्यावर अतिक्रमण करणा-या व्यावसायिकांवर नियमितपणे कारवाई करण्यात येणार आहे. तरी अतिक्रमणधारकांनी केलेले अतिक्रमण स्वतःहून काढून टाकावे असे आवाहन उपायुक्त (अति. व अ. बां.) श्री. विक्रम दराडे यांनी केले आहे.
(श्रीकांत परदेशी)
जनसंपर्क अधिकारी
भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका