DIO Chandrapur

DIO Chandrapur जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर चे अधिकृत पेज

04/09/2026
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्जØ देश-विदेशातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही सहभागी...
04/09/2026

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज

Ø देश-विदेशातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही सहभागी होण्याची संधी

Ø तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके

चंद्रपूर, दि. ४ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य महोत्सवांतर्गत ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मागील वर्षापासून ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. यावर्षी या राज्य महोत्सवांतर्गत आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा विस्तार देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरात उत्साहपूर्ण वातावरणात तसेच विविध विधायक व समाजोपयोगी उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही यावर्षीपासून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

देशपातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळांसाठी स्वतंत्र तीन पारितोषिकांचीही घोषणा करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज ganeshotsav.pldmka.co.in या अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या संधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे आणि तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके जिंकण्याची संधी साधावी, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष शं. कुमरे यांनी केले आहे.

00000000

04/09/2026

गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची विशेष मेजवानी अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १७ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता मिनी थिएटर, तिसरा मजला, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील महत्वाचा उत्सव असून, त्याला संगीत, कला, भक्ती आणि लोकपरंपरेची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या उत्सवाच्या माध्यमातून विविध कलाप्रकारांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित या शास्त्रीय संगीत महोत्सवातून आठ दिवस विविध नामवंत कलाकारांच्या गायन व वादनाची सुरेल मेजवानी रसिकांना मिळणार आहे. अभिजात शास्त्रीय संगीताची परंपरा जतन, संवर्धन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

#गणेशोत्सव२०२६
#राज्यमहोत्सव

04/09/2026

महाराष्ट्र शासनाच्या #आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील #शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदांच्या भरती प्रक्रियेस गती देण्यात आली असून, #पवित्रपोर्टल मार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेस आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर सूचना व वेळापत्रक नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयांकडून प्रसिद्ध करण्यात आले असून, निर्धारित वेळापत्रकानुसार कागदपत्र पडताळणी प्रक्रिया ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील एकूण २ हजार ४२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीविना निवडीसाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील एकूण १ हजार ६०० उमेदवारांची यादी आदिवासी विकास विभागास प्राप्त झाली आहे.

यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गातील ९२७, माध्यमिक शिक्षक संवर्गातील ४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील २५२ उमेदवारांचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या उमेदवारांपैकी पेसा क्षेत्रातील ४५९ तर नॉन-पेसा क्षेत्रातील १ हजार १४१ उमेदवारांचा समावेश आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसह अन्य आवश्यक मूळ कागदपत्रांची पडताळणी निर्धारित केंद्रांवर करण्यात येत आहे.

पात्र उमेदवारांची सविस्तर यादी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंदर्भातील अद्ययावत सूचना व वेळापत्रकासाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

04/09/2026
04/09/2026

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. २०२६ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील तसेच परदेशातील सामाजिक व विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्जासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळाचा वापर करावा. इच्छुक मंडळांनी विहित नमुन्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे सादर करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

#गणेशोत्सव२०२६
#राज्यमहोत्सव
#पुरस्कार

03/09/2026

Address

Chandrapur
442401

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when DIO Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share