Zilla Parishad Chandrapur

Zilla Parishad Chandrapur Zilla Parishad Chandrapur

दिनांक 15/07/2026 ला सर्व गट विकास अधिकारी यांची विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली तसेच एप्रिल ते जून 2026 या कालावध...
15/07/2026

दिनांक 15/07/2026 ला सर्व गट विकास अधिकारी यांची विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली तसेच एप्रिल ते जून 2026 या कालावधीमध्ये 24 इंडिकेटरवर उत्कृष्ट काम करणाऱ्या 3 पंचायत समिती - ब्रम्हपुरी, पोंभुर्णा आणि भद्रावती यांना गटविकास अधिकारी यांच्या आढावा सभेत प्रमाणपत्र देऊन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पुलकित सिंह यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

ग्रामीण स्तरावरील प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटचे राज्यातील पहिले प्रशिक्षण बिबी येथे संपन्नसरपंचांनी केला गाव प्लास्टिक मुक...
15/07/2026

ग्रामीण स्तरावरील प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटचे राज्यातील पहिले प्रशिक्षण बिबी येथे संपन्न

सरपंचांनी केला गाव प्लास्टिक मुक्तीचा संकल्प

कोरपना : स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण २ अंतर्गत पिरामल फाउंडेशन तथा जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व नेतृत्व विकास' या विषयावरील जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा पंचायत लर्निंग सेंटर, जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबी येथे उत्साहात पार पडली. ग्रामीण स्तरावरील प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट विषयावरील राज्यातील हे पहिले प्रशिक्षण असल्याने या कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्रनाथ धस, सिनियर प्रोग्राम मॅनेजर हरीश पटेल (अहमदाबाद), सिनियर प्रोग्राम मॅनेजर आशुतोष व्यास (जयपूर), प्रोग्राम लीडर गीता वेणुगोपाल, प्रोग्राम मॅनेजर दीपक कलंकर (पिरामल फाउंडेशन, संभाजीनगर), प्रोग्राम लीडर रवींद्र बागुल (पिरामल फाउंडेशन, मुंबई), प्रोग्राम लीडर दृष्टी सहाय (पिरामल फाउंडेशन), गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, जिल्हा परिषद अधिकारी कृष्णकांत खानझोडे, जिल्हा परिषद अधिकारी संजय धोटे, सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, पंचायत विस्तार अधिकारी पंढरी गेडाम, पंचायत विस्तार अधिकारी दादाराव पवार तसेच ग्रामपंचायत अधिकारी संगेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेस कोरपना व जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामपंचायत बिबी येथील स्वच्छता दूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांनी प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया, पुनर्वापर, नेतृत्व विकास आणि ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींना जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबी येथील प्लास्टिक वेस्ट प्रोसेसिंग युनिटला प्रत्यक्ष भेट देण्यात आली. यावेळी प्लास्टिक युनिटचे संचालक जिलानी खाटीक यांनी युनिटची कार्यपद्धती, प्लास्टिक प्रक्रिया करण्याची संपूर्ण साखळी, यंत्रसामग्रीचा वापर व प्लास्टिक कचऱ्यापासून मूल्यनिर्मितीची प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक सादर करून सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रोग्राम मॅनेजर दीपक कलंकर यांनी केले.
ग्रामीण भागात प्लास्टिक कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त गावांच्या निर्मितीसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. ग्रामीण स्तरावरील प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट विषयावरील राज्यातील हे पहिले प्रशिक्षण असल्याने उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष स्वागत केले.

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या विकासकामांचा आमसभेत सर्वंकष आढावाआमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध व...
15/07/2026

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या विकासकामांचा आमसभेत सर्वंकष आढावा
आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांना विकासकामे गतिमान करण्याच्या सूचना

