Chandrapur Municipal Corporation

Chandrapur Municipal Corporation चंद्रपूर शहर महानगरपालिका The Chandrapur Municipal Corporation has been established on 25th October 2011.

To make this city Clean and Magnificent and provide all facilities to the citizen", is the prime aspiration of Chandrapur Municipal Corporation. Chandrapur district comprises 15 talukas, namely Chandrapur, Ballarpur, Rajura, Bhadravati, Warora, Chimur, Nagbhid, Bramhapuri, Sindewahi, Mul, Sawali, Gondpipri, Korpana, Pombhurna and Jiwati. The Chandrapur Municipal Corporation provides great industri

al support and hence many cement factories like L&T (now UltraTech Cement), Gujarat Ambuja (Maratha Cement Works), Manikgarh, and ACC have been established in the district. The Chandrapur Municipal Corporation has the most efficient staff which are present 24X7 for the civil service.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवात योगदान द्या.श्री गणेश मूर्ती भव्य प्रदर्शनी व विक्री
05/09/2026

पर्यावरणपूरक गणेशोत्सवात योगदान द्या.
श्री गणेश मूर्ती भव्य प्रदर्शनी व विक्री

*पर्यावरणपूरक गणेशोत्सवात योगदान द्या.*श्री गणेशाच्या सजावटीकरिता प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळा.
05/09/2026

*पर्यावरणपूरक गणेशोत्सवात योगदान द्या.*
श्री गणेशाच्या सजावटीकरिता प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळा.

माजी राष्ट्रपती, भारतरत्न, महान तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…सर्व नागरिकांना व ...
05/09/2026

माजी राष्ट्रपती, भारतरत्न, महान तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…
सर्व नागरिकांना व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामास वेग*चंद्रपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्व...
04/09/2026

*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामास वेग*
चंद्रपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित राहावी, तसेच गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका, भाविकांची ये-जा आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामास वेग देण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील विविध भागांत नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ राहणार असल्याने प्रमुख रस्ते, गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचे संभाव्य मार्ग तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यांना प्राधान्य देऊन रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. महाकाली मंदिर मार्ग, जयंत टॉकीज, शिवाजी महाराज चौक ते संताजी भवन, भानापेठ, श्री टॉकीज, अंचलेश्वर गेट ते महाकाली मंदिर रोड मुख्य रस्ता यासह शहरातील विविध प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजविण्याचे काम महानगरपालिकेच्या संबंधित विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू आहे.

गणेशोत्सवादरम्यान नागरिक, भाविक तसेच गणेश मंडळांच्या मिरवणुकांमुळे शहरातील वाहतुकीवर वाढता ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन रस्त्यांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीतता आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

शहरातील काही प्रमुख रस्ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आलेले आहेत. सदर रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीबाबत आवश्यक त्या कार्यवाहीसाठी महानगरपालिकेच्या स्तरावरून संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहेत.

शहरातील कोणत्याही रस्त्यावर खड्डे आढळून आल्यास अथवा खड्डे बुजविण्याबाबत कोणतीही तक्रार किंवा सूचना असल्यास नागरिकांनी महानगरपालिकेच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून संबंधित ठिकाणाची माहिती प्रशासनास द्यावी.
‘सुरक्षित रस्ते, सुरळीत वाहतूक आणि खड्डेमुक्त चंद्रपूर’ या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे. आपल्या परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती तातडीने महानगरपालिका प्रशासनास देऊन गणेशोत्सव सुरक्षित, सुव्यवस्थित व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ।
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ।

हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त सर्व खेळाडू आणि क्रीडाप्रेम...
01/09/2026

हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त सर्व खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
28/08/2026

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

'ईद -ए- मिलाद'च्या हार्दिक शुभेच्छा !
26/08/2026

'ईद -ए- मिलाद'च्या हार्दिक शुभेच्छा !

🚩 सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! 🚩गणेशोत्सवाच्या विविध परवानग्यांसाठी चंद्रपूर मनपाची 'एक खिडकी प्रणाली' सु...
20/08/2026

🚩 सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! 🚩

गणेशोत्सवाच्या विविध परवानग्यांसाठी चंद्रपूर मनपाची 'एक खिडकी प्रणाली' सुरू! 🏢✨

येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना सर्व आवश्यक परवानग्या सुलभतेने आणि एकाच ठिकाणाहून मिळाव्यात, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे 'एक खिडकी प्रणाली' (Single Window System) व मनपा मुख्य इमारतीत विशेष मदतकक्ष सुरू करण्यात आला आहे.

📌 मिळणाऱ्या परवानग्या:

महानगरपालिका, पोलीस विभाग, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), अग्निशमन विभाग (Fire Dept.) आणि महावितरण (MSEDCL) या सर्व विभागांच्या परवानग्या आता एकाच प्रक्रियेतून उपलब्ध होणार आहेत.

💻 ऑनलाईन अर्ज कसा करावा?

मंडळांना परवानग्यांसाठी खालील लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करता येईल:

👉 https://pandal.cmcchandrapur.com

🤝 ऑफलाईन मदतकक्ष:

अर्ज करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मनपा मुख्य कार्यालयात स्वतंत्र मदतकक्ष स्थापन करण्यात आला आहे.

🌿 पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन:

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी व शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी पीओपी (PoP) मूर्तींना थारा न देता केवळ शाडूच्या मातीच्या मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. 🙏✨

Address

Chandrapur Municipal Corporation Building
Chandrapur
442401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrapur Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chandrapur Municipal Corporation:

Shortcuts

Share