Rapid Response Team Tadoba Andhari Tiger Reserve

Rapid Response Team Tadoba Andhari Tiger Reserve Rapid Rescue team of tadoba Andhari Tiger reserve Vidharbha landscape,MH

03/01/2026

Rove Jungli तुमच्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे शार्प शूटर अजय मराठे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे फील्ड ....

18/05/2024 रोजी सकाळी 11.00 वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र (बफर)खडसंगी परिक्षेत्रातील नियतक्षेत्र निमढेला मधील कक्ष क्रम...
21/05/2024

18/05/2024 रोजी सकाळी 11.00 वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र (बफर)खडसंगी परिक्षेत्रातील नियतक्षेत्र निमढेला मधील कक्ष क्रमांक 59 मध्ये भानुसखींडी
वाघिणीचा 🐅 ने 7-8 महिन्याच्या कालावधीत 2-3 इसमास ठार केल्याने मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याने वरिष्ठ वन अधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर घटना परिसरात दाखल झाली, व अवघ्या दोन दिवस अभियान क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्याने राबवून -1 🐅 ला ने सुखरूप रित्या बेशुद्ध करून जेरबंद केले व सदर वाघास ने गोरेवाडा प्राणी बचाव केंद्र येथे स्थलांतरित केले.
सदर कार्यवाही ही मा. महीप गुप्ता साहेब,प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव)महाराष्ट्र राज्य, नागपूर, मा.जितेंद्र रामगावकर साहेब, क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र, चंद्रपुर, श्री. कुशाग्र पाठक साहेब, उपसंचालक (बफर) ताडोबा यांचे मार्गदर्शनात वाघास जेरबंद करण्यात आले,
सदर मोहिमेत डॉ. आर. एस. खोब्रागडे,पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,श्री. राकेश आहुजा (बायोलॉजिस्ट) आर. आर. टी. सदस्य श्री.दिपेश टेंभुर्णे, श्री. योगेश लाकडे, श्री. गुरुनानक ढोरे, श्री. वसीम शेख, श्री. विकास ताजने, श्री. प्रफुल वाटगुरे, श्री. अमोल कोरपे,श्री. अक्षय दांडेकर, वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. , वनपरीक्षेत्र अधिकारी देऊळकर व वनपरीक्षेत्र खडसंगी व चिमूर येथील क्षेत्रीय वन कर्मचारी, अधिकारी, मजूर, रोजंदारी मजूर यांचे सहकार्य लाभले यांनी महत्वाची भूमिका बजावली.
तसेच आम्हाला सदैव मार्गदर्शन करणारे मा.एन.आर.प्रवीण सर, मुख्य वनसंरक्षक पुणे, मा.जी.गुरुप्रसाद सर, उपवनसंरक्षक कोल्हापूर, मा.डॉ.रामगावकर सर, मुख्य वनसंरक्षक, मा.पाठक सर, उपसंचालक, यांचे खूप-खूप धन्यवाघ🐅🌳🐾
🐅cubs 🐾🐾

Injured tiger tranquilised in Wadsa division, sent to Gorewada Zoo    A tiger that has been roaming in an injured condit...
10/02/2024

Injured tiger tranquilised in Wadsa division, sent to Gorewada Zoo


A tiger that has been roaming in an injured condition in Shivrajpur forest area in Wadsa division has been tran- quillised by the forest depart- ment and has been sent to Gorewada Wildlife Research and Rescue Centre in Nagpur for further treatment.
found that the animal was sleeping in compartment number 93 of Shivrajpur in a fence channelling of the mixed plantation and was not able to run,
On February 8, the veterinary doctor from TATR Dr Ravikant Khobragade, sharp shooter Ajay Marathe and the team were called to the spot. The team tranquillised the tiger and conducted the primary treatment on the injury. The tiger had received an in- jury in the right leg. After the treatment, the tiger was shifted to the Gorewada Zoo for further treatment.
During the said action, under the guidance of Mr. Probationary , Mr. Vijay Dhande, range Forest Officer wadsa and wadsa range Forest Staff, Forest Labourers, Daily wage Labourers

were present at the incident site and cooperated, Rapid Rescue Team member Shri. Yogesh Lakade, Wasim Shaikh, Praful Vadgure, Guru Nanak Dhore, Vikas Tajne, Dipesh Tembhurna, Train Driver (RRT), Mr. Akshay Dandekar, Mr. Amol Korpe, Driver Mr. Mannan Shaikh, Driver,
with the support of. To speed up this Rescue Operation ,Hon. N.R. Praveen Sir, Chief Conservator of Forest Pune, Hon. Dr. Ramgaonkar Sir, Chief Conservator of Forests, Hon. Sir, Deputy Conservator of Forests, Kolhapur, as well
Many thanks to Wadsa Forest Division field staff




🐅🌳🐾

मुलचेरा व अहेरी तालुक्यात धुमाकुळ घालणा-या    मानव वन्यजीव संघर्षातील   मादी वाघिणीस जेर बंद करण्यास वन विभागाला यश    ,...
21/01/2024

मुलचेरा व अहेरी तालुक्यात धुमाकुळ घालणा-या मानव वन्यजीव संघर्षातील मादी वाघिणीस जेर बंद करण्यास वन विभागाला यश ,
मागील काही महिन्यांपासून मुलचेरा व अहेरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या मादी वाघिणीने आतापर्यंत दोन मनुष्यांना गंभिर जखमी केले तर दोन महिलांना ठार मारले होते, मादी वाघीण T6 मुळे मानवी जिवीतास धोका निर्माण झाला होता दिनांक 16-01-2024 पासून जलद बचाव पथक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर या आलापल्ली वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर मादी वाघीणीवर पाळत ठेवून मानवी जीवितास धोका ठरलेल्या वाघीणीस भविष्यातील मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता दिनांक 18-01-2024 चे रात्री ने मधील रेंगेवाही उपक्षेत्रांतर्गत रेगेवाही नियतक्षेत्रातील ला हस्तांतरीत केलेल्या CN_270 मध्ये रात्री 10.00 वाजता पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर तथा रॅपीड रेस्क्यू टीम प्रमुख, पोलीस नाईक (शुटर), # यांनी मुलचेरा व अहेरी तालुक्यात धुमाकुळ घालणा-या मानव वन्यजीव संघर्षातील मधील T6मादी वाघिणीस जेर बंद करण्यास ला यश प्राप्त आले.
वाघिणीचे अभियान यशस्वी करण्यास आम्हाला सदैव मार्गदर्शन करणारे मा.एन.आर.प्रवीण सर, मुख्य वनसंरक्षक पुणे, Hon Guru Prasad G , उप वनंरक्षक कोल्हापूर, तसेच मा.डॉ.रामगावकर सर, वनसंरक्षक, CF sir, मा.काळे सर, मा.पाठक सर, उपसंचालक, Dycf,
यांचे खूप-खूप धन्यवाघ🌳🌳🐾
🐾🐾

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनपरीक्षेत्रातील  #वेजगाव व परिसरात आठवडाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबं...
09/12/2023

