Sajid Hanifkhan Sarguroh

Sajid Hanifkhan Sarguroh Social Service

12/09/2025

Today’s Best Picture With My All Respected Sisters  👑  🇮🇳
15/08/2025

Today’s Best Picture With My All Respected Sisters 👑 🇮🇳

साजिद सरगुरोह यांच्या निवेदनाची सर्वत्र चर्चा  25 ऑगस्ट पर्यंत गोवळकोट व गोवळकोट रोड परिसराचे खड्डे बुजवावे अन्यथा चिपळू...
13/08/2025

साजिद सरगुरोह यांच्या निवेदनाची सर्वत्र चर्चा
25 ऑगस्ट पर्यंत गोवळकोट व गोवळकोट रोड परिसराचे खड्डे बुजवावे अन्यथा चिपळूण नगरपरिषद मुख्याधिकारी दालनासमोर धरणे आंदोलन ( चिपळूण वार्ताहार) गोवळकोट व गोवळकोट रोड परिसरात मोठे मोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरचे खड्डे लवकरात लवकर बुजवावे असे निवेदन युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी चिपळूण नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनात असे नमूद केले आहे की गोवळकोट व गोवळकोट रोड रस्त्यावरील असलेल्या खड्ड्यामुळे येथील नागरिकांना सदर रस्त्यावरून येणेजाणे करणे फार अडचणीचे ठरत आहे. तसेच सदरचे खड्डे हे रात्रीच्या वेळी दिसत नसून, अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. विशेषता मणक्याच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. तरी आपण याची योग्य ती दखल घेऊन गोवळकोट व गोवळकोट रोड परिसरातील असलेले खड्डे सोमवार दि. 25 ऑगस्ट पर्यंत न बुजवल्यास चिपळूण नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या दालना समोर धरणा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष साजीद सरगुरोह यांनी दिला आहे. तात्काल याची दखल घ्यावी व लवकरात लवकर सदरचे खड्डे बुजवावेत असे निवेदन देऊन चर्चा ही केली होती .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष रईस अल्वी, राष्ट्रवादी काँग्रेस उपध्यक्ष व्हाब सुर्वे, बकर खोत, मुश्ताक बोट, युसुफ सेन, रउफ काझी, इकबाल बोट, हबीबुला दळवी आदि उपस्थित होते.

धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की, जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं, एक एक पाऊल टाकत चला...
02/04/2025

धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की, जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं, एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल..!!

Eid mubarak 💐💐
31/03/2025

Eid mubarak 💐💐

सोमवारी लोड शेडिंग करू नये रमजान ईद आहे-साजिद सरगुरोह (चिपळूण प्रतिनिधी) युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी ...
30/03/2025

सोमवारी लोड शेडिंग करू नये रमजान ईद आहे-साजिद सरगुरोह (चिपळूण प्रतिनिधी) युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी सोमवार दि.31 मार्च रोजी वीज बंद करू नये. या दिवशी रमजान ईद आहे असे निवेदन कार्यकारी अभियंता महावितरण विभाग चिपळूण यांना दिले आहे.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, रमजान ईद हा मुस्लिम समाजाचा पवित्र सण आहे. मुस्लिम समाज महिनाभर उपवास करतात. एक महिन्यानंतर चंद्र दिसल्याने दुसऱ्या दिवशी भारतात रमजान ईद साजरी करतात. मात्र यावेळी सोमवार दि. 31 मार्च रोजी रमजान ईद असल्याने लोड शेडिंग करू नये अशी मागणी श्री. सरगुरोह यांनी केली आहे. चिपळूण शहर व ग्रामीण भागातील मुस्लिम समाज रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरी करतात. मात्र महावितरण सोमवारी वीज बंद करून दिवसभर दुरुस्तीचे काम करत असतात. सध्या मार्च महिना असल्याने गर्मीचे दिवस आहेत. सोमवारी लोड शेडिंग करू नये असेही या निवेदनात नमूद केले आहे.

काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दौरा कोकणाला संजीवनी देणारा- युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह काँग...
17/03/2025

काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दौरा कोकणाला संजीवनी देणारा- युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह काँगेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नुकतेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण व्हावी यासाठी आपण दौरा काढला आहे असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे पदाचे सूत्र हाती घेतलेले हर्षवर्धन सपकाळ त्यांच्या पहिले दौरा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. काँग्रेस नूतन प्रदेशाध्यक्ष सपकाळ रत्नागिरी दौऱ्यावर त्यांनी काँग्रेसच्या पडझडीचा आढावा घेतला तसेच कार्यकर्त्यांसह प्रमुख नेते दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांना कानमंत्र ही दिले. मात्र 35 वर्षात पक्षाची झालेली वाताहात आणि पडझडीचं तसेच काँग्रेसला गत वैभव मिळवून देण्यासाठी बळ देण्यासाठी नवीन टीम उभी करणार असेही त्यांनी सांगितले
जिल्ह्यात 1972 दरम्यान काँग्रेसच हा सर्वात मोठा पक्ष होता. जवळजवळ सर्व विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा पगडा होता. त्यानंतर जनता दल, भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्लाला सुरुंग लावत पोखरायला सुरुवात केले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच काम समाधानकारक असून युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह व त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आपण एकत्र येऊन काम करू काँग्रेसची सत्ता कशी येईल यासाठी प्रयत्न करू असे म्हणाले.यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, महाराष्ट्र विधान परिषद व विधानसभेचे सदस्य भाई जगताप, माजी आमदार हुसनाबानू खलिफे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाधीक्षा सोनललक्ष्मी घाग ,रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनीष राऊत, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष ऋषिकेश शिंदे, रत्नागिरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष इरफान हुडेकर ,काँग्रेस नेते सुरेश काटकर,नवाज नांदगावकर, इमरान खान, उज्जेर घारे, अल्बक्ष गोठे, फहद खान, रियाज शेख आदी उपस्थित होते.

संकटावर अशा रितीने तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच.अखेर सत्याचा विजय झाला आहे आणि खोट्या चि हार होव...
05/03/2025

संकटावर अशा रितीने तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच.
अखेर सत्याचा विजय झाला आहे आणि खोट्या चि हार होवून रत्नागिरी जिल्हायुवक काँग्रेस अध्यक्ष साजिद सरगुरोह यांचे हार्दिक अभिनंदन

Address

Block No. 1, Heena Apartment, Gowalkot Road
Chiplun
415605

Telephone

+917020848890

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sajid Hanifkhan Sarguroh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sajid Hanifkhan Sarguroh:

Share

Category