पुस्तक घर

पुस्तक घर We Read- पुस्तक घर
📦पुस्तक वितरण
📚वैचारिक व दर्जेदार पुस्तके
🚪भारतभर घरपोच सेवा
WhatsApp On – https://wa.me/7066495828

WE READ – पुस्तक घरउत्तम बंडू तुपे यांची तीन महत्त्वाची पुस्तकं आजपासून WE READ – पुस्तक घरमध्ये उपलब्ध आहेत. ❤️ मराठी स...
27/08/2026

WE READ – पुस्तक घर

उत्तम बंडू तुपे यांची तीन महत्त्वाची पुस्तकं आजपासून WE READ – पुस्तक घरमध्ये उपलब्ध आहेत. ❤️

मराठी साहित्यात ‘झुलवा’कार म्हणून प्रसिद्ध असलेले उत्तम बंडू तुपे हे ग्रामीण नि उपेक्षित समाजाच्या जगण्याचं वास्तव अत्यंत संवेदनशीलपणे मांडणारे महत्त्वाचे साहित्यिक होते. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एनकूळ या गावातून आलेल्या तुपेंनी सुरुवातीला मोलमजुरी केली नि पुढे पुण्यात सरकारी कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी केली; औपचारिक शिक्षण तिसरीपर्यंत झालं असतानाही त्यांनी कादंबरी, कथा, नाटक नि आत्मकथन अशा विविध साहित्यप्रकारांत ५० हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली. त्यांच्या लेखनात ग्रामीण जीवन, गरिबी, जातीय वास्तव, शोषण, श्रम, उपेक्षित माणसांचं जगणं नि मानवी संघर्ष यांचं अस्सल चित्रण दिसतं. झुलवा ही जोगतिणींच्या जीवनावर आधारित त्यांची सर्वाधिक गाजलेली कादंबरी ठरली नि जोगतिणींच्या अनुभवविश्वाला जवळून समजून घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेण्याचाही प्रयत्न केला होता. यांच्या अनेक साहित्यकृती विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातही अभ्यासल्या गेल्या आहेत. त्यामुळे तुपेंचं साहित्य म्हणजे केवळ कथा किंवा कादंबऱ्या नाहीत, तर महाराष्ट्रातील ग्रामीण नि वंचित समाजाच्या जगण्याकडे पाहण्याची एक महत्त्वाची साहित्यिक दृष्टी आहे.

आजपासून त्यांच्या तीन पुस्तकांचा संच WE READ – पुस्तक घरमध्ये उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. ज्यांना उत्तम बंडू तुपे यांचं लेखन वाचायचं होतं, त्यांच्या पुस्तकांचा शोध घेत होते किंवा मराठीतील वास्तववादी नि सामाजिक भान असलेलं साहित्य आपल्या संग्रहात ठेवायचं आहे, त्यांनी ही संधी नक्की घ्यावी. चांगली पुस्तकं फक्त विकायची नाहीत, ती पुन्हा वाचकांच्या हातात पोहोचवायची आहेत, हा WE READ – पुस्तक घरचा प्रयत्न आहे. 🌼

मुळ किंमत - 750₹

प्रत्येकी किंमत - 250₹

तिन्ही घरपोच - 695₹ घरपोच (शिपिंग फ्री)

पुस्तकं हवी असतील तर WhatsApp करा:
https://wa.me/c/919518398168

WE READ – पुस्तक घर ❤️📖
चांगली पुस्तकं शोधूया, वाचूया नि वाचकांपर्यंत पोहोचवूया.