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनपरीक्षेत्रातील #वेजगाव व परिसरात आठवडाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात *जलद बचाव पथक* ला यश आले. गुरुवारी सायंकाळी त्याला सापळा लाऊन पकडण्यात आले.
गेल्या 10-15 दिवसापासून बिबट्याने गावात प्रवेश करून पाळीव जनावरांना आपले भक्ष करण्याचा सपाटा लावला होता. बिबट हा सायंकाळी गुरे-ढोरे, पाळीव प्राणी शेतातून - जंगलातून गावात परतन्याच्या अगदी काही वेळेत गावाच्या वेशित प्रवेश करायचा, जणू त्यांचा पाठलाग करतच गावात प्रवेश करायचा, दरम्यान अनुचित प्रकार घडून मानव वन्यजीव संघर्ष उदभवण्या अगोदर सदर घटनेची गंभीरता लक्षात घेत वनविभागाने बिबट्याच्या गावात ये-जा करण्याच्या भ्रमण मार्गावर व लावले होते. परंतु सदर बिबट्या हा भक्षाच्या लालचे पोटी सामान्य बिबट्या प्रमाणे पिजऱ्यात येत नव्हता, बिबट्या हा पिंजऱ्या समोर येऊन बसायचा, पिंजऱ्या भोवती फिरायचा परंतु पिंजऱ्यात येण्याचे नाव घेत नव्हता, 10-15 दिवसा पासून सतत घटना सारखीच सुरु होती.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मा. डॉ. रामगावकर साहेब, मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर, यांनी ला बिबट त्रास देत असलेल्या ठिकाणी म्हणजेच #वेजगांव ला जाऊन बिबट लवकरात लवकर पकडण्यास सांगितले, ने आज पर्यंत असे अनेक केले आहे जे मध्ये होत नाहीत, आमच्या अनुभवाचा पीटारा सोबत घेऊन आम्ही सर्व चमू सदस्या सह घटना स्थळावर #वेजगांव येथे वनपरीक्षेत्र अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांचे सोबत दुपारी 2:30 वा. पोहचलोत. बिबट हा #वेजगांव च्या मागील बाजूस गाव आणी शेतीच्या मधोमध एक पांदन रस्ता व लागलेल्या झुडपाचा सहारा घेत गावांत प्रवेश करायचा, आम्ही सदर परिसराची पाहणी केली, सोबतच आम्ही बिबट्याचे मधील बिबट्याच्या फोटोचे अवलोकन केले सोबतच क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने यांचे सोबत बिबट संबंधी चर्चा केली, त्यांनी बिबट जेरबंद करण्या करिता काय उपाय योजना केल्या व त्यामुळे बिबट्या वर काय परिणाम झाला जेणे बिबट पिंजऱ्यात येत नव्हता, सर्व बेबीचे अवलोकन करून शेवटी





यांचे सोबत
कसा करता येईल त्या करिता पिंजऱ्यात व सभोवताल परिसरात काही तंत्रशुद्ध बदल केले, अंधार पडत असल्याने होण्याची वेळ झाली होती, आम्ही लगेच घटनास्थळ सोडले.
आमच्या तंत्रशुद्ध बदलाचे फलीत बिबट 10-15 दिवसा पासून पिंजऱ्यात जेरबंद न होणारा बिबट काल गुरुवारला म्हणजे त्याच दिवशी पिजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याला पकडण्यात शेवटी वनविभागाला यश आले 🐾

तप्त हृदय को सरस स्नेह से, जो सहला दे, मित्र वही है।रूखे मन को सराबोर कर जो नहला दे, मित्र वही है।प्रिय वियोग, संतप्त चि...
08/08/2023

तप्त हृदय को सरस स्नेह से, जो सहला दे,
मित्र वही है।
रूखे मन को सराबोर कर जो नहला दे,
मित्र वही है।
प्रिय वियोग, संतप्त चित्त को जो बहला दे,
मित्र वही है।
अश्रु बूँद की एक झलक से जो दहला दे,
मित्र वही है।

👬🏻मित्रता दिवस की हार्दिक मेरे सारे दोस्तोको बधाई और शुभकामनाएं । 🌳🐾

21/07/2023
भारतातील पहिला व महाराष्ट्रातील पहिला वाघ स्थलांतराच्या अभियानाला महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाणी भारतीय वन्यजीव संस्था...
21/05/2023

