13/12/2025
पोलन पेठ,दाना बाजार येथे श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे श्री गुरुदत्त जयंती उत्साहात साजरी
4/12/2025 रोजी श्री गुरुदत्ताची महाआरती माननीय आमदार राजू मामा भोळे गुरुदत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय तुकाराम चौधरी सामाजिक कार्यकर्ता चित्रा मालपाणी यांच्या हस्ते दत्ताची आरती करण्यात आली. व महाप्रसादाचे नियोजन केले गेले या प्रसंगी ५०० गरजू मुलांना स्वेटर वाटप; आमदार राजू मामा भोळेंच्या हस्ते सामाजिक बांधिलकीचा वसा
जळगाव :
दत्त जयंतीचे औचित्य साधत दाना बाजार, पोलन पेठ, जळगाव येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला. शहरात कडाक्याच्या थंडीची लाट असताना ५०० गरजू मुलांना उबदार स्वेटरचे मोफत वाटप करण्यात आले. हा उपक्रम जळगाव शहरातील भाजपा लाडके आमदार राजू मामा सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमात भाजपा जळगाव शहर चिटणीस चित्रलेखा ताई मालपाणी यांच्या कडून मुलांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. थंडीमुळे त्रस्त असलेल्या गरीब व गरजू बालकांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंदाचे समाधान झळकत होते.
आमदार राजू मामा भोळे यांनी यावेळी बोलताना, “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हेच आमचे खरे राजकारण आहे. गरजूंची सेवा हीच खरी ईश्वरसेवा,” असे प्रतिपादन केले. चित्रलेखा ताई मालपाणी यांनीही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
दत्त जयंतीच्या पावन पर्वावर झालेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, सामाजिक जाणिवेचा हा आदर्श कार्यक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
यावेळी परिसरातील नागरिक, संगीता समाधानी , कविता लड्डा, राजेश बन्सल , तसेच नामदेव चौधरी, जितेंद्र पानसर, व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.