बीड सारख्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या,ऊस तोड कामगार  जिल्हयात देखील अशी शिक्षणाच्या बळावर रत्न घडली आहेत हे सुंदर नमूद ...
09/08/2026

बीड सारख्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या,ऊस तोड कामगार जिल्हयात देखील अशी शिक्षणाच्या बळावर रत्न घडली आहेत हे सुंदर नमूद केलेले आहे.सरांच्या बालपणापासून ते आयएएस अधिकारी पदापर्यत पोहचविण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील खडतर अनूभव आपणास वाचता येतील.त्यांचे बंधू श्री.अशोक मुंडे सर यांनी ज्यापध्दतीने सरांना बालवयातच शिक्षणाचे महत्व पटवून दिले हे वाचतांना सराच्या आयुष्यात एका मोठया भावाचे महत्व अधोरेखित होते.देशातील सर्वाच्च परिक्षेत मानाकंन मिळविण्यासाठी आपणास योग्य दिशा,सातत्य व प्रचंड मेहनत अंगी बाळगावी लागते.या प्रवासात अनेक कचखळगे येतात मात्र संयम आणि इच्छाशक्ती जोडीला असल्यास काही कठीण नाही.

तुकाराम हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सर केवळ नावाने मोठे नाही तर त्यांचे कर्तृत्व,परिश्रम,लोकांविषयी असलेली तळमळ आणि IAS फॉर सोसायटी हे त्यांचे गूण समजून येतात.UPSC परिक्षेत मराठी टक्का वाढवावा यासाठी ते कायम आग्रही असतात यासाठी प्रशासकीय सहकार्य देखील अपेक्षित असते.बीड,औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगर,पुणे,जळगाव,मुंबई अखेरीस दिल्ली….प्रवास आपण वाचण्यास मिळेल अशी पुस्तंक आपण ही वाचावीत आणि पाल्यांना ही…बंधूप्रेम असलेला जीवनपट संपलेला नाही तो चालूच आहे..


©️शशिकांत सानप ,मंडळ अधिकारी पनवेल ✍🏻

We Read सदर : इतिहासाचे पान 📜पुस्तकांच्या माध्यमातून इतिहास नव्याने समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न… ❤️पुस्तक: चे ग्वेर...
06/08/2026

We Read सदर : इतिहासाचे पान 📜

पुस्तकांच्या माध्यमातून इतिहास नव्याने समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न… ❤️

पुस्तक: चे ग्वेरा….🌸

We Read मध्ये उपलब्ध….📚

325₹ घरपोच (शिपिंग फ्री)
https://wa.me/7066495828

जगाला तुम्हाला बदलू द्या, मग तुम्ही जग बदलू शकाल.” या विचाराचं आपल्या आयुष्यात कृतीत रूपांतर करणाऱ्या थोर क्रांतिकारकांपैकी एक म्हणजे एर्नेस्तो ‘चे’ ग्वेरा. अर्जेंटिनामधील एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा तरुण केवळ क्युबाच्या क्रांतीपुरता मर्यादित राहिला नाही, तर अन्यायाविरुद्धच्या जागतिक प्रतिकाराचं प्रतीक बनला. अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात त्याने जगाला फक्त क्रांतीचा मार्गच दाखवला नाही, तर स्वतःच्या विचारांसाठी, मूल्यांसाठी नि ध्येयासाठी शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचा आदर्शही घालून दिला.

या पुस्तकात लेखकाने चे ग्वेराच्या राजकीय प्रवासापुरतंच स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा, विचारविश्वाचा, भावनिक संघर्षाचा, स्वप्नांचा नि तत्त्वनिष्ठ जीवनाचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ एका क्रांतिकारकाचं चरित्र राहत नाही, तर एका अस्वस्थ, संवेदनशील नि परिवर्तनासाठी झटणाऱ्या माणसाच्या अंतर्मनाचा वेध घेणारं दस्तऐवज बनतं.

चे ग्वेराला समजून घेण्यासाठी त्याच्या पोस्टरकडे किंवा प्रसिद्ध छायाचित्राकडे पाहून भागत नाही. त्यासाठी त्याच्या विचारांचा, संघर्षाचा नि आयुष्याच्या प्रवासाचा अभ्यास करावा लागतो. हे पुस्तक त्या दिशेने वाचकाला विचारपूर्वक घेऊन जातं. त्यामुळे इतिहास, क्रांती नि मानवी मूल्यांचा शोध घेणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी हे पुस्तक नक्कीच वाचनीय ठरतं. 🌼📖

