College Of Agriculture Darwha - Alumni Association

College Of Agriculture Darwha - Alumni Association Official page of Alumni Association - College Of Agriculture Darwha. "माजी वि?

Late post शिवजयंती २०२२ College Of Agriculture Darwha - Alumni Association
25/02/2022

Late post



शिवजयंती २०२२ College Of Agriculture Darwha - Alumni Association

Congratulations to our mentor & guide Respected Pankaj Khade sir on being appointed as Principal - College of Agricultur...
06/01/2022

Congratulations to our mentor & guide Respected Pankaj Khade sir on being appointed as Principal - College of Agriculture, Darwha. Now COAD will definitely regain it's lost glory in upcoming time. 💐💐💐

ग्रॕज्युएट्स असोसिएशन द्वारा आयोजितरबी पिक व्यवस्थापन मार्गदर्शन सत्रदि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी दु. ०४.०० वा.नोंदणीकरता ...
24/11/2021

ग्रॕज्युएट्स असोसिएशन द्वारा आयोजित
रबी पिक व्यवस्थापन मार्गदर्शन सत्र

दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी दु. ०४.०० वा.

नोंदणीकरता गुगल फॉर्म लिंक -

https://forms.gle/dQJhLi12TdFotDU19

नमस्कार, सदैव हसतमुख असणारा व हसवणारं पण वेळ प्रसंगी तेवढंच सिरीयस होणारं व्यक्तिमत्व, आपला महाविद्यालयाचा माजी विद्यार्...
23/07/2020

नमस्कार,
सदैव हसतमुख असणारा व हसवणारं पण वेळ प्रसंगी तेवढंच सिरीयस होणारं व्यक्तिमत्व, आपला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मित्र मनोज कुमार याचं निधन झाल्याची दुखःद बातमी काल सर्वांना कळाली व सर्वांना एक वेगळाच धक्का बसला. तुमच्या सारखाच मी सुध्दा आणखी या धक्क्यातुन सावरलो नाहीये, माझा सुध्दा यावर विश्वासचं बसत नाहीये.खरं तर मनोजच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांचे झालेले नुकसान कधीही न भरुन निघणारे आहे आणि म्हणून त्याचे मित्रं या नात्याने त्याच्या कुटुंबीयांना धिर देणं व सांत्वन करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याने हे टोकाचे पाऊल उचलले पण उद्या आपल्या आजूबाजूच्या किंवा आपल्या मित्र परीवारापैकी कुणावर ही टोकाची भुमिका घेण्याची वेळ येऊ नये यासाठी या निमित्ताने एकमेकांशी संवाद साधण्याचा आपला प्रयत्न असेल. मनोजप्रती असलेल्या आपल्या प्रेमाखातर व मैत्रीसाठी आपण सर्वांनी उद्या सायंकाळी ठिक ५:०० वाजता अॉनलाईन येऊन त्याला श्रध्दांजली अर्पण करण्याचे आवाहन मी यावेळी सर्वांना करु इच्छितो.

आपण सर्व प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.

( 1️⃣ नेटवर्कमुळे होणारी गैरसोय व धावपळ आणि गङबङ टाळण्यासाठी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे आधी जॉईन व्हावे ही विनंती.)

------------ ------------ ------------

Alumni Association - College Of Agriculture Darwha is inviting you to a scheduled Zoom meeting.

Topic: Condolence meeting in memory of Manoj Kumar
Time: Jul 24, 2020 05:00 PM Mumbai, Kolkata, New Delhi

Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/78449789659?pwd=T0hMcVo5VDgrVzJ1MGxDelhPbEJqUT09

Meeting ID: 784 4978 9659
Passcode: ripmanoj

It is shocking and melancholic to share the sad demises of our alumni Mr.Manoj Kumar Pothuganti from LL Series. May your...
22/07/2020

It is shocking and melancholic to share the sad demises of our alumni Mr.Manoj Kumar Pothuganti from LL Series. May your soul rest in peace Manoj Kumar.

🙏💐🙏कृषि महाविद्यालय दारव्हाच्या सर्व आजी-माजी विद्यार्थांना नमस्कार,कृषि महाविद्यालय दारव्हाच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ...
21/07/2020

🙏💐🙏कृषि महाविद्यालय दारव्हाच्या सर्व आजी-माजी विद्यार्थांना नमस्कार,
कृषि महाविद्यालय दारव्हाच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाच्या ग्रुपमध्ये/आपल्या वर्गमित्रांना हि लिंक फॉरवर्ड करावी.👉👉👉

https://forms.gle/fxrLzY9UCSpGmanEA

"कृषि महाविद्यालय दारव्हा" या आपल्या महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा परिवार "Alumni Association - College Of Agriculture Darwha" (माजी विद्यार्थी संघटना) - या नावाने सुरु करून सुरुवातीपासूनचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी या माध्यमातून जोडण्याचे काम आपण सुरु करीत आहोत. आपल्या या मोठ्या अश्या मित्र परीवाराबद्दल आपण अधिक माहिती खालील फेसबुक पेज आणि वर दिलेल्या लिंक वर क्लीक करून फॉर्म डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता.

(सदर फॉर्म लिंक हि फक्त "कृषि महाविद्यालय दारव्हाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांकरीताच आहे याची नोंद घ्यावी)

- धन्यवाद

नमस्कार, महाविद्यालयीन जीवन तीन-चार वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचे, आपल्या भविष्याला आकार देण्याचे आणि...