भारतातील पहिला व महाराष्ट्रातील पहिला वाघ स्थलांतराच्या अभियानाला महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाणी भारतीय वन्यजीव संस्था, देहारादुन व जलद बचाव पथक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, यांच्या समवयानी वाघ स्थलांतराच्या मोहिम ब्रह्मपुरी वनविभागात नोव्हेंबर 2022 पासून सुरु केली , अनेक दिवस अनेक प्रयत्न करून सुद्धा मोहिमेला एक ही सफलता मिळत नव्हती, सफलता मिळावी म्हणून अनेक दिवस डेरा लावून वाघीण पकडण्याचे प्रयत्न करीत होती, तब्बल सहा महिने लोटून गेले,आमच्या सोबत अनेक तज्ञ मंडळींनी सुद्धा प्रयत्न केले त्यांना सुद्धा सफलता प्राप्त झाली नाही,
शेवटी प्रयत्नाला कोळसा व कारवा वनपरीक्षेत्राच्या मदतीने यश आलेच T4-C2 वाघिणीला जलद बचाव पथक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, ने बेशुद्ध करून पिंजरा बंद केले, व वाघिणीस नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प मध्ये नेण्याचे नियोजन केले, सहा महिन्या पासून अशुभ नक्षत्राला शुभ नक्षत्र मिळालेच, व्याघ्र स्थलांतराच्या मोहिमेला पहिली सफलता मिळाली.
आरमोरी वनपरीक्षेत्र, वडसा वनविभाग,, गडचिरोली मध्ये वाघीण पकडन्या करिता नियोजन एक आठवळ्या पासून सुरु होते वाघिणीची हालचालवर लक्ष ठेवून होतोच, वाघीण T4-C2 मिळताच आरमोरी येथून आला की, वाघीण अभियान क्षेत्रात आलेली आहे, आम्ही दुसऱ्याच दिवशी आरमोरी येथे पोहचलो, पहाटे अभियान क्षेत्रात जाऊन नियोजन-बद्ध रित्या वाघिणीस अवघ्या 1 तासांनी 32 मी. T4 नामक वाघिणीस जेरबंद केले,
अश्या दोन वाघिणीस आम्ही नवेगाव नागझिरा येथे स्थलांतरित केले, त्या वाघिणीस नवेगाव नागझीरा येथे नवीन अधिवासात, नवीन घरा मध्ये आपले आयुष्य जगण्या करीत आज रोजी मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री वने, यांचे हस्ते निसर्ग मुक्त करण्यात आले.
या सर्व अभियानात रात्र दिवस जलद बचाव पथक सतत कार्यरत होती, यातील एक एक सदस्य आपले खाजगी पारिवारिक कामे सोडून धडाडीने वाघीण पकडण्या करिता झटत होता, आज वाघिणीला निसर्गात पुन्हा सोडल्याने कामाला फलीत मिळाले.
• त्याच कारण ही तसंच आहे, कारण आज पर्यंत हे मानव वन्यजीव संघर्षातील वन्यप्राणी जेरबंद करून प्रामुख्याने वाघास कायम बंदिस्त अधिवासात सोडले आहे, परंतु भारतातील पहिल्याच वाघ स्थलांतराच्या अभियानात वाघिणीस जेरबंद करून शास्त्रीय दृष्ट्या नियोजन बद्ध पद्धतीने दोन वाघिणीस ने मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपूर व मा. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचे मार्गदर्शनात जेरबंद करून त्या वाघिणीस या व्याघ्र प्रकल्पात निसर्ग मुक्त केले.
• या सर्व अभियानात आमच्या जलद बचाव पथकाला नेहमी मार्गदर्शन करणारे मा.एन.आर.प्रवीण सर, मुख्य वनसंरक्षक पुणे, हे मागील महिन्यात चंद्रपूर येथे असलेल्या वरिष्ठ वन अधिकारी यांच्या कार्यशाळेत आले होते त्या वेळेस त्यांची भेट घेतली असता त्यांनी मार्गदर्शन तर केले आणी प्रोत्साहन देऊन म्हटले की तुम्हीच वाघ स्थलांतराच्या अभियानाला सार्थक करू शकता, आणी तसें झाले सुद्धा, सोबतच मा.जी.गुरुप्रसाद सर, उप वनंरक्षक कोल्हापूर, तसेच मा.डॉ.रामगावकर सर, वनसंरक्षक, मा.काळे सर, मा.पाठक सर, उपसंचालक, ता.अं.व्या.प्र, मा. मानकर सर, वन संरक्षक गरचिरोली, मा. सालविठ्ठल साहेब, उपवन संरक्षक, वडसा वनविभाग, #ब्रह्मपुरीवनविभाग & यांचे खूप-खूप धन्यवाघ🌳🌳🐾 🐾🐾
Translocation project: Tigresses set free in Nagzira disregarding release norms - http://toi.in/Px5-Lb/a31ga8

Use the TOI app to get Breaking news and headlines. Download now:
https://timesofindia.onelink.me/efRt/ASmwebshare

  मधील 50 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी यांना महाराष्ट्रातील     हे मानव वन्यजीव संघर्षात हाताळण्याचे ते ही भारतात सर्वात ज...
26/04/2023

