खोणी म्हाडा कॉलनी - Khoni Mhada

 #खोणी आणि  #शिरढोण येथील  #प्रधानमंत्री_आवास_योजना अंतर्गत  #म्हाडा_सदनिका यांचे  #सेवाशुल्क_कमी झालेमुंबई, ता. ११ : म्...
12/09/2026

#खोणी आणि #शिरढोण येथील #प्रधानमंत्री_आवास_योजना अंतर्गत #म्हाडा_सदनिका यांचे #सेवाशुल्क_कमी झाले

मुंबई, ता. ११ : म्हाडाच्या #कोकण_मंडळातर्फे #खोणी_म्हाडा आणि #शिरढोण_म्हाडा येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित लाभार्थ्यांना लागणाऱ्या सेवाशुल्कात (मासिक देखभाल खर्च) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मासिक ३००-६०० रुपयांची घट होणार आहे. हे सुधारित सेवाशुल्क १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी Sanjeev Jaiswal I.A.S संजीव जयस्वाल यांनी २१ मे २०२६ रोजी आणि येथील #म्हाडा प्रकल्पांची स्थळ पाहणी केली होती. या वेळी योजनेतील लाभार्थ्यांनी सदनिकांसाठी आकारण्यात येणारे सेवाशुल्क कमी करण्याची विनंती करण्यात आली होती. लाभार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत जयस्वाल यांनी सेवाशुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खोणी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांसाठी सध्या आकारण्यात येणारे ₹२,४२२ रुपयांचे मासिक शुल्क ₹१,८०० रुपये करण्यात आले आहे. शिरढोण येथील पीएम आवासच्या सदनिकांसाठी सध्या आकारण्यात येणारे ₹१,९७९ रुपयांचे मासिक शुल्क ₹१,७०० रुपये करण्यात आले आहे. या निर्णयामुळे खोणी येथील लाभार्थ्यांना दरमहा ₹ ६२२, तर शिरढोण येथील लाभार्थ्यांना दरमहा ₹ २७९ इतका आर्थिक दिलासा मिळणार आहे.

13/03/2026

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा. श्री #राजेशजी_मोरे_साहेब यांनी कल्याण परिसरातील #खोणी, #शिरढोण, #भंडार्ली आणि #गोठेगर या चारही #म्हाडा_प्रकल्पातील सदनिकाधारकांवर पडत असलेल्या वाढीव #मासिक_मेंटेनन्सच्या #आर्थिक_भाराचा मुद्दा सभागृहात ठामपणे मांडून शासनाचे लक्ष वेधले, ही सर्वसामान्य रहिवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बाब आहे.

सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत आपण दाखवलेली संवेदनशीलता, तसेच त्यांच्या न्याय हक्कांसाठी सभागृहात प्रभावीपणे आवाज उठवण्याची आपली भूमिका आमदार Rajesh Govardhan More साहेब खरोखरच प्रशंसनीय आहे. आपल्या या पुढाकारामुळे हजारो म्हाडा रहिवाशांच्या अपेक्षांना नवे बळ मिळाले आहे.

#खोणी_म्हाडा_रहिवासी_संघटनेच्या वतीने आपण घेतलेल्या या ठोस आणि सकारात्मक भूमिकेबद्दल #मनःपूर्वक_आभार व #कृतज्ञता व्यक्त करत आहोत. भविष्यातही आपल्या नेतृत्वाखाली रहिवाशांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा आम्हाला दृढ विश्वास आहे.

—@ #खोणी_म्हाडा_कॉलनी 🙏🏻 आणि #खोणी_म्हाडा_रहिवासी_संघटना 🙏🏻

Address

Dombivli
421204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when खोणी म्हाडा कॉलनी - Khoni Mhada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share