वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव

  • Home
  • India
  • Jalgaon
  • वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव A public charitable trust established on 1st July 1877 and District Public Library

15/07/2026

व.वा. ज़िल्हा वाचनालय व मूलजी जेठा माहविद्यालय य़ांचा संयुक्त विद्यामाने आषाढस्य प्रथम दिवसे कार्यक्रमाचे अविस्मरणीय क्षण

14/07/2026
17/05/2026
व. वा. बाल वाचनालय आयोजित उन्हाळी शिबिर २०२६व. वा. बाल वाचनालय आयोजित उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम...
17/05/2026

व. वा. बाल वाचनालय आयोजित उन्हाळी शिबिर २०२६
व. वा. बाल वाचनालय आयोजित उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

11/10/2025

" अभिनव दिवाळी अंक योजना "

नमस्कार, वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालयातफेॅ " अभिनव दिवाळी अंक योजना २०२५-२६ "दिनांक १८ आक्टोबर २०२५ पासून सुरु करण्यात येत आहे.या योजने अंतर्गत नव्याने दाखल होणारे १०० च्या वर विविध विषयांवरील दिवाळी विशेषांक सभासद वाचकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. चार महिन्यासाठी नियमित सभासदांना फक्त रु. ५००/- वर्गणी भरुन दिवाळी अंक योजनेचे सभासद होता येईल.सभासदांना पाच दिवस अंक ठेवता येईल त्यानंतर अंक बदलवून मिळेल. तरी या अभिनव दिवाळी अंक योजनेचा जास्तीत जास्त सभासदांनी लाभ घ्यावा व दिवाळीच्या फराळा बरोबरच आपला साहित्य वाचनाचा आनंद व्दिगुणीत करावा. असे आवाहन वाचनालयाने केले आहे.

🪔🪔 शुभ दीपावली.🙏🙏

✨ प्रभाकर कला संगीत अकादमी सादर करत आहे –"अलख : जो रूप में नहीं, भाव में है"एक अद्वितीय नृत्य-नाट्य सादरीकरण — जे डोळ्या...
08/08/2025

✨ प्रभाकर कला संगीत अकादमी सादर करत आहे –
"अलख : जो रूप में नहीं, भाव में है"
एक अद्वितीय नृत्य-नाट्य सादरीकरण — जे डोळ्यांनी नाही, मनाने अनुभवायचं असतं.
📅 दिनांक: १० ऑगस्ट २०२५
🕡 वेळ: सायंकाळी ६:३० वाजता
📍 स्थळ: भैयासाहेब गंधे, सभागृह,
ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगाव
🌟 सहकार्य: वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय
🙏 नृत्य, संगीत आणि भावनांच्या या सौंदर्यपूर्ण सादरीकरणाला साक्षीदार व्हा.
📸
#अलख #सांस्कृतिककार्यक्रम #प्रभाकरकला #नृत्यनाट्य

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रमबालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालज...
08/08/2025

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम
बालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांचा संयुक्त उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्वांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा आदर्श बालकांपुढे असावा व त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या वर्षी या स्पर्धेकरिता छत्रपती शिवाजी महाराज - श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक’ हा विषय घेण्यात आला असल्याचे, बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी कळवले आहे.
बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा व व.वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालयाच्या स्टेशनरोडवरील सभागृहात प्राथमिक फेरी होणार आहे. या उपक्रमात एकल गटात वय वर्षे ५ ते १० व वय वर्षे ११ ते १५ या वयोगटात तसेच समूह गट अशी विभागणी करण्यात आली आहे. एकल गट १ वय वर्षे ५ ते १० यांना छत्रपती शिवाजी महाराज तर एकल गट २ वय वर्षे ११ ते १५ व समूह गट यांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव ते राज्याभिषेक हा विषय देण्यात आला आहे. एकल गटात स्पर्धकांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहोत किंवा त्याकाळातील कोणत्याही व्यक्तिरेखेच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज अशा स्वरुपाने तर एकल गट २ व समूह गटातील स्पर्धकांनी श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक या कालखंडातील शौर्य घटना, विविध प्रसंग, पराक्रम आदी घटनांचे संदर्भ घेत नृत्य, नाट्य, संगीत आदींचा समन्वय साधत प्रभावी सादरीकरण करावयाचे आहे. एकल गटाकरिता जास्तीत जास्त ५ मिनिटे तर समूहाकरिता जास्तीत जास्त १० मिनिटे सादरीकरणाची मर्यादा आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता कोणतीही प्रवेश फी नसून, प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
प्राथमिक फेरीतील प्रत्येक गटातील प्रथम आणि द्वितीय आलेल्या स्पर्धकांची निवड अंतिम फेरीकरिता केली जाणार असून, ही अंतिम फेरी दि. २३ व २४ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटूंगा, माहीम, मुंबई ४०००१६ येथे आयोजित केली जाणार आहे. अंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या सर्व बालकलावंतांचा प्रवास खर्च आयोजकांकडून देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त बालकलावंतांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा तसेच नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ७६२०९३३२९४, ८८३०२५६०६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन व.वा.वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप जोशी, उपाध्यक्ष अॅड. सुशिल अत्रे, उपाध्यक्ष अॅड. प्रताप निकम, कार्याध्यक्ष सी.ए.अनिलकुमार शहा, बालरंगभूमी परिषद जळगावचे उपाध्यक्ष अमोल ठाकूर - हनुमान सुरवसे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, बालरंगभूमी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, सुदर्शन पाटील, पंकज बारी, दिपक महाजन, हर्षल पवार, मोहित पाटील, नेहा पवार, दर्शन गुजराथी, सुरेखा मराठे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