मधील 50 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी यांना महाराष्ट्रातील हे मानव वन्यजीव संघर्षात हाताळण्याचे ते ही भारतात सर्वात जास्त वाघ असलेल्या जिल्ह्यात कश्या प्रकारे कार्य करतात हे कार्य करीत असताना कोण कोणत्या अडचणी येतात, या विषयावर अभ्यासू व चिकित्सक दृष्टीकोणातून सर्व माहिती दिली.
ची व्याघ्र व वन्यप्राणी बचावात व मानव वन्यजीव संघर्षात कश्या प्रकारे कार्य करत आहे, या कार्यात स्वरक्षणाच्या दृष्टीने काय काय उपाय योजना आम्ही करतो,बचाव साहित्य कुठले वापरतो या संबंधी माहिती दिली सोबतच बचाव कार्यात नावीन्य पूर्ण काय काय उपाय योजना करता येईल, व नावीन्य पूर्ण संसाधनाचा उपयोग कश्या प्रकारे करून मानव वन्यजीव संघर्षात हाताळत आहोत , सोबतच त्यानं
अश्या विविध साहित्य व संसाधनाची माहिती दिली.
सोबत प्रशिक्षणार्थी चमुन कडून विचारण्यात आलेल्या चिकित्सक प्रश्नाला माहिती व मार्गदर्शन केले.
सर्वांचे खूप खूप धन्यवाघ तसेच आम्हाला सदैव मार्गदर्शन करणारे मा.एन.आर.प्रवीण सर, मुख्य वनसंरक्षक पुणे,मा.जी.गुरुप्रसाद, उप वनंरक्षक कोल्हापूर, तसेच मा.डॉ.रामगावकर सर, वनसंरक्षक, श्री.आमलेंदु पाठक सर,CASFOS, मा.काळे सर, मा. पाठक सर, उपसंचालक, मा. खोरे सर, डॉ. खोब्रागडे सर, ता.अं.व्या.प्र. व यांचे खूप-खूप धन्यवाघ🌳🌳🐾

06.02.2023 रोजी भारतीय वनसेवेतील   च्या 100 पेक्षा अधिक  प्रशिक्षणार्थी चमुने त्यांच्या अभ्यास दौऱ्या मध्ये महाराष्ट्रात...
07/02/2023

06.02.2023 रोजी भारतीय वनसेवेतील च्या 100 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी चमुने त्यांच्या अभ्यास दौऱ्या मध्ये महाराष्ट्रातील सर्व बचाव साहित्यानी सुसज्ज असलेल्या च्या कार्यालयाला भेट देऊन, महाराष्ट्र वनविभाग हे मानव वन्यजीव संघर्षात कश्या प्रकारे कार्य करतात या विषयावर अभ्यासू व चिकित्सक दृष्टीकोणातून सर्व माहिती जाणून घेतली, त्या सर्वांना , कश्या प्रकारे बचाव कार्य करतात व ते कार्य करीत असताना काय काय अडचणी येतात,आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कश्या प्रकारे बचाव कार्यात निर्यात्मक मदत होते,
तसेच खऱ्या बचवा कार्यात काय वेगळ असतं तेही पुस्तकातील जगा पेक्षा पूर्णपणे वेगळं असतं, हे त्यानं पटवून देण्याचा प्रयत्न केला. ताडोबाचे , हे विदर्भात व्याघ्र बचावात व मानव वन्यजीव संघर्षात कश्या प्रकारे कार्य करत आहे , या कार्यात स्वरक्षणाच्या दृष्टीने काय काय उपाय योजना आम्ही करतो,बचाव साहित्य कुठले वापरतो या संबंधी माहिती दिली. सोबत प्रशिक्षणार्थी चमुन कडून विचारण्यात आलेल्या चिकित्सक प्रश्नाला माहिती व मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणार्थी चमू ला ने मानव वन्यजीव संघर्षातील चार बिबट या वन्य प्राण्याला त्यातील दोघांला ठार मारण्याचे आदेश असताना सुद्धा जंगलामध्ये मध्ये करून सुखरूप रित्या बेशुद्ध केले व त्या वन्यप्राण्याचे जीव वाचविले, हि घटना खूब प्रेरणादायी वाटली......Thanks to all .
भारतातील सर्व राज्यात भविष्यात कार्यरत होणाऱ्या भारतीय वनसेवेतील प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शनाची व करीत असलेल्या कार्याची माहिती देण्याची संधी ला मिळाली. ही बाब आमच्या करिता अभिमानाची आहे. हि संधी आम्हाला प्राप्त करून दिल्या बद्दल वनविभागातील वरिष्ठ अधिकारी यांचे खूप खूप धन्यवाघ तसेच आम्हाला सदैव मार्गदर्शन करणारे मा.एन.आर.प्रवीण सर, मुख्य वनसंरक्षक पुणे,मा.जी.गुरुप्रसाद, उप वनंरक्षक कोल्हापूर, तसेच मा.रामगावकर सर, वनसंरक्षक, मा.काळे सर, मा. पाठक सर, उपसंचालक, मा. खोरे सर, डॉ. खोब्रागडे सर, ता.अं.व्या.प्र. व यांचे खूप-खूप धन्यवाघ🌳🌳🐾

