26/08/2026
ग्रामगीता : लेखक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
अध्याय 35 वा प्रयत्न प्रभाव
मरणासहि प्रयत्नाचि कारण I जन्मासहि प्रयत्नाचि प्रमाण II
भोग सुख दु:खायचे निधान I प्रयत्नचि II81II
सार्थ : जन्माला आणि मरणालाही प्रयत्नच कारणीभूत होतात सुखाचे भोग व दारुण दुःखे ही प्रयत्नांचीच फळे होत