व. वा. जळगाव प्रस्तुत, डॉ. आनंद नाडकर्णी च्या शब्दांच्या प्रेमात या कार्यक्रमा चे रेकॉर्डिंग, वाचनालयाच्या Youtube Chann...
12/09/2024

व. वा. जळगाव प्रस्तुत, डॉ. आनंद नाडकर्णी च्या शब्दांच्या प्रेमात या कार्यक्रमा चे रेकॉर्डिंग, वाचनालयाच्या Youtube Channel वर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

भाग १: https://www.youtube.com/watch?v=DxuBz5t5HM0

भाग २: https://www.youtube.com/watch?v=KoJvkIcGrg0

व. वा. जळगाव प्रस्तुत डॉ. आनंद नाडकर्णी शब्दांच्या प्रेमात : 2

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव आयोजित आणिआजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरीउत्तर महाराष्ट्र विद...
31/07/2024

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव आयोजित
आणि
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग,
कवयित्री बहिणाबाई चौधरी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव प्रायोजित

*वाचनसंस्कृती संवर्धन उपक्रम*

*शालेय विद्यार्थी व महिलांसाठी साहित्य अभिवाचन स्पर्धा*

दि. ३ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी
सकाळी ९- ०० वाजता
स्थळ - व. वा. वाचनालयाचे रामनारायण अग्रवाल सभागृह

*स्पर्धेविषयी नियम*
ही स्पर्धा खालील गटासाठी आहे.

*शालेय गट* – ५ वी ते १० वी विद्यार्थी समूह अभिवाचन स्पर्धा
(एका गटात २ ते ५ स्पर्धक, एका शाळेतुन एकाहुन अधिक संघ सहभागी होऊ शकतात )
विषय – स्वलिखित किवा ललित लेखन, कथा, चरित्र
वेळ – ८ ते १० मिनिट
------------------------------------
*खुला गट* – महिला (वैयक्तिक ) – १८ वर्ष पुढील
विषय – स्वलिखित किवा ललित लेखन, कथा, चरित्र, फक्त स्री लेखिकेने लिहिलेले.
वेळ – ३ ते ५ मिनिट

*स्पर्धेत प्रवेश विनामुल्य आहे*

****पारितोषिक****

विद्यार्थ्यांसाठी
प्रथम रु. २०००/- व प्रमाणपत्र
दितीय रु. १५००/- व प्रमाणपत्र
तृतीय रु. १०००/- व प्रमाणपत्र
3 उत्तेजनार्थ रु. ५००/- व प्रमाणपत्र

महिलांसाठी
प्रथम रु. १५००/- व प्रमाणपत्र
दितीय रु. १०००/- व प्रमाणपत्र
तृतीय रु. ५००/- व प्रमाणपत्र
3 उत्तेजनार्थ रु. ५००/- व प्रमाणपत्र

सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. तरी जास्तीत जास्त प्रवेशिका पाठवून सहकार्य करावे.

रेजिस्ट्रेशन फॉर्म
https://forms.gle/weLfCC2dSHXfpDR17

कृपया सहभागी होण्यासाठी *1 ऑगस्ट* पर्यंत खालील फॉर्म भरून नोंदणी करावी किंवा श्री. अनिल अत्रे दूरध्वनी क्र. ९४०४०५३५७१ यांच्याकडे संपर्क करून कळवावे.

*- व वा वाचनालय महिला आणि बाल समिती*

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव आयोजित आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महार...

Address

Navi Peth, Pratap Nagar
Jalgaon
425001

Opening Hours

Tuesday 8am - 11am
4pm - 7pm
Wednesday 8am - 11am
4pm - 7pm
Thursday 8am - 11am
4pm - 7pm
Friday 8am - 11am
4pm - 7pm
Saturday 8am - 11am
4pm - 7pm
Sunday 8am - 11am
4pm - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category