ब्रम्हपुरी, दि. 13 जुलै 2026 : ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित तालुकास्तरीय आमसभेत विविध विभागांच्या विकासकामांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण करून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
बैठकीच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक श्री. तुषार दांडगे, गट विकास अधिकारी यांनी केले. मागील आमसभेतील निर्णयांवरील अनुपालन अहवाल सादर करण्यात आला व त्यानंतर तालुक्यात सुरू असलेल्या तसेच पूर्ण झालेल्या विकासकामांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, सिंचाई, पंचायत राज, कृषी, आरोग्य, शिक्षण, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान, व्हीबी-जीरामजी, पशुसंवर्धन, ग्रामीण गृहनिर्माण (घरकुल), महावितरण, वन विभाग तसेच इतर विभागांच्या योजनांची प्रगती, प्रलंबित कामे आणि अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला.
सरपंच, प्रशासक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ प्रतिनिधींनी ग्रामपंचायत स्तरावरील विविध समस्या, प्रलंबित विकासकामे व स्थानिक गरजा सभेत मांडल्या. त्यावर आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले. विकासकामांची गुणवत्ता, निर्धारित वेळेत पूर्तता, विभागांमधील समन्वय आणि शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यासह श्री. खेमराजजी तिडके, श्री. राजेशजी कांबडे, श्री. प्रमोदजी चिमुरकर, श्री. थानेश्वरजी कायरकर, श्री. निलकंठजी माणापुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच श्रीमती कल्पना क्षीरसागर (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर), श्रीमती मंजीरी टकले (प्रकल्प संचालक), श्री. अतुलकुमार गायकवाड (मुख्य लेखा व वित्त अधिकारी), डॉ. अशोक कटारे (जिल्हा आरोग्य अधिकारी), श्री. दीनदयाळ मटाले (कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग), श्री. सुमित बेलपात्रे (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग), श्रीमती मीना साळुंखे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी - पंचायत), श्री. मच्छिंद्रनाथ धस (उपमुख्य कार्यकारी अधिकारी - पाणी व स्वच्छता), भागवत तांबे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म. बा. वि.),
संदीप खंबाईत जिल्हा जलसंधारण अधिकारी,श्रीमती अश्विनी केळकर (शिक्षणाधिकारी – प्राथमिक), श्रीमती पर्वणी पाटील (उपविभागीय अधिकारी), श्री. सतीश मासाळ (तहसीलदार), श्री. तुषार दांडगे (गट विकास अधिकारी), तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय सरपंच, प्रशासक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांवर विधायक सूचना मांडल्या. बैठकीमुळे विविध विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण होऊन विकासकामांना गती मिळण्यास, ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित प्रश्नांचे वेळेत निराकरण होण्यास आणि शासनाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
सभेचा समारोप श्री. रविंद्र घुबडे, सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती ब्रम्हपुरी यांनी आभार प्रदर्शन करून केला. त्यांनी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानले. आमसभा शांततापूर्ण आणि यशस्वी वातावरणात संपन्न झाली.

जनहिताला प्राधान्य देवुन कामे करा - मच्छिंद्रनाथ धसपंचायत समिती भद्रावती येथे विविध विकास योजनांचा आढावा बैठक चंद्रपुर(प...
09/07/2026

जनहिताला प्राधान्य देवुन कामे करा - मच्छिंद्रनाथ धस
पंचायत समिती भद्रावती येथे विविध विकास योजनांचा आढावा बैठक
चंद्रपुर(प्रतिनिधी), दि. 9 जुलै 2026 : पंचायत समिती, भद्रावती येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद, चंद्रपूर मच्छिंद्रनाथ धस यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास योजनांचा आढावा बैठक संपन्न झाली. विकासकामांमध्ये पारदर्शकता, वेळेचे नियोजन आणि जनहिताला प्राधान्य देत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन मच्छिंद्रनाथ धस यांनी केले आहे.
बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), प्रधानमंत्री आवास योजना, मालमत्ता कर पुनर्मूल्यांकन (Tax Re-Assessment) तसेच मान्सूनपूर्व व मान्सूनकालीन तयारी या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे निर्धारित कालावधीत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ वेळेत पोहोचविण्याबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले. मान्सून काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन, पाणी निचरा, स्वच्छता, आवश्यक सुविधा व विभागांमधील समन्वय यावर विशेष भर देण्याचे निर्देश धस यांनी दिले. विकासकामांमध्ये पारदर्शकता, वेळेचे नियोजन आणि जनहिताला प्राधान्य देत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहनही यावेळी केले. या बैठकीस पंचायत समिती भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. बंडु आकणुरवार , स्वच्छ भारत मिशनचे माहीती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे,संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी व भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती भद्रावती ग्रामीण विकास, स्वच्छता, गृहनिर्माण, रोजगार निर्मिती व नागरिकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने कार्यरत असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वेळेत व प्रभावीपणे पोहोचविण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

भद्रावती येथे कृषी दिन व हरीत क्रांतीचे प्रणेते वंसतराव नाईक जंयती तालुक्यातील 142 शेतकऱ्यांची उपस्थितीपंचायत समिती भद्र...
03/07/2026

भद्रावती येथे कृषी दिन व हरीत क्रांतीचे प्रणेते वंसतराव नाईक जंयती
तालुक्यातील 142 शेतकऱ्यांची उपस्थिती

पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने चंदनखेडा येथील मंडळ कृषी कार्यालयाच्या सभागृहात कृषी दिनाचा व हरीत क्रांतीचे प्रणेते स्व.वंसतराव नाईक यांचा जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सहा.गटविकास अधिकारीडॉ.बंडुआकनुरवार,
उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरीणखेडे, प्रमुख अतिथी तालुका कृषी अधिकारी सुुशिल आडे, कृषी अधिकारी महेंद्र डाखरे, मंडळ कृषी अधिकारी विकास चवले,पाणी फाउंडेशनचे रितेश सरफ ,ग्रामपंचायत संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश खरवडे,विस्तार अधिकारी प्रमोद ढोरे होते.प्रथम स्व.वंसतराव नाईक यांच्या प्रतिमेस द्विपप्रजल्वन करुन मालार्पण करण्यात आले.गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी तालुक्यातील चौदा उत्कृष्ट शेतकऱ्यांचा शाल,श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सबका प्रयास विकसित भारत 2047 अंतर्गत विकसित भारत जि राम जि अक्टचे एक जुलै पासुन देशात लागु होत असल्याची माहीती दिली. यावेळी डॉ.बंडुआकनुरवार यांनी राज्यात कृषी दिन माजी मुख्यमंत्री हरीत क्रांतीचे प्रणेते स्व.वंसतराव नाईक यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येत असून आपल्या कृषी प्रधान देशात कृषी संस्कृतीचे स्मरण व शेतकर्‍याविषयी कृतज्ञता म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगीतले.कविता हरिणखेडे यांनी महाविस्तार अँपचे अपलोड करुन पिकाचे किड व रोगविषयी माहीती व शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनाबाबत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी महेंद्र डाखरे संचालन प्रमोद ढोरे आभार प्रदर्शन एपीओ सुरज खोडे यांनी केले.कार्यक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक व शेतकरी,कृषी सखी,उमेदच्या महीला उपस्थित होते.

विजासन येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागतबैलबंडी मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष पंचायत समिती भद्रावती अंतर्गत जि...
03/07/2026

विजासन येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

बैलबंडी मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

पंचायत समिती भद्रावती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, विजासन व तालुक्यातील सर्व शाळामधुन नवीन शैक्षणिक वर्षांत नवागत विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची आनंददायी सुरुवात व्हावी या उद्देशाने विविध आकर्षक उपक्रम राबविण्यात आले.
जिप शाळा विजासन येथील कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सहा.गटविकास अधिकारी डॉ.बंडू आकनुरवार यांनी केले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर होते.प्रमुख पाहुणेनगरपरिषद उपाध्यक्ष सुधीरभाऊ सातपुते,नगरसेविका शिलाताई कुळमेथे, रितूताई अडबले अंबुजा फाउंडेशन, गजाननजी कामतवार अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती,सौ.उषाताई कन्नाके उपाध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती,जगनजी दानव, सुरजभाऊ उमाटे,शिवरकरजी उपस्थित होते.गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील जिप शाळेत व चिरादेवी जिप शाळेत उपस्थितीत शाळाप्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आले.
प्रथम पाहुण्यांच्या हस्ते नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची मंगल सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लेझीमच्या तालावर विद्यार्थीचे स्वागत करून त्यांना मंचावर आणण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी डॉ.बंडु आकनुरवार,डॉ.प्रकाश महाकाळकर,सुधीरभाऊ सातपुते यांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, संस्कार, गुणवत्तापूर्ण अध्ययन व उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. नवप्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण व शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन आयोजित करण्यात आले.कार्यक्रमानंतर सजविलेल्या बैलगाडीतून नवागत विद्यार्थ्याची ढोल तासाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ अनिता दशरथ पेंदाम संचालन सौ.विद्ये मॅडम आभार निलगिलवार सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ.अनिता दशरथ पेंदाम,कु अमृता जीवने, कु.सीमा वांदिले, कु.सुनिता चांदेकर या शिक्षिकांनी व बैलबंडी मालक जगदिश ढवस यांनी सहकार्य केले.

आज दिनांक 02/07/2026 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत कार्यर...
03/07/2026

आज दिनांक 02/07/2026 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत कार्यरत संस्था व विकास कामांना भेट देवून झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला व मार्गदर्शनपर सूचना दिल्या.
यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय मरेगाव, उमेद प्रभाग संघ कार्यालय मरेगाव, महिला बचत गट गुंजेवाही, प्राथमिक आरोग्य केंद्र गुंजेवाही, तांबेगडी मेंढा येथील मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तांबेगडी मेंढा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबेगडी मेंढा यांचा समावेश होता.
त्यानंतर पंचायत समिती सभागृह येथे घरकुल व रोजगार हमी योजना यांचा सखोल आढावा घेऊन मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्या.

सन्माननीय मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुलकित सिंग यांची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाटण इथे शाळाप्रवेशोत्सव का...
30/06/2026

सन्माननीय मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुलकित सिंग यांची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाटण इथे शाळाप्रवेशोत्सव कार्यक्रमास भेट.

29/06/2026

आवर्जून बघावी अशी पीएमश्री जिल्हा परिषद शाळा पेटगाव, पं.स. सिंदेवाही

वृत्तपत्र बातमी
25/06/2026

वृत्तपत्र बातमी

Address

Chandrapur

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+917172256401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Zilla Parishad Chandrapur:

Shortcuts

Share