05/07/2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) दर्यापूर ग्रामीण ) पक्षाच्या तालुकाध्यक्ष ग्रामीण पदी प्रा.डॉ. सुशील गावंडे यांची निवड झाल्यानंतर "संवाद आपुलकीचा व तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा " या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील भेटीगाठी व दौऱ्याअंतर्गत येत असलेल्या वाढदिवस,गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी सत्कार तसेच सुखदुःखाच्या ठिकाणी भेटीगाठी दिल्यात.संवाद आपुलकीचा व तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा " या उपक्रमामुळे सर्वच ठिकाणी संवाद ,आपुलकी , जिव्हाळा या सर्व बाबींचा वर्षा होत होता. तालुक्यात असलेल्या प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मधील काही निवडक गावामध्ये या दौऱ्या अंतर्गत प्रत्यक्ष जाता आले. तेथील भेटीगाठी घेण्यात आल्या उपक्रम जरी पक्षाचा असला तरी त्यातून जनहित साधला जावे सर्वांचे आपुलकीने संवाद साधता यावा तसेच वडीलधारी व्यक्तींचा आशीर्वाद घेता यावा हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.या दौऱ्याला माजी शिक्षण सभापती अमोल गहरवाल,सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष अनंतराव राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अरबट,माजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कपिल पोटे, पियुष हुतके ,जिल्हा संघटक प्रा.अनिरुद्ध होले,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नितीन गावंडे,माजी सरपंच दिलवर शहा ,डॉ.सुशांत गावंडे ,प्रतीक नाकट,संतोष ढोकणे,योगेश हिंगणकर, प्रथमेश रायपुरे होते.
Sharad Pawar Jayant Patil - जयंत पाटील Supriya Sule Rohit Rajendra Pawar Pradip Raut Sushil Gawande Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Rashtrawadi updates NCP Youth Amravati