Harshvarrdhan Patil

Harshvarrdhan Patil • President, National Federation of Cooperative Sugar Factories Ltd
• Former Cabinet Minister, Maharashtra
• Chancellor, Pimpri Chinchwad University and 2009.

Harshvardhan Shahaji Patil (Marathi: हर्षवर्धन शहाजी पाटील ) (born August 21, 1963), is a Maharashtra politician from Bharatiya Janata Party.[1]

He was one of the few ministers who was presiding as a minister for four consecutive terms in Government of Maharashtra. He has shouldered responsibilities of Cooperative Ministry and currently Legislative Affairs. He is known for cordial relations with

all party members. He is Minister since 1995. He was elected MLA in 1995, 1999, 2004. He was appointed as co-operation and parliamentary affairs minister in Chief minister Prithviraj Chavan's ministry. Patil has a soft image in among the ministers. He is the nephew of Shankarrao Bajirao Patil, the former MP.

📍 यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईसहकार क्षेत्रातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श ठरलेले सहकारी संस्...
06/08/2026

📍 यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई

सहकार क्षेत्रातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श ठरलेले सहकारी संस्था, मुंबई (१) शहरचे जिल्हा उपनिबंधक श्री. नितीन पांडुरंग काळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभास उपस्थित राहून त्यांचा सत्कार सन्मान केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा केवळ एका अधिकाऱ्याचा नाही, तर जिद्द, चिकाटी, सचोटी आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर उंच भरारी घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी सहकार क्षेत्रातील प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने मोलाचे योगदान दिले.

शासकीय सेवेत अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडताना त्यांनी शेतकरी, सहकारी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या निर्णयक्षमतेने, अभ्यासू वृत्तीने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने सहकार विभागाला नवी दिशा देण्याचे कार्य केले.

आज त्यांच्या प्रदीर्घ, यशस्वी आणि उल्लेखनीय सेवेचे कौतुक करताना मन अभिमानाने भरून आले. त्यांचे कार्य, मूल्ये आणि सेवाभाव पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील.

श्री. नितीन काळे यांना निरोगी, आनंदी, समृद्ध आणि समाधानकारक निवृत्त जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ समाजाला व सहकार क्षेत्राला पुढेही मिळत राहो, हीच सदिच्छा.

#सहकार

जुन्या पिढीतील एक ऋषितुल्य नेतृत्व हरपले....!माजी राज्यपाल, डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत...
05/08/2026

जुन्या पिढीतील एक ऋषितुल्य नेतृत्व हरपले....!

माजी राज्यपाल, डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील दादा यांचे काल सकाळी दुःखद निधन झाले. आज कोल्हापूर येथील निवासस्थानी जाऊन दादांचे अंत्यदर्शन घेतले व श्रद्धांजली अर्पण केली. तसेच यावेळी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन देखील केले.

महाराष्ट्राच्या शिक्षण, सहकार, आरोग्य तसेच सामाजिक व राजकीय पटलावर दादांचे योगदान हे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे असे आहे. त्यांच्या निधनाने राज्यातील जुन्या पिढीतील एक ऋषितुल्य नेतृत्व हरपले आहे.

त्यांनी कोल्हापूरचे महापौर, पन्हाळ्याचे आमदार, विविध राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून केलेले काम आजही तेथील जनतेच्या स्मरणात आहे. त्यानंतर शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती विद्यार्थ्यांसाठी केलेले आदर्श कार्य प्रेरणादायी आहे.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील कुटुंबीयांना तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

📍 मुंबईआज महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक...
04/08/2026

📍 मुंबई

आज महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री मा.दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.
प्रसंगी विविध विकासकामे, पायाभूत सुविधा, शिक्षण तसेच नागरिकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या विषयांबाबत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या कामांसाठी पत्र दिले.

भावपूर्ण श्रद्धांजली दादा !माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि राष्ट्...
04/08/2026

भावपूर्ण श्रद्धांजली दादा !

माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि राष्ट्रसेवेच्या क्षेत्रातील एक युगपुरुष काळाच्या पडद्याआड गेले.

शिक्षण हीच खरी समाजपरिवर्तनाची ताकद आहे, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली केली. ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीमुळे असंख्य विद्यार्थी, कुटुंबे आणि समाजाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या कार्याचा सुवर्णठसा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात सदैव अजरामर राहील.

त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, शिक्षणाविषयीची निष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी ही भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.

डॉ. डी. वाय. पाटील दादांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर, विद्यार्थी परिवारावर आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. 🙏🏻💐

📍 इंदापूर तालुकाआमचे सहकारी मित्र, खासदार श्री. बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आपल्या इंदापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट द...
25/07/2026

📍 इंदापूर तालुका

आमचे सहकारी मित्र, खासदार श्री. बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आपल्या इंदापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी विकास, सहकार, शिक्षण आणि जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
तसेच त्यांनी शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस. बी. पाटील एज्युकेशनल कॅम्पस, दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ, इंदापूर तालुका शिक्षक प्रसारक मंडळाचे इंदापूर कॉलेज तसेच इतर विविध संस्थांना भेट देऊन तेथील कार्याची माहिती घेतली.

Address

Indapur
Indapur
413103

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harshvarrdhan Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Harshvarrdhan Patil:

Shortcuts

Share