Indian National Congress Jalgaon District

Indian National Congress Jalgaon District Official Page of Jalgaon District Congress Commitee

श्रीराम मंदिर देणगी प्रकरणातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत पारदर्शक चौकशी व न्यायाची मागणीभारतीय राष्ट्रीय का...
10/07/2026

श्रीराम मंदिर देणगी प्रकरणातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत पारदर्शक चौकशी व न्यायाची मागणी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जळगाव शहर, जळगाव पूर्व व जळगाव पश्चिम जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आज "रघुपती राघव राजाराम सत्याग्रह" आयोजित करण्यात आला.
प्रभू श्रीराम हे संपूर्ण देशाच्या श्रद्धेचे, सत्याचे, न्यायाचे आणि मर्यादेचे प्रतीक आहेत. त्यामुळे आमचा हा सत्याग्रह कोणत्याही धर्माविरुद्ध, कोणत्याही श्रद्धेविरुद्ध किंवा श्रीराम मंदिराविरुद्ध नसून, श्रीरामांच्या भक्तांनी अत्यंत श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीच्या वापराबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची पारदर्शक आणि निष्पक्ष उत्तरे मिळावीत, या लोकशाही भूमिकेतून आहे.
देशभरातील लाखो-कोट्यवधी भाविकांनी श्रीराम मंदिरासाठी निःस्वार्थ भावनेने देणग्या दिल्या आहेत. त्यामुळे त्या निधीच्या संकलन, वापर आणि लेखापरीक्षणाबाबत संपूर्ण पारदर्शकता राखली जाणे ही संबंधित संस्थांची नैतिक व सार्वजनिक जबाबदारी आहे.
या पार्श्वभूमीवर आम्ही पुढील मागण्या करीत आहोत:
1. श्रीराम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्यांचा संपूर्ण आर्थिक तपशील सार्वजनिक करण्यात यावा.
2. संबंधित आरोपांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि विश्वासार्ह चौकशी करण्यात यावी.
3. चौकशीचा अहवाल जनतेसमोर सादर करण्यात यावा.
4. दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
5. भविष्यात धार्मिक व सार्वजनिक देणगी निधीच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात यावी.
आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्ती किंवा श्रद्धेविरुद्ध नसून, सत्य, पारदर्शकता आणि न्यायासाठी आहे. लोकशाही व्यवस्थेत जनतेने दिलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशेब देणे ही जबाबदारी आहे आणि त्याच तत्त्वासाठी हा शांततापूर्ण सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे.
श्रीरामांनी आपल्या जीवनातून सत्य, धर्म आणि न्यायाचा आदर्श घालून दिला. त्या आदर्शांचे स्मरण ठेवूनच आम्ही सत्य समोर यावे आणि भाविकांच्या विश्वासाचे संरक्षण व्हावे, अशी मागणी करीत आहोत.
— जळगाव शहर, जळगाव पूर्व व जळगाव पश्चिम जिल्हा काँग्रेस समिती
धनंजय शिरीष चौधरी जिल्हाध्यक्ष, जळगाव पूर्व जिल्हा काँग्रेस समिती,ॲड.अविनाश भालेरावजिल्हाध्यक्ष, जळगाव पश्चिम जिल्हा काँग्रेस समिती,जमील शेखशहराध्यक्ष, जळगाव शहर काँग्रेस समिती,श्री.प्रविण सुरवाडे, श्री..उदय पाटील,श्री..बाबा देशमुख,प्रभाकर महाजन,विष्णू घोडसवार,राहुल भालेराव,नितीन चौधरी,शामाकांत तायडे,दीपक सोनवणे,राजेंद्र चोपडे,राजस कोतवाल, डॉ.राजेंद्र पाटील,मनोज चौधरी, जगदीश बोरसे,गणेश झाल्टे,भारत पाटील,ज्ञानेश्वर नेरकर,पुंजाजी पाटील,किरण अडकमोल,श्रीधर चौधरी, मनोज वाणी,संजय भदाणे,शेख रियाज,हकीम तडवी,इरफान खान,भरत चौधरी, डिगंबर चौधरी,ललित चौधरी, रामदास लहासे,यशवंत धनके,राहुल पाटील व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

Indian National Congress - Maharashtra
Harshwardhan Sapkal

📍मुक्ताईनगर     मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरनिरीक्षण (SIR-2026) अभियानाच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच...
05/07/2026

📍मुक्ताईनगर
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरनिरीक्षण (SIR-2026) अभियानाच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मुक्ताईनगर व जामनेर विधानसभा मतदारसंघातील बीएलए-२ (Booth Level Agent-2) व पदाधिकाऱ्यांसाठी डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत अॅड. शहजाद व अॅड. मोहत्शेम यांनी बीएलए-२ची भूमिका व जबाबदाऱ्या, नियुक्ती प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, विशेष सखोल पुनरनिरीक्षण (SIR-2026) अंतर्गत मतदार नोंदणी, पडताळणी आणि बूथस्तरावरील कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित पदाधिकारी व बीएलए-२ प्रतिनिधींनी विविध शंकांचे निरसन करून घेतले तसेच मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रशिक्षण कार्यशाळेस मा.डॉ. जगदीश पाटील महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष,मा.धनंजय चौधरी जिल्हाअध्यक्ष जळगाव काँग्रेस पूर्व व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि बीएलए-२ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता करण्यात आली....

Indian National Congress - Maharashtra
Harshwardhan Sapkal

📍चोपडा      मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरनिरीक्षण (SIR-2026) अभियानाच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ...
03/07/2026

📍चोपडा

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरनिरीक्षण (SIR-2026) अभियानाच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने चोपडा विधानसभा मतदारसंघातील बीएलए-२ (Booth Level Agent-2) व पदाधिकाऱ्यांसाठी महात्मा गांधी महाविद्यालय, चोपडा येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेत अॅड. शहजाद व अॅड. मोहत्शेम यांनी बीएलए-२ची जबाबदारी, नियुक्ती प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, मतदार यादी पुनरनिरीक्षणाची कार्यपद्धती तसेच पात्र मतदारांची नोंदणी व पडताळणी प्रभावीपणे कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विविध शंकांचे निरसन करून घेतले तसेच बूथस्तरावर समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रशिक्षण कार्यशाळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मा.श्री.संदीप पाटील व काँग्रेस जळगाव पूर्व अध्यक्ष श्री.धनंजय चौधरी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बीएलए-२ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

Harshwardhan Sapkal

*रावेर–यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने SIR-2026 प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न*  मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरी...
02/07/2026

*रावेर–यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने SIR-2026 प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न*

मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR-2026) अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ व जळगाव जिल्हा पूर्व काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. धनंजयभाऊ चौधरी व यावल तालुक्याचे माजी आमदार मा.श्री.रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर–यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कार्यकर्ते व BLA-2 यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले.

या प्रशिक्षण शिबिरात ॲड. शहेजाद खान व ॲड. मोहतशम रजा यांनी मार्गदर्शन करताना SIR-2026 प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे, आवश्यक कागदपत्रे, तसेच प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षकांनी BLA-2 पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया, तसेच प्रत्यक्ष काम करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

शिबिरास रावेर–यावल तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, BLA-2, बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आगामी SIR-2026 अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Indian National Congress - Maharashtra

पेट्रोल पंपावर “Melody” वाटप करून जळगाव जिल्हा काँग्रेसचे महागाईविरोधी आंदोलन   वाढते पेट्रोल-डिझेल दर, सातत्याने वाढणार...
30/05/2026

पेट्रोल पंपावर “Melody” वाटप करून जळगाव जिल्हा काँग्रेसचे महागाईविरोधी आंदोलन
वाढते पेट्रोल-डिझेल दर, सातत्याने वाढणारी महागाई तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानावर होत असलेल्या गंभीर परिणामांच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. जळगाव शहरातील पांडे चौक येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर नागरिकांना “Melody” चॉकलेटचे वाटप करून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध नोंदविण्यात आला.
“Melody इतकी गोड, पण महागाईने जनतेचे जीवन कडू केले” असा संदेश देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ, गॅस सिलेंडर, खाद्यतेल, दूध, भाजीपाला तसेच खतांच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कसे कोलमडले आहे, याकडे लक्ष वेधले.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आज देशातील सामान्य नागरिक प्रचंड महागाई आणि इंधन दरवाढीच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. केंद्र सरकारकडून केवळ जाहिराती आणि आश्वासने दिली जात आहेत; मात्र जनतेला कोणताही प्रत्यक्ष दिलासा मिळत नाही. पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून सातत्याने संघर्ष करत राहील.”
या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते मा. मुफ्ती साहेब,जळगाव पूर्व चे जिल्हाध्यक्ष मा.धनंजयभाऊ चौधरी,जळगाव ग्रामीण पश्चिमचे अध्यक्ष मा. अविनाशदादा भालेराव,जळगाव शहर अध्यक्ष मा. जमील शेख, मा. योगेंद्रभैय्या पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष,शहरअध्यक्ष, सर्व सेलचे पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
Indian National Congress - Maharashtra
Harshwardhan Sapkal

भारतीय तत्त्वज्ञ, योगी आणि समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत त्यांनी भारतीय तत्त...
12/01/2026

भारतीय तत्त्वज्ञ, योगी आणि समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व केले व पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञान आणि योगाचे महत्त्व पटवून दिले. “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका” यांसारख्या त्यांनी दिलेल्या विचारांनी आजही अनेक तरूण-तरूणींना प्रेरणा मिळते, यामुळेच आजचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त सर्व युवक युवतींना शुभेच्छा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरक स्मृतींना विनम्र अभिवादन!

बाल शिवबांच्या मनात 'स्वराज्य' स्थापनेची बीजे पेरणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. त्यांनी शिवाजी...
12/01/2026

बाल शिवबांच्या मनात 'स्वराज्य' स्थापनेची बीजे पेरणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. त्यांनी शिवाजी महाराजांना शौर्य, नीतिमत्ता आणि राष्ट्रप्रेमाचे धडे देऊन एक महान शासक आणि योद्धा म्हणून घडवले, तसेच प्रतिकूल परिस्थितीतही पुण्याची जहागीर सांभाळून स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे त्या 'स्वराज्याची प्रेरणा' म्हणून ओळखल्या जातात. आज जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

आज देशभरात काँग्रेस पक्षातर्फे मनरेगा बचाव आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज मनरेगा बचाव आंदोलनास...
11/01/2026

आज देशभरात काँग्रेस पक्षातर्फे मनरेगा बचाव आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज मनरेगा बचाव आंदोलनासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब प्रदीपरावजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व सर्व फ्रंटल चे पदाधिकारी काँग्रेस भवन, जळगाव येथे सहभागी झाले.

Rahul Gandhi K.C. Venugopal Priyanka Gandhi Vadra Ramesh Chennithala Supriya Shrinate Satej D. Patil Balasaheb Thorat Vijay Wadettiwar Indian National Congress - Maharashtra Indian National Congress

Address

Chopda
425107

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian National Congress Jalgaon District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share