©️We Read 🫰

सध्या महाराष्ट्रभर एका नावाची जोरदार चर्चा आहे... तुकाराम मुंढे❤️📚We Read मध्ये उपलब्ध...❤️🌼 फक्त ₹275 घरपोच 🌼https://wa...
05/08/2026

सध्या महाराष्ट्रभर एका नावाची जोरदार चर्चा आहे... तुकाराम मुंढे❤️📚

We Read मध्ये उपलब्ध...❤️🌼

फक्त ₹275 घरपोच 🌼
https://wa.me/7066495828

FDA आयुक्त म्हणून अन्न भेसळविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाया, मोठमोठ्या छापेमाऱ्या आणि नियमांची कठोर अंमलबजावणी यामुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण त्यांचा प्रवास केवळ आजच्या बातम्यांपुरता मर्यादित नाही. प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करताना त्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, पारदर्शकता आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं. वारंवार बदल्या झाल्या, राजकीय आणि प्रशासकीय दबाव आले, तरीही आपल्या तत्त्वांशी तडजोड न करणारा अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. म्हणूनच आज लाखो तरुण त्यांना प्रेरणास्थान मानतात.

जर तुम्हाला तुकाराम मुंढे यांचा संघर्ष, त्यांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि प्रशासनातील तत्त्वनिष्ठ प्रवास जवळून जाणून घ्यायचा असेल, तर हे मराठी पुस्तक नक्की वाचा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, प्रशासनात रस असणारे वाचक आणि प्रेरणादायी चरित्र वाचण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

पुस्तक मागवण्यासाठी WhatsApp करा : 7066495828 🌼

लॉकडाऊन काळापासून We Read च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर पुस्तकं घरपोच पोहोचवत आहोत. हजारो वाचकांपर्यंत सवलतीच्या दर...
03/08/2026

लॉकडाऊन काळापासून We Read च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर पुस्तकं घरपोच पोहोचवत आहोत. हजारो वाचकांपर्यंत सवलतीच्या दरात पुस्तकं पोहोचवण्याचा हा प्रवास आजही सुरू आहे. ❤️

आतापासून Moin’s Shelf वर शेअर होणारी अनेक पुस्तके तुम्ही We Read मधून थेट मागवू शकता. वेळोवेळी उपलब्ध पुस्तकांची यादी, नवीन पुस्तके, विशेष पुस्तकसंच नि सवलतीच्या ऑफर्स येथे पोस्ट केल्या जातील.

तुम्हाला यादीतील कोणतेही पुस्तक हवे असल्यास 7066495828 हा नंबर सेव करा नि व्हॉट्सॲपवर पुस्तकाचे नाव, तुमचे पूर्ण नाव नि संपूर्ण पत्ता पाठवा.

📦 पुस्तके संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच उपलब्ध आहेत.

वाचा… भेट द्या… नि पुस्तकं घरपोच मागवा! ❤️📚🌼

लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....🌼 लो. टिळक दर्शन 🌸We read मध्ये उपलब्ध...🌼425₹ घरपोच (शिपिंग फ्री)https://w...
23/07/2026

लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....🌼

लो. टिळक दर्शन 🌸

We read मध्ये उपलब्ध...🌼

425₹ घरपोच (शिपिंग फ्री)
https://wa.me/7066495828

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" ही केवळ घोषणा नव्हती; ती संपूर्ण भारतीय स्वातंत्र्यलढ्याला दिशा देणारी ज्वाला होती. त्या ज्वालेचे प्रणेते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.

टिळकांना समजून घ्यायचं असेल, तर त्यांच्या विचारांचा, संघर्षाचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या ध्यासाचा मागोवा घेणारे 'लो. टिळक दर्शन' हे पुस्तक नक्की वाचायला हवं. हे पुस्तक केवळ चरित्र नाही, तर एका असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या राष्ट्रकार्याचा जिवंत दस्तऐवज आहे.

