24/05/2025
महामानवांच्या विचार प्रेरणेने सामाजिक विकासासाठी कायम कटिबद्ध...
जेतवन बुद्धविहार आणि बौध्दजन ग्रामस्थ मंडळ भोमडी शाखा क्र. ८२ यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे भोमडी ता. दापोली येथे तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. या जयंती महोत्सवास भेट देऊन महामानवांना अभिवादन केले.
या यावेळी जयंती उत्सवाचे अध्यक्ष माजी समाजकल्याण सभापती श्री.भगवान घाडगे, शिवसेना दापोली तालुका प्रमुख श्री.उन्मेष राजे, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.किशोर देसाई, माजी सभापती श्रीमती रेश्माताई झगडे, माजी सरपंच श्री.अनंत निकम आदी मान्यवर तसेच भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.