23/01/2026
प्रगतीचा संकल्प आणि श्रमदानाचा वारसा!
आज ग्रामपंचायत अनुराबाद तालुका मलकापूर, धानोरा विटाळी तालुका नांदुरा, कठोरा तालुका शेगाव येथे आयोजित विकासकामांच्या विशेष उपक्रमात लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. केवळ उपस्थितीच नाही, तर प्रत्यक्ष श्रमदान करून त्यांनी ग्रामस्थांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
जेव्हा लोकसहभाग आणि कामाची जिद्द एकत्र येते, तेव्हाच गावाचा कायापालट होतो. अनुराबादच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे.