16/03/2026
सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत जलसंधारणाचा 💧"भूजलतारा"💧 अतिवृष्टी व दुष्काळ परिस्थितीत ठरणार प्रभावी उपाय...
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामिण भागात
सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत "भूजलतारा" हे नाविन्यपूर्ण तंत्र शेतकऱ्यांच्या शेतात लोकसहभागातून तयार करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
शेतात पावसाचे पाणी ज्या ठिकाणी साचते अशा उताराचे ठिकाणी 5 फुट लांब, 5 फुट रुंद व 5 फुट खोल असा खड्डा खणून तो अडीच फुट सिमेंटच्या रिंगा त्यात मोठे दगड,लहान, दगड,खडी व वाळू तसेच ग्रीन नेटने बंद करून व सिमेंट रिग भोवती मोठी दगड अश्या पद्धतीने भरण्यात येतो.या प्रकल्पाला सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे माध्यमातून "भूजलतारा" असे समर्पक नाव दिले आहे.या प्रकल्पामुळे भूगर्भातील भूजल पातळी वाढवण्यास उपयुक्त ठरू शकते. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत सहज पोहोचेल आणि भूजल संवर्धन होईल.
तसेच अतिवृष्टी व जास्तीचे पाणी साचुन होणारे पिकाचे नुकसान टाळता येईल या भूजलतारामुळे जमिनीत पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल व पाणी व हव्याचे प्रमाण समान होऊन वापसा मिळाल्यामुळे पिक जोमदार येऊन उत्पनात वाढ होईल.
भूजलताराचे इतर महत्वाचे फायदे..
भूजल पातळीत वाढ: भूजलतारा मार्गे पावसाचे पाणी जमिनीत जाईल, ज्यामुळे भूजल पातळी वाढेल.
सिंचनासाठी मदत: भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासणार नाही.
जलसंवर्धन: पावसाचे पाणी वाचवले जाईल, ज्यामुळे पाण्याची बचत होईल.
मातीच्या गुणवत्तेत सुधारणा: भूजलतारामुळे जास्तीच्या पाण्यामुळे सुपिक माती वाहून न जाता तेथेच थांबणार व शेतीची,मातीची गुणवत्ता सुधारेल.
पिण्याच्या पाण्याची उपलब्धता: भूजल पातळी वाढल्याने पिण्याच्या पाण्याची उपलब्धता देखील वाढेल.
पर्यावरण संतुलन: भूजलतारा पर्यावरण संतुलन राखण्यास देखील मदत करेल, ज्यामुळे निसर्गाचे संवर्धन होईल.
कोरडा दुष्काळ व ओला दुष्काळ (अतिवृष्टी) या दोन्ही संकटात हा भूजलतारा फायदेशीर ठरणार असून कोरड्या दुष्काळात विहिरीला आधार व ओल्या दुष्काळ प्रसंगी अतिरिक्त साठणारे पाणी जमिनीत ओढून घेत जमिनीत वाफसा सुरळीत झाल्याने पिकाचे होणारे नुकसान थांबणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतात "भूजलतारा" हा नाविण्यपूर्ण उपक्रम करून घ्यावा असे आवाहन सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प भूजल अभियान टिमने केले आहे.