CT-1 वाघ(मृत्यू च्या दारातून ओढून आणणारा प्रवास)                     दहा महिन्या पासून चंद्रपूर,  भंडारा, गोंदिया, गडचिर...
20/10/2022

CT-1 वाघ
(मृत्यू च्या दारातून ओढून आणणारा प्रवास)
दहा महिन्या पासून चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्या मध्ये मानव वन्यजीव संघर्ष निर्माण करणाऱ्या ला वडसा वन विभागात जावून सतत दीड महिना वाघ बचावाचे कार्य आमच्या जलद बचाव पथक, ताडोबा अंधारी व्याघ् प्रकल्पा कडून सुरू होते.
च्या अभियानात नैसर्गिक दृष्ट्या अनेक अडचणी येत होत्या, मुख्य समस्या तर चे जाळे, एका बाजुला उभे असल्या नंतर दुसऱ्या बाजूला जायचे असल्यास एक ते दीड किलोमिटर वळुन जावं लागायचं, सोबतच झुडपी काटेरी जंगलं, महत्त्वाचे म्हणजे ला निसर्गाचा आशीर्वाद होता, जेव्हा कधी अभियान सुरू केले की, पावूस सुरु होवून जायचा, चे रात्री च्या वेळेस भ्रमण असायचे, आणि आम्ही त्याला सकाळी मध्ये बघून रणनीती ठरवत असो, वाघाचे पायाचे ठसे बघून चमू द्वारे व आम्ही स्वतः जंगलात प्रवेश करून वाघाचा शोध घेण्याचा सुध्दा प्रयत्न केला, पण वाघ आमच्या पेक्षा दुप्पट हुशार, वाघाने स्वतःचा नेहमी वावर असणारा रस्ता वापरणे बंद केले, आणि वाघ शेताच्या बांधावरून चालायला लागला, नवीन नवीन प्रयोग करून सुध्दा वाघ काही, जाळ्यात येत नव्हता, अनेक वेळेस ने मारलेल्या कील वर सुध्दा यायचा नाही.
अनेक वेळेस त्याने मारलेल्या kill वर T-1 वाघ यायचा व ने मारलेला बेट स्वतः खायचा, व ला जणू चेतावणी द्यायचा की हे, माझे घर आहे, यावर माझा अधिकार आहे, या क्षेत्रात तु यायचे काय, बघू सुध्दा नको, नाही तर, जीवाशी मुकावे लागेल. हा T-1 वाघाचे क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्नात असल्याने. चे सर्व क्षेत्र त्याच्या गैर हजेरीत फिरून यायचा आणि # T_1_Tiger जवळ पास आला की ते क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी चालला जायचा, अक्षरशः 10-15 किलोमिटर चालायचा, 4-5 दिवस दिसेनासा व्हायचा, आणि जेव्हा मध्ये दिसायचा त्या वेळेस एखादी मनुष्य हानी झालेली असायची, अनेक वेळेस आम्ही जंगलाला आपले घर करून दोन- दोन दिवस घालवले, पण त्याचा उपयोग झाला नाही, सर्व शर्तीचे प्रयत्न सुरू होते पण यश काही हाताशी येण्याचे नाव घेत नव्हता, त्यात वाघाचे मनुष्य मारण्याच्या घटनेत वाढ होतच होती, आणि जन सामन्यात वन विभागा प्रती आक्रोश वाढायला लागला होता, आणि आम्ही यशा पासून दूर दूर जात होतो. आपली नैसर्गिक जगण्याची कला हरपला होता………?
