27/05/2026
मान्सूनपूर्व तयारी: जळगाव मनपा अग्निशमन दलाची मेहरूण तलावावर शोध व बचाव प्रात्यक्षिके
जळगाव (प्रतिनिधी): येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जळगाव प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे साहेब यांच्या आदेशानुसार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, जिल्हा पोलीस दल, महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा ,मनपा आरोग्य रमेश कांबळे साहेब विभाग, महावितरण या सर्व विभागाच्या वतीने मेहरून तलाव येथील गणेश घाट येथे मंगळवारी विशेष शोध व बचाव साहित्य प्रात्यक्षिके घेण्यात आली.
आपत्कालीन सज्जतेचा सराव
संध्याकाळी पाच वाजता पार पडलेल्या या सराव सत्राचा मुख्य उद्देश मान्सून काळात निर्माण होणाऱ्या पूरस्थिती किंवा बुडण्याच्या दुर्घटनांच्या वेळी बचाव पथकाची सज्जता तपासणे हा होता. या मोहिमेत शोध बचाव साहित्याचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष दर्शन घडवण्यात आले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग
सदर प्रात्यक्षिके मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नरवीर रावळ सर आणि केंद्र अग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या सरावात अग्निशमन दलाचे वाहन चालक प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, यश अहिरे, अजय पाटील, दीपक चौधरी ,108 ॲम्बुलन्स वाहन चालक संदीप गवले ,डॉ. मोईन शेख एम एस सी बी चे साहेब कार्यकारी अभियंता साळी साहेब, हर्षल नेते फायरमन योगेश कोल्हे, संजय तायडे भूषण पाटील नितीन ससाने जगदीश साळुंखे किरण पाटील राकेश सोनवणे विकी सोनवणे यांच्यासह , आणि या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. महाराष्ट्र शासनातर्फे जिल्ह्यातील 15 पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 87 पोलीस चौकींकरिता वाटप करण्यात आलेले आपातकालीन बचाव साहित्य किट याबाबत उपस्थितांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच महानगरपालिकेच्या आणीबाणी व आपत्कालीन सेवा पथकाद्वारे बोटीच्या सहाय्याने बचाव कार्य बाबत प्रात्यक्षिक करण्यात आले आणि एमएसईबीच्या आपत्कालीन पथकाद्वारे विजेच्या तारा जवळ असलेल्या झाडांच्या फांद्या कशा पद्धतीने कापण्यात येतात याबाबत प्रत्यक्ष करण्यात आले
प्रशासनाकडून तत्परतेचा संदेश
पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा अन्य आपत्तीच्या वेळी अग्निशमन दल किती वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकते, याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जळगाव मनपाचे प्रशासन आणि बचाव पथक पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.