महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष

  • Home
  • India
  • Indapur
  • महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कष्टकरी, कामगार, दलित, आदिवासी, महिला, विद्यार्थी, यांच्या सेवेसाठी तत्पर

17/07/2026

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे उजनी धरणग्रस्त शेतकरी यांच्या न्याय हक्का साठी बेमुदत अर्धनग्न धरणे आंदोलन सुरू आहे आज दि 17/7/2026 रोजी प्रशासन आंदोलन स्थळी थोड्याच वेळात उपस्थित राहुन चर्चा करणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाईल हे आंदोलन फेसबुक लाईव्ह करण्यात येणार आहे थोड्याच वेळात

17/07/2026
19/06/2026

*दि.20/06/2026*
*मा.संजय भैय्या सोनवणे पक्षप्रमुख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हे शनिवार दिनांक 20/06/2026 रोजी पंढरपूर शासकीय विश्राम गृह येथे दुपारी 1:00 वाजता येत आहेत तरी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे हि विनंती*
मा. लखन भंडारे
सोलापूर जिल्हा अध्यक्ष
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष

*दि.19/6/2026 उजनी धरण तरटगांव* *महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पक्षप्रमुख मा.संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उजनी धर...
19/06/2026

*दि.19/6/2026 उजनी धरण तरटगांव*
*महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पक्षप्रमुख मा.संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी वरील शासनाने जे . डब्यू . ग्लोबल ग्रूप सोबत केलेला करार तात्काळ रद्द करावा व अतिरिक्त संपादित जमिनी मुळ शेतकऱ्यांना परत देण्यात याव्यात यासाठी उजनी धरण इंदापूर हद्दीतील तरटगांव गेट येथे बेमुदत अर्धनग्न धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा आजचा 18 वा दिवस आहे प्रशासनाने अजुन तरी मागण्या मान्य केल्या नाहीत जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार*.
👍💪*जय जवान जय किसान* 👍💪

*दि.18/6/2026 उजनी धरण तरटगांव* *महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पक्षप्रमुख मा.संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उजनी धर...
18/06/2026

*दि.18/6/2026 उजनी धरण तरटगांव*
*महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पक्षप्रमुख मा.संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी वरील शासनाने जे . डब्यू . ग्लोबल ग्रूप सोबत केलेला करार तात्काळ रद्द करावा व अतिरिक्त संपादित जमिनी मुळ शेतकऱ्यांना परत देण्यात याव्यात यासाठी उजनी धरण इंदापूर हद्दीतील तरटगांव गेट येथे बेमुदत अर्धनग्न धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा आजचा 17 वा दिवस आहे प्रशासनाने अजुन तरी मागण्या मान्य केल्या नाहीत जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार*.
👍💪*जय जवान जय किसान* 👍💪

13/06/2026

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख मा. संजय भैय्या सोनवणे उजनी धरण आंदोलन ठिकाणावरून आता थोड्या वेळात 5:00 वाजता फेसबुक लाईव्ह येणार आहेत 👍

दि.12/6/2026 इंदापूर उजनी धरण महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पक्षप्रमुख मा संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणग्...
13/06/2026

दि.12/6/2026 इंदापूर उजनी धरण
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पक्षप्रमुख मा संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी 2/6/2026 पासुन बेमुदत अर्धनग्न धरणे आंदोलन सुरू आहे संबंधित विभागाने योग्य तो निर्णय लवकर न घेतल्याने दि 12/6/2026 रोजी उजनी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाला पत्र देऊन कळवले होते परंतु इंदापूर चे तहसीलदार मा जिवन बनसोडे साहेब यांनी बैठक घेऊन प्रशासनाच्या वतीने विनंती केली आपल्या मागण्या वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवलेल्या आहेत त्यामुळे आपण थोडा वेळ प्रशासनाला द्यावा तसे लेखी पत्र संबंधित विभागाला द्यायला सांगितले त्यानुसार संबंधित विभागाचे अधिकारी आंदोलन स्थळी उपस्थित राहून त्यांनी लेखी पत्र दिले त्यानंतर त्यांना जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असलेले पत्र दिले यावेळी प्रशासनाकडून देखील जलसमाधी आंदोलन करू नये म्हणून पोलीस बंदोबस्त, आरोग्य विभागाने कर्मचारी व ॲब्युलन्स पाण्यात बोटी बाकी इतर साहित्य पण आंदोलक सुद्धा अट्टल पाहणारे होते या आंदोलनाची महाराष्ट्र भर चर्चा झाली असती परंतु प्रशासनाकडून या दखल घेतली गेली पण जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आता अर्धनग्न आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे .

*मा.सुनेत्रावहिनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांची व कृषिमंत्री दत्ता...
11/06/2026

*मा.सुनेत्रावहिनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांची व कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची मुंबई येथे मा.संजय भैय्या सोनवणे पक्षप्रमुख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री स्व अजित दादा पवार यांनी विधानसभा निवडणूक दरम्यान मुंबई देवगिरी येथे कृषिमंत्री मा दत्तात्रय मामा भरणे यांच्या मध्यस्थीने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख मा.संजय भैय्या सोनवणे यांच्या सोबत बैठक आयोजित केली होती या झालेल्या बैठकीत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला मित्रपक्ष म्हणून इंदापुर येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याचे ठरले त्या प्रमाणे इंदापूर येथे स्व अजितदादा पवार व संजय भैय्या सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला मित्रपक्ष म्हणून जाहीर केले. तेव्हा पासुन आजपर्यंत सर्व निवडणुका मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवाराचा प्रचार तन मन धनाने पक्षाने प्रामाणिकपणे केला आहे पण मुंबई देवगिरी येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी कडून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला विधानपरिषदेची एक जागा किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेल्या 23 महामंडळा पैकी एक महामंडळ महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला देण्यात येईल हा शब्द स्व. अजितदादा पवार यांनी कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या उपस्थितीत दिला होता तो शब्द पुर्ण करण्या संदर्भात उपमुख्यमंत्री मा.सुनेत्रावहिनी अजितदादा पवार व कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना पत्र दिले व याविषयावर त्यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली.यामुळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला बळकटी मिळेल व महाराष्ट्रातील सर्व घटकांना रोजगार व अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक जोमाने काम करता येईल*

Address

Near Police Station Market Committee Shop No.14
Indapur
413106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category