आम्ही महाराष्ट्रीयन महाराष्ट्र राज्य

  • Home
  • आम्ही महाराष्ट्रीयन महाराष्ट्र राज्य

आम्ही महाराष्ट्रीयन महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक विकास सेवा संस्था मर्यादित.महाराष्ट्र राज्य.🚩

 #कोकणातील शेतकऱ्यांना, या महागाईच्या पुढील काळात, टिकायचे असेल तर, त्यांच्यासमोर, सामूहिक शेती, हाच एक उत्तम पर्याय आहे...
30/03/2026

#कोकणातील शेतकऱ्यांना, या महागाईच्या पुढील काळात, टिकायचे असेल तर, त्यांच्यासमोर, सामूहिक शेती, हाच एक उत्तम पर्याय आहे. सामूहिक शेती केली, तरच, पुढील काळात, कोकणातील शेतकरी, टिकून राहू शकतो.

तसेच गटशेती करताना, कोकणातील शेतकऱ्यांनी, पारंपरिक शेतीला फाटा देऊन, शेतीमध्ये, आधुनिक यंत्र सामग्री आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरून, शेती केली पाहिजे.

ते कसे करावे? आणि त्यासाठी, सुरवातीला काय केले पाहिजे.त्याबद्दल हा सविस्तर लेख वाचा......

#गटशेती प्रारंभ.....
तर, सुरवातीला, कोकणातील प्रत्येक गावच्या वाडीतील, दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, एक सामूहिक शेतकरी गट स्थापन केला पाहिजे. त्या स्थापन केलेल्या, शेतकरी गटाची, रीतसर शासनाकडील कृषि विभागाकडे नोंदणी (रजिस्टर) करून घेतली पाहिजे. म्हणजे शासनाकडे रीतसर नोंदणी केल्यामुळे, शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा, त्या गटाला लाभ घेता येतो.

#सामूहिक (गटशेती) शेती आणि त्याचे फायदे खालील प्रमाणे......

१) सामूहिक शेतीगट शासनाकडे रजिस्टर केल्यामुळे, शासनाकडुन त्या गटाला, शेती अवजारे, आधुनिक यंत्र सामग्री घेण्यासाठी, अल्प व्याज दराने कर्ज मिळते. तसेच आधुनिक शेती अवजारे घेण्यासाठी, सरकारकडून पन्नास टक्के किंवा शंभर टक्के अनुदान मिळते. तसेच #नाबार्ड ही संस्था ही, त्या गटशेती गटाला, कमी व्याजदरात, शेतीसाठी कर्ज पुरवठा करते.
२) तसेच सामूहिक शेती करणाऱ्यांना, #व्हीबीजी #ऍग्रो फर्मचे मा.श्री. हणमंतराव गायकवाड साहेब किंवा #सह्याद्री #ऍग्रो फर्मचे ज्ञानेश्वर बोडके साहेब, यांच्यासारख्या, खाजगी संस्थांकडून ही, शेतकऱ्यांना गटशेती करण्यासाठी, मदत केली जाते.
३) तसेच सामुहिक शेती केल्यामुळे, श्री हणमंतराव गायकवाड साहेब, श्री ज्ञानेश्वर बोडके साहेब किंवा मोठा व्यापारी, स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन, आपला शेतमाल, घाऊक दराने खरेदी करतात.
४) आणि शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे, गावात फक्त एका शेतकऱ्याने शेती केली तर, वन्य प्राणी येऊन त्या शेताचे संपूर्ण नुकसान करतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. आणि शेवटी तो शेतकरी कर्ज बाजारी होऊन, शेती करायचे सोडून देतो.
परंतु सामुहिक शेतीचे, वन्य प्राण्यांकडून नुकसान झाले तर ते, सर्वांचे एकत्रित नुकसान होते, त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आर्थिक भार, त्या शेतकरी गटातील, प्रत्येक शेतकऱ्याला थोड्या प्रमाणात, सोसावा लागतो. एकट्या दुकट्या शेतकऱ्याला सोसावा लागत नाही.
टिपः फळबाग व व्यवसायिक शेती करण्यासाठी, बारमाही कोकणातील सर्व नद्यांना मुबलक प्रमाणात पाणी,हाच कोकणच्या आर्थिक विकासाचा, खरा राजमार्ग आहे.
धन्यवाद.

11/01/2026

कोल्हापूर शहरात किंवा शहरा जवळील उपनगरात, सकाळी आठ ते संध्याकाळी सात या वेळेत, एक ते दोन तासाचे, वरील प्रकारचे, होम केअरचे पेशंट असेल, तर मला त्वरीत व्हॉटसअप मॅसेज करा. मी ऑन कॉल अर्जंट मध्ये जाऊ शकतो.
🛌🫀🦴🧠 🩻🩺💉💊👩‍🦼🚑
रुग्णांच्या आजारपणात, तत्पर सेवा,
🙏हेच आमचे ब्रीदवाक्य 🙏🏻

11/01/2026

गावं माझं आल, गुगल मॅपवर.
मु.भोवडे, पो. किरबेट, व्हाया- साखरपा,
ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी.
🚩🛕🛕🛕🚩

08/12/2025

#सरकारी #ग्रामीण #रुग्णालय #साखरपा
साखरपा बाजार पेठेत, लाखो रुपये खर्च करून, एवढा मोठा नवीन सरकारी दवाखाना बांधला आहे. पण त्या दवाखान्यात , रुग्णांच्या सेवेसाठी, शासनाने, आतापर्यंत एकाही तज्ञ डॉक्टरांची, कायमस्वरूपी नियुक्ती केलेली नाही.
साफ चावला, कुत्रा चावला तरी, पेशंटला, रत्नागिरी किंवा कोल्हापूरला जावे लागते.
याच्यावर सर्वांनी मिळून आवाज उठवला पाहिजे, आणी लोक लढा दिला पाहिजे.
या नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नावर, गेली कित्येक वर्ष, कोणीही आवाज उठवत नाहीत किंवा साधे आंदोलन करत नाहीत.
पंचक्रोशीतील स्थानिक पातळीवरिल पुढारी, लोक प्रतिनिधी, आमदार, याना या समस्येच, काहीही गांभीर्य वाटत नाही किंवा त्यांना त्यांच काही पडलेलं नाही.

कोकणातील जनता आपल्या गावातील एखाद्या समस्येवर किंवा आपल्या भागांतील गैरसोय, शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी, सर्वांनी एकत्र येऊन, एकजुटीने आंदोलन करायला केव्हा शिकणार. कोल्हापूरांसारखी. एखाद्या अन्यायाविरोधात लढा द्यायला कधी शिकणार, कोल्हापूरच्या नागरिकांसारखे. झोपेचे सोंग घेतलेली, कोकणातील नागरिक कधी जागे होणार.

टीप: साखरपा बाजार पेठेतील, या सरकारी दवाखान्यात, दवाखान्याची जुनी कौलारू इमारत असताना, पंचक्रोशीतील रूग्णांना खूप चांगल्या, आरोग्य सुविधा मिळत होत्या. पण आता चांगली टुमदार नवीन सर्वसोयीनियुक्त, सुसज्य अशी नवीन इमारत होऊन देखील, पूर्वीसारखा चांगल्या आरोग्य सोयी सुविधा मिळत नाहीत, हे दुर्दैव.
धन्यवाद.

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही महाराष्ट्रीयन महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share