चा अभ्यास करत असताना आम्हीं नवीन नवीन कल्पणाला जीवीत करीत होतो, जसे , , , , , अनेक प्रयत्न करुन काही यश हाती लागताना दिसत नसल्याने, माझ्या बुध्दी मध्ये नवीन कल्पना चा परत जन्म झाला, ती म्हणजे , मी हा विषयी सैन्य दला मध्ये बघितला होता, ही युक्ती किती कारगल ठरेल हे सांगता येणार नव्हतं, काही तरी करणे गरजेचे सुध्दा होते, कारण ला आम्हीं लवकरात लवकर पकडले नाही तर ला ठार मारण्याचे आदेश निघाले असते, आणि त्या मुळे ची नाचक्की झाली असती सोबतच एक सुंदर अश्या जीवाला मुकावं लागलं असत, त्या मुळे हया युक्तीस ला मी sir यांना सांगितले, चे सर्व नियोजन व कार्य करण्या संबंधी चर्चा आमच्या च्या सर्व सदस्या समोर केली, अंतता आम्ही नियोजना प्रमाणे तयार करण्यास प्रारंभ केले, तयार झाले त्याला आम्हीं चारही बाजूंनी माती टाकून बुजवून घेतले, च्या वरच्या बाजुस नैसर्गीक रीत्या पूर्ण झाकून घेतले, पूर्ण झाल्या नंतर आम्ही सुध्दा दोन दिवसांनी ती जागा ओळखत नव्हतो, येवढे नैसर्गिक रित्या जुळले होते.
दिनांक:- 12.10.2022 रोजी पहाटेच्या सुमारास ने वडसा- कुरखेडा रोड वरील वळू माता केंद्र वडसा येथे पहाटे च्या सुमारास गाय मारली, आम्हाला ही माहिती 6.30 च्या दरम्यान कळाली, आम्ही लगेच घटना स्थळावर पोहचून जलद गतीने तयार होणारी व आपल्याला बसायला सोईस्कर ठरणारी तयार करून सायंकाळ पर्यंत बसून ची वाट बघत होतो, परंतु, हा वळू माता केंद्र येथे न येता एकलपुर च्या वरच्या बाजूला बांधलेल्या बेट जवळ सायंकाळी ने जावून बेट मारला, आम्ही ही सर्व दृश्य , मध्ये बघत होतो, आम्ही लगेच वळू माता केंद्र येथील वरून उतरून वाहनाने च्या वरच्या बाजूला बांधलेल्या बेट जवळ म्हणजे जवळ जावून, बेट ओढून वेवस्थित केला आणि, लगेच मध्ये जावून बसलो, मध्ये हवा यायला छोटीसी जागा, श्वास घ्यायला सुध्दा त्रास होत होता अश्या मध्ये आम्ही बसलो, आणि अर्ध्या तासातच आम्ही ओले चिंब झालो, स्वतःला सावरुन आम्ही ची वाट बघत लक्षा केडे लक्ष केंद्रीत केलं.
रात्रीच्या सुमारास किर्र अंधार, त्यात रात्री 9.30 च्या जवळपास बिबट आला तो एवढा मोठा होता की वाघच दिसायचा, परत रात्री दोन वेळेस बिबट त्या किल वर किल खाण्या करिता आला, अंधाऱ्या रात्री बिबट तोही अवाढव्य आकाराचा, (माझ्या मते तो नर असावा,) त्याला आणि वाघाला ओळखणे खूप जीकरीचे, कसा बसा बिबट्याचा माझ्या सोबत चां प्रवास संपला, आणि त्या नंतर चा प्रवास सुरू झाला, पहाटेच्या सुमारास मी च्या जवळ बसून समोर बघत होतो, तर माझ्या उजव्या बाजूला च्या वर मला वाघाचे अवाढव्य तोंडाचे दृश्य दिसले, माझा श्वास थांबला, छातीची धडधड वाढली, काही क्षणातच वाघ बेट जवळ च दिसला, आणि, माझ्याकडे तोंड करून बेट खात होता, मी आपली सर्व तयारी केली घेतली, आणि वाघावर निशाणा साधून योग्य ची वाट बघत होतो, आणि जसी Tiger ची योग्य मिळाली आणि माझ्या कडून झाडण्यात आला, आणि वाघाला उजव्या समोरील खांद्यावर लागला, आणि वाघ क्षणात च्या बाजूने धावत गेला जेव्हा टॉर्च ने बघितले तर हा ने हळू वार धावतानी दिसला क्षणात दिसे नासा झालं, चमु ला माहिती द्याची होती त्यांना बोलवायचे होते, पण नव्हता वेळ 6-7 मिनिट झाला होता, आम्ही हिम्मत घेवून मधून बाहेर आलो, आनी चमूला करून