Aapli Chikhli - आपली चिखली

Aapli Chikhli - आपली चिखली chikhli WALKORE TECHNOLOGIES is a team of smart, talented and young developers passionate about giving better results.

Our major projects are in Education, Real Estate and Healthcare domain. With our cross domain expertise we created an ERP product that contributes value to every client we work with.

पिढ्यानपिढ्यांची नाळ असणाऱ्याला 'बाहेरचा' म्हणणाऱ्यांची अक्कल तपासा!चिखलीकरांनो, हा नीच प्रचार करणाऱ्यांना जागा दाखवाभाज...
30/11/2025

पिढ्यानपिढ्यांची नाळ असणाऱ्याला 'बाहेरचा' म्हणणाऱ्यांची अक्कल तपासा!
चिखलीकरांनो, हा नीच प्रचार करणाऱ्यांना जागा दाखवा

भाजपाचे नवीन पोस्टर पाहिले आणि हसू आले. ज्यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही, ते आता 'स्थानिक vs बाहेरचे' असा विषारी वाद निर्माण करत आहेत.
आमचा विरोधकांना थेट सवाल:

*बाेंद्रे घराण्याच्या पिढ्यांचा इतिहास माहित नाही का?*
काशिनाथ आप्पा आणि बोंद्रे परिवाराच्या १० पिढ्या या चिखलीच्या मातीत जन्माला आल्या आणि इथेच मिसळल्या. त्‍यांचं रक्त, घाम आणि नाळ याच मातीशी जोडलेली आहे. ज्यांनी पिढ्यानपिढ्या शहराची सेवा केली, त्यांना तुम्ही 'बाहेरचे' म्हणता? इतकी बौद्धिक दिवाळखोरी कुठून आणता?

*'रिमोट कंट्रोल' कुठला आहे?*
तुम्ही बाहेरचे म्हणता? मग तुमच्या पक्षात काय चाललंय? उमेदवार पंडितराव असले तरी त्यांचा 'रिमोट कंट्रोल' ज्यांच्या हातात आहे, ते कुठले आहेत? ज्यांच्या पक्षाची सगळी सूत्रं 'इम्पोर्टेड नेत्यांच्या' हातात आहेत, ज्यांना साधं तिकीट वाटप करताना किंवा निर्णय घेताना 'बाहेरच्या' लोकांची परवानगी घ्यावी लागते, त्यांनी आम्हाला स्थानिकांचे धडे देऊ नयेत!

*'चिखलीकर' कोणाला म्हणतात?*
फक्त आधार कार्डवर पत्ता चिखलीचा असून चालत नाही. ज्याच्या हृदयात चिखली असते, जो सुख-दुःखात धावून येतो, तो खरा चिखलीकर! पाच वर्षांत एकदाही तोंड न दाखवणारे, आणि निवडणुकीच्या वेळी बाहेरून येऊन वातावरण बिघडवणारे तुम्हीच खरे 'उपरे' आहात.

जेव्हा जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा तेव्हा भाजपला 'हिंदू-मुस्लिम' किंवा 'स्थानिक-बाहेरचा' असे विषय आठवतात. पण चिखलीकर आता या भुलथापांना बळी पडणार नाहीत.
हिंमत असेल तर समोर या! १० पिढ्यांचा दाखला घेऊन आम्ही येतो, तुम्ही तुमची 'निर्णय घेणारी खरी टीम' (जी पडद्यामागून काम करते) घेऊन या. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे!
"आम्ही या मातीचे पुत्र, हीच आमची ओळख! उपऱ्यांचा रिमोट कंट्रोल आता चालणार नाही!"

#चिखली #नगरपालिका

“जमिनीवरचा हक्क नागरिकांचा, लूट करणाऱ्यांची वेळ संपली!”खरे भ्रष्टाचारी कोण?  आता वेळ आली आहे अश्याना जागा दाखवण्याची..! ...
30/11/2025

“जमिनीवरचा हक्क नागरिकांचा, लूट करणाऱ्यांची वेळ संपली!”
खरे भ्रष्टाचारी कोण?
आता वेळ आली आहे अश्याना जागा दाखवण्याची..!

#चिखली

खरे भ्रष्टाचारी कोण ?चिखलीकरांना माहिती आहे #चिखली    #नगरपालिका
30/11/2025

खरे भ्रष्टाचारी कोण ?
चिखलीकरांना माहिती आहे

#चिखली #नगरपालिका

30/11/2025

आपली चिखली आपला अभिमान आणि त्याच हृदयात दशकांपासून उभं असलेलं चिखलीच बॉम्बे मार्केट.

इथे घाम गाळून स्वतःचे स्वप्न उभे करणाऱ्या हजारो सर्वसामान्य व्यावसायिकांचा जीव की प्राण असलेलं हे मार्केट पण आज या मार्केटवर धनाढ्यांचा डोळा आहे.सत्तेच्या मस्तवालपणात बुडालेले भूमाफिया या जागेवर डाव टाकत आहेत!

अनेक पिढ्यांनी जपलेल्या बॉम्बे मार्केटला मोडून टाकून काही मोजक्या श्रीमंतांच्या तिजोरी भरायचा हा घातक प्रयत्न आहे!

❗ही वेळ आहे सावध होण्याची!
❗ही वेळ आहे एकत्र उभं राहण्याची!
❗ही वेळ आहे आपल्या हक्कासाठी लढण्याची!

कारण बॉम्बे मार्केट वाचलं तर चिखलीचा असंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह वाचेल!
सर्वसामान्यांच्या न्यायासाठी…
व्यापाऱ्यांच्या अस्तित्वासाठी…
आपल्या शहराच्या अस्मितेसाठी…

"जनतेचा पैसा ‘विकास’ नावाखाली किती हडपला जातो—सत्य बाहेर येणं गरजेचं आहे!"हिच ती वेळ दडपशाही करणाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर...
29/11/2025

"जनतेचा पैसा ‘विकास’ नावाखाली किती हडपला जातो—सत्य बाहेर येणं गरजेचं आहे!"

हिच ती वेळ दडपशाही करणाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्याची.

“घरकुलासाठी 2.5 लाख… पण इथे भिंतींसाठीच 40 लाख! कला महाग की कारस्थाने?”निर्णय कोणी घेतला, जनता विचारतेय??   #नगरपालिका  ...
29/11/2025

“घरकुलासाठी 2.5 लाख… पण इथे भिंतींसाठीच 40 लाख! कला महाग की कारस्थाने?”

निर्णय कोणी घेतला, जनता विचारतेय??

#नगरपालिका

Address

Shivaji Chowk
Chikhli
443201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapli Chikhli - आपली चिखली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category