19/09/2025
गावातील सर्व बेरोजगार तरुण,तरुणी,महिला बचत गट सदस्य,शेतकरी बांधव आणि नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की,आज आपल्या गावात,बँक ऑफ महाराष्ट्र शाखा,नंदोरी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने "ग्राहक सेवा पंधरवडा जनजागृती कार्यक्रम"अंतर्गत सोशल कॅम्प आयोजित करण्यात आला आहे,तरी गावातील सर्व नागरिकांनी सकाळी ठीक १० वाजता ग्राम पंचायत कार्यालयात उपस्थित रहावे ही विनंती..
कॅम्प मधे खालील विषयावर घेण्यात येत आहे.
१.अटल पेन्शन योजना
२.प्रधानमंत्री जनधन खाते
३.प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा
४.नवीन खाते काढणे
५.प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया योजना (PMEGP)
६.मुख्यमंत्री सूक्ष्म प्रक्रिया योजना (CMEGP)
७.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
तसेच इतर शासकीय योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
तसेच या कार्यक्रमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,नागपूरचे AGM माननीय श्री.पाटील साहेब,(असिस्टंट जनरल मॅनेजर)यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा करिता माहितीस सादर.....
Government organization