BJP Chandrapur

BJP Chandrapur भारतीय जनता पार्टी ( जिल्हा चंद्रपूर )

14/05/2026

चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्लारशाह एक्सप्रेस (२०१०५/२०१०६) सुरू करण्यास मंजुरी दिल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचा वाढता औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन प्रवासभार लक्षात घेता अतिरिक्त रेल्वे सेवेची गरज आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने मांडली होती. या नव्या रेल्वे सेवेचा लाभ व्यापारी, विद्यार्थी, कामगार व नागरिकांना होणार असून मंजुरीबद्दल आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
mungantiwar .vaishnaw

आनंदाची बातमी! "मुंबई ते बल्लारशाह प्रवास आता अधिक सोयीचा! आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.""आता थेट ब...
21/04/2026

आनंदाची बातमी! "मुंबई ते बल्लारशाह प्रवास आता अधिक सोयीचा! आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश."

"आता थेट बल्लारशाह ते मुंबई धावणार नवीन एक्सप्रेस ! जाणून घ्या गाडीची वेळ आणि संपूर्ण वेळापत्रक."

"लोकमान्य टिळक टर्मिनस ते बल्लारशाह नवीन साप्ताहिक रेल्वे मंजूर; प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण."

"प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज ! चंद्रपूर-बल्लारशाह जिल्ह्यासाठी नवी रेल्वे सेवा सुरू होणार.

"आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; मुंबई-बल्लारशाह रेल्वेला हिरवा कंदील."






Ballarpur Development Maharashtra Government

सुधीरमुनगंटीवार रेल्वेबातमी आनंदाची बातमी बल्लारशाह मुंबई विदर्भ चंद्रपूर रेल्वेप्रवास महाराष्ट्र विकास

10/04/2026

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून “शिक्षणातून सक्षमीकरण… सक्षमीकरणातून स्वावलंबन… आणि स्वावलंबनातून उज्ज्वल भविष्य” ही संकल्पना साकार होत असून, चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे 589.93 कोटी रुपयांचा भव्य महिला सक्षमीकरण प्रकल्प उभा राहत आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 395.65 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, ५० एकर जागेवर साकार होणाऱ्या या प्रकल्पातून महिलांसाठी ६४ कौशल्याधारित अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत.

‎आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या अत्याधुनिक कॅम्पसमध्ये विद्यार्थिनींसाठी सर्व सुविधा, इनडोअर स्टेडियम आणि प्रेरणादायी स्मारके उभारली जाणार असून, हे केंद्र शिक्षणाबरोबरच स्वावलंबनाची नवी दिशा देणारे ठरेल. महर्षी कर्वे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा आणि महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा ठरणार आहे.

Sudhir Mungantiwar

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या सुचनेनुसार चंद्रपूर जिल्हा प्रभारी पदी आमचे मार्गदर्शक, लोकनेते आ...
10/04/2026

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या सुचनेनुसार चंद्रपूर जिल्हा प्रभारी पदी आमचे मार्गदर्शक, लोकनेते आदरणीय श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

Sudhir Mungantiwar

09/04/2026

नवीन चंद्रपूर शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मंजूर झालेल्या रु. १४४ कोटींच्या भरीव निधीमुळे शहरातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांना आता ठोस मार्ग मिळणार आहे. विशेषतः रस्त्यांचे मजबुतीकरण, अत्याधुनिक पथदिवे, शाश्वत पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि इतर मूलभूत सुविधा यांची कामे गतीने पूर्ण होत नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल घडणार आहे. यामुळे शहराचा नियोजनबद्ध विस्तार होऊन चंद्रपूर अधिक सुसज्ज, सुबक आणि गुंतवणुकीस पोषक बनण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा, अभ्यासपूर्ण मांडणीचा आणि संसदीय आयुधांच्या प्रभावी वापराचा हा ठोस परिणाम मानला जात आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे नवीन चंद्रपूरच्या विकासाला नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, हे शहर भविष्यात आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख विकासाचे आदर्श उदाहरण ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Sudhir Mungantiwar

‎आ. सुधीर मुनगंटीवार यांचा संसदीय आयुधांचा प्रखर दणका यशस्वी‎‎नवीन चंद्रपूरसाठी १४४ कोटींचा भरीव विकासनिधी मंजूर‎‎चंद्रप...
08/04/2026

