District Corona Control Cell, Chandrapur

District Corona Control Cell, Chandrapur District Corona Control Cell Chandrapur Official page of District Corona Control Cell, Chandrapur, Maharashtra

12/12/2022
17/09/2022

मोफत प्रिकॉशन डोजसाठी उरले केवळ 14 दिवस

Ø नागरिकांनी त्वरीत डोज घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 16 सप्टेंबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये नागरिकांना मोफत प्रिकॉशन डोज देण्यात येत आहे. या मोफत डोजचे केवळ 14 दिवस आता शिल्लक राहिले आहे. त्यांनतर मात्र नागरिकांना खाजगी रुग्णालयात 400 रुपये देऊन प्रिकॉशन डोज घ्यावा लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी शासकीय संस्थेतून त्वरीत मोफत प्रिकॉशन डोज घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

प्रिकॉशन डोजकरीता 18 वर्षांवरील नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुस-या डोजनंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा. जिल्ह्यात प्रिकॉशन डोजकरीता पात्र लाभार्थ्यांची संख्या 13 लक्ष 73 हजार 192 आहे. यापैकी आतापर्यंत 1 लक्ष 79 हजार 162 लाभार्थ्यांनी प्रिकॉशन डोज घेतला असून ही टक्केवारी 13.05 आहे. सद्यस्थितीत 11 लक्ष 94 हजार 30 नागरिकांचा प्रिकॉशन डोज बाकी आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. मात्र सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे नागरिक बिनधास्त झाले आहे. कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेता प्रिकॉशन डोज घेणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र प्रिकॉशन डोजबाबत नागरिकांचा निष्काळजीपणा निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी नजीकच्या शासकीय संस्थेत जाऊन प्रिकॉशन डोज घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोविड लसीकरणाचे एकूण पात्र लाभार्थी 16 लक्ष 41 हजार 830 आहे. यापैकी 15 लक्ष 85 हजार 580 जणांनी पहिला डोज (96.57 टक्के) तर दुसरा डोज 13 लक्ष 73 हजार 192 जणांनी (83.64 टक्के) घेतला आहे. 12 ते 14 वयोगटातील पात्र लाभार्थी 71746 असून, पहिला डोज 64665 (90.13 टक्के), दुसरा डोज 42018 जणांनी (58.56 टक्के) घेतला आहे. 15 ते 18 वयोगटातील पात्र लाभार्थी 1 लक्ष 9 हजार 190 आहे. यापैकी पहिला डोज 77422 (70.95 टक्के), तर दुसरा डोज 54221 जणांनी (48.66 टक्के) घेतला आहे.

०००००००

17/07/2022
16/07/2022

शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर आता प्रतिबंधात्मक डोज मोफत

Ø 15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’

चंद्रपूर, दि. 15 जुलै : केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 (75 दिवस) या कालावधीमध्ये ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत सर्व शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर प्रतिबंधात्मक (बुस्टर) डोज आता मोफत मिळणार आहे. 18 वर्षावरील नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुस-या डोजनंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा. जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी प्रतिबंधात्मक डोज घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय गुल्हाने यांनी केले आहे.

कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सवाअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, आठवडी बाजार आदी ठिकाणी विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करावे. गणेशोत्सवादरम्यान सर्व गावांमध्ये गणेश मंडळांच्या सहाय्याने लसीकरण शिबिर घेण्यात यावे. जिल्हा व तालुकानिहाय तसेच लसीकरण केंद्रनिहाय लसीकरण सत्रांचे आयोजन करावे. स्थानिक स्थरावरून दर आठवड्याला लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात यावा. जिल्हा व तालुका स्तरावरून लसीकरण केंद्रनिहाय दुसरा डोज व प्रतिबंधात्मक डोज राहिलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या देण्यात याव्या.

जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील कॉल सेंटर मार्फत दुसरा डोज व प्रतिबंधात्मक डोज राहिलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना लस घेण्याबाबत पाठपुरावा करावा. उपलब्ध असलेल्या लसींचा वापर करून लस मुदतबाह्य होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत हरदस्तक मोहीम राबविण्यात येत असून आरोग्य चमू मार्फत घरोघरी जाऊन पात्र लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचा प्रतिबंधात्मक डोज देण्यात यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिका-यांना दिल्या आहेत.

००००००००

16/07/2022

शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर आता प्रतिबंधात्मक डोज मोफत

Ø दहा लाख 43 हजार 853 नागरिकांसाठी डोजचे नियोजन

Ø 15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव

चंद्रपूर, दि. 16 जुलै : केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 (75 दिवस) या कालावधीमध्ये ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत सर्व शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर प्रतिबंधात्मक (बुस्टर) डोज आता मोफत मिळणार आहे. 18 वर्षावरील नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुस-या डोजनंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा.

सध्या स्थितीत जिल्ह्यातील 18 वर्षांमधील लसीकरणाकरिता पात्र लाभार्थ्यांची संख्या 16 लक्ष 41 हजार 830 असून पहिला डोज 15 लक्ष 83 हजार 281 (96.43 टक्के) नागरिकांना दिला आहे. दुसरा डोस 13 लक्ष 54 हजार 425 ( 82.93 टक्के) नागरिकांनी घेतला आहे तर 35097 नागरिकांनी प्रतिबंधात्मक डोस घेतला आहे. जिल्ह्यातील आणखी 10 लक्ष 43 हजार 853 लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक डोज देण्यात येणार आहे.

कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सवाअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, आठवडी बाजार आदी ठिकाणी विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. गणेशोत्सवादरम्यान सर्व गावांमध्ये गणेश मंडळांच्या सहाय्याने लसीकरण शिबिर घेण्यात येतील.

सदर मोहिमेचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी आपला प्रतिबंधात्मक डोस जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन मोफत घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले आहे.

00000

12/06/2022

मागील २ वर्षांत कोविडमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात १५ जून तर विदर्भात २७ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे निर्देश. परिपत्रक जारी.

07/06/2022

Ex-gratia relief to the deceased persons due to Covid-19 in the state of Maharashtra.

Address

Collector Office Chandrapur
Chandrapur
442401

Alerts

Be the first to know and let us send you an email when District Corona Control Cell, Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

चंद्रपूर जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाचे अधिकृत फेसबुक पेज

--> माहिती, तक्रार आणि मदतीसाठी 1077 व 07172-261226 --> सार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेचा क्र 07172-254614 . --> कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी 07172-253275, 07172-261226 --> उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालय 07172-270669 --> रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी 07172-251597, तसेच टोल फ्री क्रमांक 1077