या पुस्तकातून टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीच्या माध्यमातून जनतेत निर्माण केलेली राष्ट्रभावना उलगडते. होमरूल चळवळ, मवाळ-जहाल वाद, मंडालेच्या तुरुंगातील सहा वर्षांचा कठोर काळ, केसरीतील निर्भीड अग्रलेख, रँड प्रकरण, वेदोक्त प्रकरण, ताई महाराज प्रकरण, इंग्रजांविरुद्ध लढलेले कायदेशीर संघर्ष, न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनेपासून तत्त्वांसाठी दिलेला राजीनामा—अशा अनेक घटनांमधून टिळकांचं धैर्य, दूरदृष्टी आणि तत्त्वनिष्ठा स्पष्ट होते.

विशेष म्हणजे हे पुस्तक टिळकांच्या राजकीय कार्यापुरतं मर्यादित राहत नाही. योगी अरविंदांसारख्या समकालीन विचारवंतांचे त्यांच्याबद्दलचे अभिप्राय, मंडालेच्या तुरुंगातील आठवणी, मुस्लिम समाजाबद्दलची त्यांची समन्यायी भूमिका, क्रांतिकारकांना दिलेली वैचारिक प्रेरणा आणि सामान्य जनतेमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास यांचाही यात प्रभावी आढावा घेतला आहे.

आजच्या काळात टिळकांचं स्मरण म्हणजे केवळ त्यांच्या घोषणांचा गौरव नव्हे, तर शिक्षण, स्वाभिमान, राष्ट्रीय कर्तव्य आणि लोकजागृती या मूल्यांचा पुनर्विचार करण्याची संधी आहे. त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं की समजतं—राष्ट्रनिर्मिती ही भाषणांनी होत नाही; ती त्याग, संघर्ष, विचार आणि कृती यांच्या एकत्रित प्रवासातून घडते.

लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त प्रत्येक तरुणाने आणि प्रत्येक वाचकाने 'लो. टिळक दर्शन' हे पुस्तक एकदा तरी वाचायलाच हवं. कारण टिळक समजल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पूर्णपणे समजत नाही.

📖 हे पुस्तक 'We Read' मध्ये उपलब्ध आहे.

आपली प्रत मिळवण्यासाठी संपर्क करा.

We Read सदर : विचारवंत 🧠📚समाज, विचार आणि परिवर्तन घडवणारे विचारवंत1.बुद्ध चरित्र 2.प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारक संत एकूण ...
05/07/2026

We Read सदर : विचारवंत 🧠📚
समाज, विचार आणि परिवर्तन घडवणारे विचारवंत

1.बुद्ध चरित्र
2.प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारक संत

एकूण 2 वाचनीय पुस्तके We Read मध्ये उपलब्ध….🌸

405₹ घरपोच (शिपिंग फ्री)
https://wa.me/7066495828

वाचायलाच हवे अशी दोन महत्त्वाची पुस्तके… ❤️📚

संत गाडगेबाबा नि आचार्य धर्मानंद कोसंबी ही दोन नावे महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतील अत्यंत महत्त्वाची आहेत. एका बाजूला संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धा, जातिभेद आणि पाखंडाविरुद्ध कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली, तर दुसऱ्या बाजूला धर्मानंद कोसंबींनी बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान सामान्य माणसापर्यंत अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेत पोहोचवले. गाडगेबाबा हे केवळ संत नव्हते, तर विवेक, स्वच्छता, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार होते. त्यांनी कधीही औपचारिक शिक्षण घेतले नाही, पण आयुष्याच्या विद्यापीठातून शिकून लाखो लोकांचे लोकशिक्षक बनले. तर धर्मानंद कोसंबींनी बुद्धांच्या विचारांचे मूळ स्वरूप समजावून सांगत आधुनिक काळासाठी त्याची नव्याने मांडणी केली. ही दोन्ही पुस्तके केवळ चरित्रे नाहीत; ती विचारांची, विवेकाची आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवणारी आहेत. समाज, मानवता, प्रबोधन आणि बौद्ध विचार समजून घ्यायचे असतील, तर ही पुस्तके प्रत्येकाने एकदा तरी नक्की वाचावीत. ❤️🌿