‎आ. सुधीर मुनगंटीवार यांचा संसदीय आयुधांचा प्रखर दणका यशस्वी

‎नवीन चंद्रपूरसाठी १४४ कोटींचा भरीव विकासनिधी मंजूर

‎चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण, दूरदृष्टीपूर्ण आणि नियोजनबद्ध विकासासाठी अहोरात्र झटणारे, ठाम नेतृत्व आणि अभ्यासपूर्ण मांडणीसाठी ओळखले जाणारे आमदार श सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण  आणि परिणामकारक प्रयत्नांना अखेर मोठे यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या संसदीय आयुधांच्या अचूक, प्रभावी आणि धारदार वापरामुळे नवीन चंद्रपूर शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल रु. १४४,३८,३४,५७९/- इतक्या भरीव निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

‎गृहनिर्माण विभागाने दि. ३१ मार्च २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करून केवळ मंजुरीच नव्हे तर निधी वितरणाची प्रक्रिया देखील पूर्ण केल्याने आता नवीन चंद्रपूरच्या विकासाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे. हा निर्णय म्हणजे केवळ आर्थिक मंजुरी नसून चंद्रपूरच्या भविष्याचा नवा आराखडा ठरणारा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

‎नवीन चंद्रपूर शहराचा विकास हा केवळ एक प्रकल्प नसून चंद्रपूरच्या वाढत्या शहरीकरणाला योग्य दिशा देणारी, नियोजनबद्ध विस्ताराची आणि आधुनिक पायाभूत सुविधांची पायाभरणी करणारी महत्त्वाकांक्षी संकल्पना आहे. या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देण्यासाठी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा, प्रभावी पत्रव्यवहार, तसेच ठोस आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत हा विषय जिवंत ठेवला.

‎त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच नगर विकास विभागाच्या दि. ३० जून १९९८ च्या आदेशान्वये नवीन चंद्रपूरसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयानेच पुढील विकासाची पायाभरणी झाली.

‎म्हाडामार्फत १३९१.७१ हेक्टर क्षेत्रात नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार करून ४०.४१२ कि.मी. लांबीचे रस्ते, इरई नदीवरील पूल, सक्षम पाणीपुरवठा योजना, बाह्य विद्युतीकरण, सुसज्ज मलनिःसारण व्यवस्था आणि भूसंपादन यांसारखी मूलभूत व अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यात आली. मात्र, या कामांना कालांतराने १४ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने रस्त्यांची दुरवस्था, पायाभूत सुविधांची झीज आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी यांचा प्रश्न गंभीर बनला होता.

‎याच पार्श्वभूमीवर आ. मुनगंटीवार यांनी या विषयाला केवळ प्रशासकीय चौकटीत न ठेवता थेट विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या प्रभावी आणि आक्रमक माध्यमातून उचलून धरले.
Sudhir Mungantiwar

श्रीरामनवमी निमित्त गिरनार चौकात भव्य स्वागत सोहळा व आकर्षक फायर शोचंद्रपूर : श्रीरामनवमीच्या पावन आणि मंगलमय उत्सवानिमि...
26/03/2026

श्रीरामनवमी निमित्त गिरनार चौकात भव्य स्वागत सोहळा व आकर्षक फायर शो

चंद्रपूर : श्रीरामनवमीच्या पावन आणि मंगलमय उत्सवानिमित्त दिनांक २६ मार्च रोजी चंद्रपूर शहरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेच्या स्वागतासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार व मुनगंटीवार परिवारातर्फे स्थानिक गिरनार चौक येथे भव्य आणि आकर्षक फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष उपक्रमामुळे शोभायात्रेच्या स्वागत सोहळ्यात उत्साह आणि दिमाखात अधिक भर पडणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी उत्सवानिमित्त शहरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून हजारो भाविक नागरिक मोठ्या श्रद्धेने शोभायात्रेत सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या स्वागतासाठी आणि उत्सवाचे पावित्र्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या भाविक नागरिकांसाठी मुनगंटीवार परिवारातर्फे ‘फ्रुटी’ या शीतपेयाचे वितरण करण्यात येणार आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सोय व्हावी या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार व सौ. सपना मुनगंटीवार शोभायात्रेत सहभागी होत प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करणार आहेत. श्रीरामांच्या आदर्श विचारांचे स्मरण आणि धार्मिक परंपरांचा सन्मान राखत भक्तिभावाने हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

गिरनार चौक येथे आयोजित फायर शो हा शोभायात्रेचा प्रमुख आकर्षण ठरणार असून, आकर्षक रोषणाई, उत्साहवर्धक वातावरण आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला हा सोहळा नागरिकांसाठी संस्मरणीय ठरणार आहे.शहरातील नागरिकांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य स्वागत सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
mungantiwar

