सचिन भोयर अधिकृत sachin bhoyar

सचिन भोयर अधिकृत sachin bhoyar सामाजिक आणि राजकीय कामातून जनतेचे प्रश्न सोडविणे,सामाजिक बांधिलकी जपणे.निरंतर जनसेवा करणे.🙏

14/08/2026

“80 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास…!”
हातात पुस्तकं,डोळ्यांत स्वप्नं पण शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी जीव धोक्यात!

हे चित्र आहे राजुरा विधानसभा मतदारसंघातील बॉम्बेझरी गावाचं.

या विद्यार्थ्यांचा आवाज बना…
व्यक्त व्हा, आवाज उठवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
मुख्यमंत्री साहेबांनी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं याकरिता त्यांना मेंशन करा . 🙏


CMOMaharashtra Devendra Fadnavis Maharashtra DGIPR PMO India

11/08/2026

चंद्रपूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामाचा हा नमुना पाहा.
"अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, ठेकेदारांची मनमानी आणि कमिशनखोरी"

ग्रामीण भागातील विकासकामांचा दर्जा आणि राजकीय कंत्राटदारीचा विळखा!

जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात होणाऱ्या अनेक विकासकामांमध्ये अपेक्षित शंभर टक्के गुणवत्ता राखली जात नाही, हे एक कटू सत्य आहे. यामागे केवळ ठेकेदारच नाही, तर राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनाची निष्क्रियताही कारणीभूत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते.
आज अनेक ठिकाणी नेत्यांचे चेले-चपाटेच कंत्राटदार बनलेले आहेत. अनेक कंत्राटदार कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असल्याचे दिसून येते. आमदार-खासदारांचे बगलबच्चे शासकीय कामांवर आपला प्रभाव निर्माण करून बसले आहेत, असा आरोप जनतेतून होत आहे.
निवडणुकीच्या काळात “आपला आमदार निवडून आला पाहिजे, आपला खासदार निवडून आला पाहिजे” म्हणून हे राजकीय कंत्राटदार आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतात. उमेदवार निवडून आल्यानंतर त्याच राजकीय जवळिकीच्या माध्यमातून पुन्हा शासकीय कंत्राटे मिळवून निकृष्ट कामे केली जात असल्याचा आरोप होत आहे.याचा परिणाम मात्र थेट जनतेच्या पैशांवर आणि जनतेच्या विकासावर होत आहे.
यासाठी जनता देखील काही अंशी जबाबदार आहे. निवडणुकीच्या काळात मिळालेली दारू, वाटलेला पैसा किंवा क्षणिक स्वार्थाच्या आधारावर मतदान केले, तर पुढील पाच वर्षांत त्याची किंमत निकृष्ट रस्ते, नाल्या, पूल आणि इतर विकासकामांच्या रूपाने जनतेलाच मोजावी लागते.
यामुळे जिल्हा परिषदेमधील अनुभवी आणि गुणवत्तापूर्ण काम करणारे कंत्राटदार हळूहळू बाहेर पडत आहेत, तर कामाचा पुरेसा अनुभव नसलेले राजकीय कार्यकर्ते कंत्राटदार बनून शासकीय कामांमध्ये प्रवेश करत आहेत.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कामांची स्वतंत्र तांत्रिक पाहणी, गुणवत्ता तपासणी आणि नियमित ऑडिट होणे अत्यंत आवश्यक आहे.
मात्र प्रश्न असा आहे की, ज्या अधिकाऱ्यांवर या कामांच्या गुणवत्तेची देखरेख करण्याची जबाबदारी आहे, तेच जर डोळेझाक करत असतील तर त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे?

निकृष्ट कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते का?
कमिशनखोरीचे व्यवहार या दुर्लक्षामागे कारणीभूत आहेत का?
हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

जनतेच्या पैशातून होणाऱ्या प्रत्येक विकासकामाचा दर्जा जनतेच्या अपेक्षेप्रमाणे असलाच पाहिजे.