We Read | वाचन • विचार • विकास

We Read सदर : मनाचा आरसा 🧠🌸मानसशास्त्र, भावना आणि मानवी मनदोन फार चांगली पुस्तके सुचवतोय 🌿🌸1.चिंता : स्वरूप आणि उपाय 2.अ...
17/06/2026

We Read सदर : मनाचा आरसा 🧠🌸
मानसशास्त्र, भावना आणि मानवी मन

दोन फार चांगली पुस्तके सुचवतोय 🌿🌸

1.चिंता : स्वरूप आणि उपाय
2.अटळ दुःखातून सावरताना

395₹ घरपोच (शिपिंग फ्री)
https://wa.me/7066495828

अस्वस्थतेचं मळभ दाटल्यानं कासावीस होणाऱ्या मनांशी संवाद साधणं मला नेहमीच अस्वस्थ करून सोडतं. शरीर व मन यात द्वैत नसतं. असं द्वैत मानणाऱ्यांना माणूस समजलेला नसतो. चिंतेच्या दडपणाखाली दोन्ही एकत्र चिरडले जातात. मन अस्वस्थ होतं त्याला अनेक कारणे असतात. वैयक्तिक आशा, अपेक्षा, आकांक्षा इतकंच जबाबदार असतं, आजूबाजूचं जग काहूर माजविणारी परिस्थिती...

सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक विविध अंगाने विळखा घालत येते चिंता. विचार विवेकापासून दूर जातो अवास्तव उत्तरे शोधीत. जन्मावेळी रडून झाल्यावर आनंदाने जगायचं ठरविणारी माणसं आयुष्यभर चिंताग्रस्त जगत आनंद हरवून बसतात. तुमचं माझं तसंच यापुढे होत राहू नये या तीव्र इच्छेपोटी घेतलेला हा शोध.🍀

तर

जन्मापासून अखड सोबत करणाऱ्या मृत्यूला सामोरं जाणं मानवी मनाची कसोटी पाहतं. त्यात मृत्यूने आगमनाची पूर्वसूचना-तीही थोडी आधीच दिल्यास त्याला स्वीकारणं सोपं जातं. मृत्यूने अचानक येऊ नये, तो आला तरीही, विशेष त्रास न देता शांतपणे यावा, तो वेदनारहित असावा किंवा वेदना अपरिहार्य असल्यास त्याने सुसह्य वेदनांसह यावं, सर्व प्रिय, आप्त सोबत असताना यावा या व अशा अनेक अटी आपण मृत्यूसमोर दिवसरात्र ठेवत असतो. जगणं जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यू जाणून घेणं राहूनच जातं.

आपल्या व आपल्या जवळच्या माणसाच्या मृत्युपूर्व दुःखाची परिमाणं समजून घेण्यासाठी विवेकी आंतरिक संवादाची गरज असते. नेमका हा संवादच मृत्युपूर्व दुःखातील कोलाहलात राहून जातो. मग वेदनेसोबत येणारं दुःख अनाकलनीय होत जातं.

मृत्युपूर्व अस्वस्थता, प्रत्यक्ष मृत्यू, त्यानंतर काळजीवाहकाला वाटणारं दुःख हे सारं समजून घेण्याऐवजी टाळण्याकडे आपला कल वाढत जातो. मग दुःखाची कधी न सुटणारी निरगाठ होऊन बसते. त्यातून मागे उरलेल्यांचं मनःस्वास्थ्य हळूहळू बिघडू शकतं. घटना केव्हाच भूतकाळात वाहून गेलेली असते; मागे रेंगाळत राहते, जीवनाला ग्रासून टाकणारी असह्य अस्वस्थता !!

अशा वेळी - खरंतर त्याही आधी डॉ. संज्योतचे हे विवेकनिष्ठ, मृदू, संवेदनशील, सहजसोपे विवेचन समजून घेणे संजीवक ठरू शकेल.

©️We Read 🍀🙌🏻
हे पुस्तक We Read मधून घरपोच बोलवण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर Msg करा…❤️

https://wa.me/7066495828

https://chat.whatsapp.com/GflcupmFOtD5SExk8qsaU8s

Address

All Over
Buldana
443302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुस्तक घर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category