*रामनवमी निमित्त ध्वनीक्षेपक वापरास विशेष सवलत**आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी यांचा निर्णय*रामनवमी...
26/03/2026

*रामनवमी निमित्त ध्वनीक्षेपक वापरास विशेष सवलत*

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी यांचा निर्णय*

रामनवमी उत्सवानिमित्त शहरातील धार्मिक वातावरण आणि भाविकांच्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याशी चर्चा करून ध्वनीक्षेपक वापरास विशेष सवलत मिळवून दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, रामनवमी निमित्त मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम व उत्सवांसाठी सकाळी ६.०० वाजल्यापासून रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे उत्सव अधिक उत्साहपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यास नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाशी सकारात्मक समन्वय साधून भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय करून घेतला. रामभक्तांच्या भावना लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व धार्मिक मंडळे, आयोजक आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण उत्सव असून या दिवशी मोठ्या प्रमाणात शोभायात्रा, भजन, कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वाढत्या सहभागामुळे ध्वनीक्षेपक वापरास वेळेची मर्यादा अडथळा ठरत होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार मुनगंटीवार यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून विशेष सवलत मंजूर करून घेतली.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था राखावी, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि पारंपरिक उत्साहासोबत सामाजिक जबाबदारी जपावी.
या निर्णयामुळे रामनवमी उत्सव अधिक भव्य, पारंपरिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.mungantiwar

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वरोरा येथील मौजे एकार्जुना येथे उभारले जाणाऱ्या उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाल...
25/03/2026

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वरोरा येथील मौजे एकार्जुना येथे उभारले जाणाऱ्या उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्राची आढावा बैठक...
mungantiwar

गोंडपिपरी एमआयडीसीसाठी राज्य शासनाचे अधिकृत राजपत्र प्रसिद्ध.आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; हजारो तर...
24/03/2026

गोंडपिपरी एमआयडीसीसाठी राज्य शासनाचे अधिकृत राजपत्र प्रसिद्ध.

आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; हजारो तरुणांच्या हाताला मिळणार काम !

राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून, गोंडपिपरी तालुका आता औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. महाराष्ट्र शासनाने अलिकडेच अधिकृत राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध करून गोंडपिपरी तालुक्यातील करंजी, चक पेल्लुर, वडकुली, सिर्सी देऊळवार यांसह १२ गावांतील क्षेत्राला 'औद्योगिक क्षेत्र' म्हणून जाहीर केले आहे. यामुळे या भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि शेतकरी पुत्रांच्या हाताला रोजगार मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

संघर्षातून साकारली औद्योगिक स्वप्नपूर्ती :

गोंडपिपरी तालुका सुपीक जमिनींनी समृद्ध असला तरी येथे उद्योगांचा अभाव होता. आमदार झाल्यानंतर देवराव भोंगळे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून शासनाकडे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी रेटा लावला होता. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांनी विविध संसदीय आयुधांचा वापर करून उद्योग विभागाचे लक्ष वेधले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून आणि भेटी घेऊन या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया गतिमान केली.

दादाने वादा पाळला :

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार देवराव भोंगळे यांनी गोंडपिपरीच्या जनतेला वचन दिले होते की, निवडून आल्यानंतर या भागात मोठे उद्योग आणून बेरोजगारीचा कलंक पुसून काढू. शासनाने नुकत्याच काढलेल्या राजपत्रामुळे (क्रमांक आयडीसी २०२५/प्र.क्र. ५५२/३-१४) देवराव भोंगळे यांनी आपला वादा प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याचे सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग ३५३ बी ला लागून असलेला हा परिसर आता उद्योगांचे केंद्र बनणार आहे.

१२ गावांतील जमिनी औद्योगिक क्षेत्र घोषित :

यापुर्वी गोंडपिपरी एमआयडीसीचे क्षेत्र केवळ १४ हेक्टर होते परंतू या राजपत्रानुसार ते ३३४१.४८४ हेक्टर झाले असून शासनाच्या अधिसूचनेनुसार करंजी, चक पेल्लुर, वडकुली, चक वडकुली, सिर्सी देऊळवार, चेक बेरडी, बोरगांव, धानापूर, चक बोरगांव, लिखीतवाडा, वढोली आणि खरारपेठ या गावांतील क्षेत्राचा समावेश एमआयडीसीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कलम २ अन्वये हे क्षेत्र आता अधिकृत औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित होईल.
bhongle

Address

Chandrapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share