Sathe Smruti Sangeet Samaroh

Sathe Smruti Sangeet Samaroh साठे स्मृति संगीत समारोहाची सर्व माहिती रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे फेसबुक पान

कै. श्री. स.म. साठे आणि कै. सौ. उषाताई साठे यांच्या स्मृति प्रित्यर्थ दर वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला साठे कुटुंबीय या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करतात
कै. श्री. स.म. साठे हे भुसावळातील एक नामवंत वकील तर होतेच परंतू त्याचबरोबर त्यांनी ताप्ती एज्युकेशन संस्थेत देखील अनेक पदे भूषवित शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले. त्याचबरोबर ते एक निस्सीम नाट्य व कलाप्रेमी द

ेखील होते. महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. कै. सौ. उषाताई साठे यादेखील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या प्रथम मुख्याध्यापिका होत्या. ह्या दोघांच्या कर्मभूमीत म्हणजेच भुसावळ शहरात एक चांगला सांस्कृतिक उपक्रम सुरु करावा हा विचार आम्हा कुटुंबियांच्या मनात आला. म्हणूनच भुसावळकर रसिक प्रेक्षकवर्ग चांगले शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय संगीत ऐकून तृप्त होऊन भारतीय अभिजात संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा या निर्मळ हेतूने आम्ही हा कार्यक्रम दर वर्षी आयोजित करतो. येथील कलाप्रेमी देखील या कार्यक्रमास भरगोस प्रतिसाद देऊन आम्हाला उत्तरोत्तर चांगले कार्यक्रम आयोजित करण्यास प्रेरणा देत असतात व हा कार्यक्रम यशवीरीत्या आयोजित करण्यास बरेच लोक कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत झटत असतात.

१९९७ पासून दर वर्षी एक नवीन कलाकार आणि कलाविष्कार घेऊन आम्ही रसिकांसमोर येतो. आगामी कार्यक्रमांची माहिती, कार्यक्रमाचे फोटो आणि कार्यक्रमाचे वर्तमानपत्रांमधील वृत्त/लेख हे तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ह्या फेसबुक पेज चा खटाटोप :)

या वर्षीच्या कार्यक्रमाची दिव्य मराठी दैनिकात आज प्रसिद्ध झालेली बातमी  :)
09/02/2016

या वर्षीच्या कार्यक्रमाची दिव्य मराठी दैनिकात आज प्रसिद्ध झालेली बातमी :)

२० व्या साठे स्मृति संगीत समारोहाचे काही निवडक क्षण.कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल भुसावळ च्या सर्व रसिक श्र...
08/02/2016

२० व्या साठे स्मृति संगीत समारोहाचे काही निवडक क्षण.

कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल भुसावळ च्या सर्व रसिक श्रोत्यांचे मन:पूर्वक आभार !!

Clipping about this years program in Lokmat (4th Feb)
04/02/2016

Clipping about this years program in Lokmat (4th Feb)

१९९७ हे या कार्यक्रमाचे पाहिले वर्ष.२ फेब्रुवारी १९९७ रोजी भुसावळ मधील नाहटा महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला !पंडित ...
03/02/2016

१९९७ हे या कार्यक्रमाचे पाहिले वर्ष.

२ फेब्रुवारी १९९७ रोजी भुसावळ मधील नाहटा महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला !

पंडित सज्जनलाल ब्रह्मभट यांच्या सुश्राव्य गायनाने जे स्वरयज्ञ सुरु झाले ते अव्याहत २० वर्षे सुरु आहे !!

या वर्षीच्या कार्यक्रमास आपणा सगळ्यांना आमंत्रित करताना विशेष आनंद होत आहे कारण हे या कार्यक्रमाचे विसावे वर्ष आहे. वीस ...
24/01/2016

या वर्षीच्या कार्यक्रमास आपणा सगळ्यांना आमंत्रित करताना विशेष आनंद होत आहे कारण हे या कार्यक्रमाचे विसावे वर्ष आहे. वीस वर्षे हा कार्यक्रम आम्ही कोणतीही Sponsorship न घेता करीत आहोत ते केवळ आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्या यांच्यामुळेच. हा कार्यक्रम आणि आपला आमच्यावर असलेला जिव्हाळा ह्या दोन्हींमध्ये खंड पडू नये हीच मन:पूर्वक इच्छा !! :)

मागच्या वर्षीच्या कार्यक्रमाची एक झलक :)
08/01/2016

मागच्या वर्षीच्या कार्यक्रमाची एक झलक :)

साठे स्मृती संगीत समारोह या वार्षिक संगीत श्रद्धांजली कार्यक्रमात दि. ३१ जानेवारी २०१५ रोजी सौ. सुलेखा भट यांचे गायन झाले. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे .

18/12/2015

यावर्षीचा कार्यक्रम ६ फेब्रुवारी २०१६ रोजी योजला आहे.
अधिक माहिती या पेजवर लवकरच....

This year's concert is on Saturday, 6th February 2016.
Please mark your Calendar and stay tuned for more updates. :)

News about this year's concert in Dainik Divya Marathi (03/02/2015)
03/02/2015

News about this year's concert in Dainik Divya Marathi (03/02/2015)

काल साठे स्मृती संगीत समारोहाअंतर्गत सौ. सुलेखा धारकर-भट यांचा बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे काही निवडक क्षण !...
01/02/2015

काल साठे स्मृती संगीत समारोहाअंतर्गत सौ. सुलेखा धारकर-भट यांचा बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे काही निवडक क्षण !!

कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल भुसावळ च्या सर्व रसिक श्रोत्यांचे मन:पूर्वक आभार !!

29/01/2015
19/01/2015

यावर्षीचा कार्यक्रम ३१ जानेवारी २०१५ रोजी आयोजित केला आहे.

अधिक माहिती या पेजवर लवकरच....

Address

Bhusawal
425201

Telephone

+919422216418

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sathe Smruti Sangeet Samaroh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sathe Smruti Sangeet Samaroh:

Share