21/04/2019

College of Agriculture Darwha

Video Credit.- Pratik Khadse

घासुन नाय,ठासुन आलो...!!व्वा रे पठ्ठ्यांनो...कृषि महावाद्यालय दारव्हा चमुने युवा महोत्सव समुहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक ...
17/10/2017

घासुन नाय,ठासुन आलो...!!
व्वा रे पठ्ठ्यांनो...

कृषि महावाद्यालय दारव्हा चमुने युवा महोत्सव समुहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलांय..!

अभिनंदन💐💐💐💐😃


याला म्हणतात दंगल....!!!!आपल्या कॉलेजच्या मुलींच्या खो खो टिमने पटकावलंय उपविजेते पद.होऊन जाऊ द्या मग एक लाईक.!proud of ...
20/08/2017

याला म्हणतात दंगल....!!!!

आपल्या कॉलेजच्या मुलींच्या खो खो टिमने पटकावलंय उपविजेते पद.
होऊन जाऊ द्या मग एक लाईक.!
proud of you girls.!

#दंगल #खोखो

Address

Arni Road
Darwha

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+918237572315

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when College Of Agriculture Darwha - Alumni Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to College Of Agriculture Darwha - Alumni Association:

Share

महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा परीवार

नमस्कार, महाविद्यालयीन जीवन तीन-चार वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचे, आपल्या भविष्याला आकार देण्याचे आणि अविस्मरणीय असे वर्ष असतात, या कालावधीत मिळालेले अनुभव, शिकवण, आपली अभ्यासाची तालीम, आपला सामाजिक आणि बौद्धीक विकासच आपल्या उज्ज्वल भविष्यकारता कारणीभूत ठरतो. "कृषि महाविद्यालय दारव्हा" या एक नावाने आपण आणि आपल्या सारखे शेकडो तरुण तरुणी आपल्या उज्ज्वल आणि उन्नत भविष्याचे स्वप्न घेऊन एकमेकांशी जुळल्या गेलोत, सिनियर - जुनिअर, लेक्चरर-विद्यार्थी, रूममेट-बेंचमेट, अनोळखी चेहरे ते जिगरी यारी, चहा पार्टनर ते टेबल पार्टनर असा प्रवास आपल्यापैकी जवळपास प्रत्येकानेच केला असावा. चार वर्षांच्या या रोमांचक आणि सुख-दुःख मिश्रित प्रवासानंतर प्रत्येक जण आपल्या पुढल्या प्रवासाकरीता पुन्हा मार्गक्रमित झालेत, बी.एस.सी ऍग्रीकल्चर नंतर कोणी एम.एस.सी अथवा इतर उच्च शिक्षण करीता नामांकित महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये निवडल्या गेलेत तर कोणी आपला व्यवसाय सुरु केला तर कोणी कंपनी मध्ये विविध पदांवर रुजू झालेत तर आपलेच कोणी मित्र मैत्रिणी, सिनियर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विविध पदांवर कार्यरत झाले. थोडक्यात सगळेच आप-आपल्या क्षेत्रात संघर्ष करून मेहनतीने नावलौकिक मिळवतायत. कामानिमित्य कुठे बाहेर गेल्यावर, प्रवासात अथवा कुठेही कोणीही "अग्रीकॉस" भेटला तर फार छान वाटतं, आणि त्यातही आपल्या महाविद्यालयाचा कोणी "अग्रीकॉस" भेटला तर विषयच नाही ना मग ! "कृषि महाविद्यालय दारव्हा"च्या माजी विद्यार्थ्यांचा एक परिवार आपण या माजी विद्यार्थी संघटनेद्वारे तयार करून त्या माध्यमातून आपल्या "कृषि महाविद्यालय दारव्हा"च्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि नोकरी विषयक प्रश्नांवर आपण आपल्या आजी-माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणीची मदत करावी या उद्देशाने आपण एकत्र येत आहोत आणि त्याच करीता सदर गूगल फॉर्म आपल्या पर्यंत घेऊन आलो आहे. तरी कृपया ह्या फॉर्म मध्ये आपली संपूर्ण माहिती भरावी हि आपणास विनंती. माजी विद्यार्थी संघटनेचे प्रस्तावित उद्दिष्ट्ये :- १. कृषि महाविद्यालय दारव्हाच्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना संघटीत करून विद्यार्थ्यांच्या विकासाला हातभार लावणे. २. आजी माजी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, व्यावसायिक तसेच सामाजिक आणि सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून काम करणे. ३. आर्थिक बाजू कमकुवत असलेल्या विद्यार्थ्याला मदत करणे. ४. महाविद्यालयातून पदवी प्राप्त होणाऱ्या अथवा झालेल्या गरजू विद्यार्थ्याला, जो माजी विद्यार्थी संघटनेचा सदस्य असेल त्याला मार्गदर्शन आणि समुपदेशनाद्वारे नोकरी मिळवून देण्याकरीता प्रयत्न करणे. ४. कृषि महाविद्यालय दारव्हाच्या विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव, कौशल्य विकासावर भर देणे. ५. B.Sc Agriculture नंतर पुढे काय ? - उच्च शिक्षणाकरीता मार्गदर्शन करणे. ६. नियमित महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक ज्ञान,मार्गदर्शन देण्यावर भर देणे. ७. सांस्कृतिक, कला-क्रीडा प्रकारामध्ये यशस्वी विद्यार्थी घडविणे. * आपल्या सूचना अथवा प्रतिक्रिया आपण "[email protected]" या ई-मेल आयडी वर शेअर करू शकता.