लगेच बोलावून घेतल, 4-5 मिनिटा मध्ये चमू जवळ आली, त्यांना संबंधी सूचना दिल्या, व ला शोधण्याची मोहीम सुरू झाली, सर्व चमू जंगलात गेले 100-150 मीटर पर्यंत शोध घेतला पण काही काही दिसत नव्हता मि माझ्या सोबत असलेल्या चमूला घेवून च्या दिशेने बाहेर निघालो, अन्य चमू जंगलात वाघाला शोधतच होते, canal वर येताच मला आमच्या चमुतील सदस्य अतुल ने आवाज दिला की इकडे या, आम्ही धावत त्याच्या दिशेने गेलो, त्यांनी सांगितले की, वाघ येथे झोपून आहे, हा अवघ्या 20-25 मीटर अंतरावर बेट पासून दूर बेशुध्द झाला होता, अतुल आणि त्याचे सोबत असलेल्या रोजंदारी मजुरांना प्रथम दिसला, आणि सर्व चमू एकत्र जमा झाली, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, ला वर उचलून पिंजऱ्यात ठेवले, यांनी शुध्दी चे दीले, व पिंजरा बंद करण्यात आला, सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
एक सुंदर अश्या जीवाला वाचविण्यात परत जलद बचाव पथक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चमूला यश आले. ने आज पर्यंत वाघ -43, बिबट-38, अस्वल- 24, हत्ती-9, यांना बेशुध्द करून केले आहे. त्या पैकी वाघ-2, बिबट-3 यांना ठार मारण्याची परवानगी असताना सुद्धा त्या प्राण्यांना बेशुध्द करून सुखरूप रित्या जेरबंद करून सुंदर अश्या जीवाला वाचविण्यात अग्रेसर भूमिका पार पाडली आहे. तसेच ला बेशुध्द करून सुखरूप रित्या जेरबंद करून वनविभागाची सक्षमता सिद्ध करण्यात यश आले आहे.
हे अभियान यशस्वी करण्या करिता आमचे ताडोबा जलद बचाव पथकाला नेहमी मार्गदर्शन करणारे , , यांच्या आज पर्यंत च्या मार्गदर्शना मुळे, व , , व , , यांच्या नेतृत्वा मुळे तसेच , व च्या या बचाव कार्यात सहभागी वन अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने Driver, रोजंदारी मजूर, यांच्या सहकार्या ने हे अथक खळतर क्लिष्ट चे बचाव कार्य यशस्वी झाले.

सर्वांचे खूब खूब धन्यवाघ.

Maharashtra: Tiger CT1, with ‘17 human kills’ in Gadchiroli, captured after 9-month hunt - https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/tiger-which-claimed-13-17-lives-captured-after-9-month-hunt/articleshow/94844489.cms

Use the TOI app to get Breaking news and headlines. Download now: https://timesofindia.onelink.me/efRt/ASmwebshare

https://marathi.hindusthanpost.com/special/last-two-days-on-search-operation-of-nationwide-popular-case-of-conflict-tiger-ct1-from-gadchiroli/97407/ #.Y0vl7QnvpL-.whatsapp

https://youtu.be/MNjWC7K7mkQ

Address

Chandrapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rapid Response Team Tadoba Andhari Tiger Reserve posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rapid Response Team Tadoba Andhari Tiger Reserve:

Share