राजकीय कंत्राटदारीचा विळखा तोडून गुणवत्तेला प्राधान्य देणे आणि शासकीय विकासकामांचे पारदर्शक ऑडिट करणे ही काळाची गरज आहे.
संदेश : तुमच्या परिसरात सुरू असलेल्या बोगस निकृष्ट कामाची माहिती द्या आम्ही त्यावर कारवाई करू.

आपला सचिन भोयर

आता तरी प्रशासनाने जागे व्हावे!


Devendra Fadnavis PMO India

25/07/2026

"श्रीमंताचं खोटं खरं होतं, पण जीवघेण्या अवस्थेत असलेल्या गरीबाची तक्रारही घेतली जात नाही."😡

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आपला सचिन भोयर.

#निष्पक्ष_चौकशी
#जास्तीचेमॅटर्स
#गोंडपिपरी

12/07/2026

तहसीलमध्ये आवाज माझा होता,पण वेदना हजारो लोकांच्या होत्या.

आज मी एकटाच बोलत होतो, पण माझ्या आवाजामागे हजारो शेतकरी, कामगार, विधवा माता, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिकांच्या वर्षानुवर्षे साचलेल्या वेदना उभ्या होत्या.
अनेक नागरिकांच्या तक्रारीनुसार, सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी पैशांची मागणी होते, वेळेवर काम होत नाही, आणि एका साध्या कागदासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. माणूस तिथे उपकार मागायला नाही, तर आपल्या हक्काचं काम करून घ्यायला जातो. पण जेव्हा हक्कही संघर्ष करून मिळवावा लागतो, तेव्हा वेदना एका व्यक्तीच्या राहत नाहीत त्या संपूर्ण समाजाच्या होतात.आज उठलेला आवाज कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हता.
तो अन्याय, निष्काळजीपणा आणि चुकीच्या पद्धतींविरुद्ध होता.
"ही लढाई माझी नाही...
ही प्रत्येक त्या नागरिकाची आहे, जो भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहे"

एक वेदना कायम मनात राहते...
मी दोन निवडणुका हरलो. पण लोकांसाठी धावणं सोडलं नाही. कोणाचं काम अडलं, अन्याय झाला, सरकारी दारात हेलपाटे मारावे लागले की त्यांना माझी आठवण झाली आणि मी कधीच मागे हटलो नाही.
पण मतदानाचा दिवस आला की अनेकदा प्रश्न बदलतात. हक्क, काम आणि संघर्ष मागे पडतो; जात, धर्म, पक्षनिष्ठा किंवा इतर आमिषं पुढे येतात.तरीही माझा राग कोणावर नाही. कारण माझं राजकारण निवडणुकीपुरतं नाही ते त्या सामान्य माणसासाठी आहे


आपला
सचिन भोयर.

13/06/2026

साप बघताना एक विचार मनात आला...
सापाचे विष शरीराला इजा करते, पण माणसाच्या मनातील विष नातेसंबंध संपवते.

14/05/2026

😡“चंद्रपूरकरांच्या जीवापेक्षा अधिकाऱ्यांना टेंडर कमिशन महत्त्वाचे झाले आहेत का..?”
“पूर येण्यापूर्वी जागे व्हा…नाहीतर खूप उशीर होईल!” 🚨
इराई नदी खोलीकरणाचे काम चंद्रपूरला वाचवण्यासाठी आहे.पण जर त्यातच भ्रष्टाचार झाला, कमी दर्जाचं काम झालं तर उद्या हजारो कुटुंब धोक्यात येऊ शकतात.
करोडोंचे टेंडर काढून फक्त कमिशनखोरी करायची आणि जनतेचा जीव धोक्यात टाकायचा हे चंद्रपूरकर कधीच सहन करणार नाहीत.
हा फक्त नदीचा विषय नाही…
हा आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या जीवाचा प्रश्न आहे.
व्यक्त व्हा... हा व्हिडीओ CMOMaharashtra व Chandrapur Municipal Corporation
#इराईनदी #चंद्रपूर #भ्रष्टाचार #जनतेचाआवाज
आपला
सचिन भोयर

Address

Chandrapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सचिन भोयर अधिकृत sachin bhoyar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category