हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान जळगाव महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Jalgaon
  • हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान जळगाव महाराष्ट्र

हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान जळगाव महाराष्ट्र सामाजिक कार्य व गरजू लोकांना आपल्या परीने मदत करणे हाच आमचा हेतु.
तुम्ही हाक द्या आम्ही साथ देऊ.

📌 जवाबदारी : दोन समजूतदार व्यक्ती मिळून लोकशाही देशाला मूर्ख बनवत आहेत का?आत्मनिर्भरतेची भाषणे मोठी, पण आयातीच्या आकडेवा...
06/07/2026

📌 जवाबदारी : दोन समजूतदार व्यक्ती मिळून लोकशाही देशाला मूर्ख बनवत आहेत का?

आत्मनिर्भरतेची भाषणे मोठी, पण आयातीच्या आकडेवारीवर मौन का?

लोकशाहीची खरी ताकद टाळ्यांमध्ये नसते, तर प्रश्न विचारण्याच्या अधिकारात असते. आणि त्या प्रश्नांना पारदर्शकपणे उत्तर देणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते.

"धोरणे जितकी मोठी, तितकी त्यांची जबाबदारीही मोठी असली पाहिजे."

असा दावा केला जातो की भारतातील औद्योगिक एथेनॉलपैकी मोठा हिस्सा अमेरिकेतून आयात केला जातो आणि भारत हा अमेरिकन एथेनॉलसाठी प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे.

लोकशाहीत कोणत्याही सरकारला किंवा नेत्याला प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. उत्तरदायित्व आणि पारदर्शकता हीच लोकशाहीची खरी ओळख आहे.

बंगालमध्ये राजकीय घमासान सुरु असताना ४००० ईव्हीएम जळून खाक झाली आहेत. राज्यात गेल्याच महिन्यात विधानसभा निवडणूक झाली. त्...
12/06/2026

बंगालमध्ये राजकीय घमासान सुरु असताना ४००० ईव्हीएम जळून खाक झाली आहेत. राज्यात गेल्याच महिन्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यात भाजपनं बाजी मारली. यानंतर आता सरकारी इमारतीला लागलेल्या आगीत ईव्हीएम नष्ट झाली आहेत.

असं कसं झालं असेल बर.......??

माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा ! #...
01/05/2026

माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा !

#महाराष्ट्र_दिन #जयमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य

हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान जळगाव महाराष्ट्र

शाळेतील वर्गात “फ्रंट बेंचर” आणि “बॅक बेंचर” असा भेद आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. पण आता हा भेद पूर्णपणे संपवण्याचा एक भ...
28/04/2026

शाळेतील वर्गात “फ्रंट बेंचर” आणि “बॅक बेंचर” असा भेद आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. पण आता हा भेद पूर्णपणे संपवण्याचा एक भन्नाट प्रयोग देशात चर्चेत आला आहे. Kerala राज्यात सुरू असलेला “U-आकारातील वर्गरचना” (U-shaped classroom model) आता इतर राज्यांनाही आकर्षित करत आहे आणि विशेषतः Karnataka मध्ये हा मॉडेल लागू करण्याची मागणी होत आहे.

या मॉडेलमध्ये विद्यार्थ्यांना सरळ रांगांमध्ये बसवण्याऐवजी U आकारात बसवले जाते. म्हणजेच शिक्षक वर्गाच्या मध्यभागी उभे राहतात आणि सर्व विद्यार्थी त्यांच्या समोर अर्धवर्तुळात बसलेले असतात. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक स्पष्ट दिसतात आणि शिक्षकांनाही प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष ठेवणे सोपे जाते.

या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे “बॅक बेंचर” ही संकल्पना पूर्णपणे नाहीशी होते. पारंपरिक पद्धतीत मागे बसणारे विद्यार्थी अनेकदा दुर्लक्षित राहतात, पण U-आकारात प्रत्येक विद्यार्थ्याला समान महत्त्व मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि वर्गात अधिक सहभाग दिसून येतो.

याशिवाय, या मॉडेलमुळे वर्गात संवाद वाढतो. विद्यार्थी शिक्षकांशी थेट संवाद साधू शकतात, प्रश्न विचारण्यास घाबरत नाहीत आणि चर्चा अधिक सक्रिय होते. शिक्षण केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न राहता ते संवादात्मक (interactive) बनते, जे आजच्या आधुनिक शिक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहे.

तथापि, काही अडचणीही समोर येतात. मोठ्या वर्गांमध्ये ही रचना अंमलात आणणे कठीण ठरू शकते. तसेच बाजूला बसलेल्या विद्यार्थ्यांना थोडे वळून बसावे लागते, ज्यामुळे काही वेळा अस्वस्थता जाणवू शकते. पण तरीही, या छोट्या अडचणींपेक्षा या मॉडेलचे फायदे अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

एकंदरीत, U-आकारातील वर्गरचना ही फक्त बसण्याची पद्धत नसून शिक्षणात समानता, सहभाग आणि आत्मविश्वास वाढवण्याचा एक मोठा बदल आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला, तर भारतातील शिक्षण व्यवस्थेत एक नवा अध्याय सुरू होऊ शकतो.

According to reports, China has taken strict steps against profit driven schooling by banning businessmen from opening p...
20/04/2026

According to reports, China has taken strict steps against profit driven schooling by banning businessmen from opening private schools and making money from education for children aged 6 to 15. Authorities have emphasized that education should not be treated purely as a business.

The move is aimed at reducing financial pressure on families, improving fairness, and making access to learning more balanced. The policy has attracted global attention as countries continue debating the role of private profit in education.

आमचे पूर्वज स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा 🚩🚩वेडात मराठ...
24/02/2026

आमचे पूर्वज स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा 🚩

🚩वेडात मराठे वीर दौडले सात🚩

इतर राज्ये मंदिरे आणि पुतळे बांधण्यात व्यस्त असतानाकेरळ हे पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य बनले आहे.
08/02/2026

इतर राज्ये मंदिरे आणि पुतळे बांधण्यात व्यस्त असताना

केरळ हे पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य बनले आहे.

आज दि.२८/११/२०२५ रोजी स्त्री शिक्षणाचे जनक, वंचितांचे कैवारी, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्...
28/11/2025

आज दि.२८/११/२०२५ रोजी स्त्री शिक्षणाचे जनक, वंचितांचे कैवारी, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले जळगाव शहर मधील महात्मा फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, सामाजिक कार्यकर्ते विजय सुरवाडे, मुकुंदभाऊ सपकाळे, माजी नगरसेवक राजूभाऊ मोरे,संदीप पाटील कार्याध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान , तुषार मराठे, प्रा.यशवंत मोरे सर,आकाश भालेराव, वसंततात्या सपकाळे, बळवंत भालेराव,जितेश भदाणे,निवेदिता ताठे, रोहित शिरसाट तसेच जळगाव शहरातील सर्व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते

01/08/2025

Address

Jalgaon
Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान जळगाव महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category