28/09/2024
डॉ. रेखा चव्हाण गोर्लेगावकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न
सुंदर माझा बाप्पा स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा आणि गुरुजनांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
हदगाव दि. 28 : महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दि. 28 रोजी थाटात संपन्न झाले .
तहसील कार्यालयासमोर, हदगाव येथे डॉ. रेखाताई चव्हाण पाटील गोर्लेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ प्रसंगी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पाटील अष्टीकर, विशेष उपस्थिती कल्पना खानसोळे, मार्गदर्शक म्हणून बिंदू महाविद्यालय भोकरचे प्राचार्य डॉ. पंजाबराव चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य, प्रा. राजेश फुलारी, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर चे माजी सभापती दत्त रामजी करंजीकर, मुधोळकर, अन्वर खान पठाण, हनीफ, निवघा येथील माजी सरपंच भास्करराव पाटील, नेवरी येथील कैलास शिंदे, कल्याणकर, जाधव, शिंदे, माणिक कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
गणेशोत्सवानिमित्त हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील गणेश मंडळ व गणेश भक्तांसाठी "सुंदर माझा बाप्पा" या स्पर्धेचे आयोजन विशेषतः तरुण युवकांसाठी करण्यात आले होते. या स्पर्धेत आपली गणराया विषयी असणारी आस्था आणि कला दाखवण्याची ही सुवर्णसंधी महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांनी उपलब्ध करून दिली होती. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
"सुंदर माझा बाप्पा" या स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा थाटात संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक हे तब्बल 51 हजार रुपये होते जे जय महाराष्ट्र गणेश मंडळ, यशवंत नगर, हदगाव यांनी पटकावले तर द्वितीय पारितोषिक 21 हजार होते ते मातोश्री युवा गणेश मंडळ, मौजे धानोरा माऊली आणि तृतीय पारितोषिक हे 15 हजार रुपयांचे इंद्रधनुष्य बाल गणेश मंडळ, धानोरा माऊली आणि उत्तेजनार्थ 11 हजार रुपयाचे बक्षीस फार्मसी वाले गणेश मंडळ, बाभळी व 7 हजार रुपयाचे बक्षीस शिवशंभू बाल गणेश मंडळ, वायपना बुद्रुक यांनी पटकावले तसेच या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्वच गणेश मंडळ आणि स्पर्धकांचे प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
या बक्षिस वितरण सोहळ्यातच दोन्ही तालुक्यातील विद्यार्थी घडवण्याचं कार्य करणारे गुरुवर्य यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सुमन सभागृह, हदगाव येथे सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी केले तर प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांनी केले.