Chandrakant N Patil

Chandrakant N Patil MLA Chandrakant Nimbaji Patil- Member Of Legislative Assembly 20 Muktainagar - Bodwad Constituency

‘आज  #हरसोडा ता.मलकापूर येथे श्री.धुपेश्वर महादेव मंदिर पुजारी ह.भ.प.श्री.पुंजाजी वामनराव रायपुरे यांची सुकन्या चि.सौ.का...
04/08/2026

‘आज #हरसोडा ता.मलकापूर येथे श्री.धुपेश्वर महादेव मंदिर पुजारी ह.भ.प.श्री.पुंजाजी वामनराव रायपुरे यांची सुकन्या चि.सौ.का.अन्नपूर्णा यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी माझा मुलगा हर्षराज पाटील उपस्थित राहून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

'त्यांचे वैवाहिक जीवन सुख,समाधान आणि समृद्धीने नांदो,हीच मंगलकामना! 💫💐

#विवाह

'जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर प्रयत्न…!मतदारसंघातील  #बोदवड येथील एस.टी.बस स्थानकाला भेट देऊन नागरिकांनी मांडलेल्...
04/08/2026

'जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर प्रयत्न…!
मतदारसंघातील #बोदवड येथील एस.टी.बस स्थानकाला भेट देऊन नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

'यावेळी संबंधित एस.टी.डेपो व्यवस्थापक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या बससेवेबाबत प्राप्त झालेल्या विविध तक्रारींची माहिती दिली. तसेच एसटी बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, तसेच स्थानकातील आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

यावेळी विविध गावांतील व विविध मार्गांवरील एस.टी.बस सेवा सुरू करण्याबाबत प्रवाशांनी निवेदन सादर केले. प्रवाशांच्या या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी बोदवडचे नगराध्यक्ष, नगरसेवक, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ, विद्यार्थी वर्ग तसेच प्रवासी उपस्थित होते.

#मुक्ताईनगर_मतदारसंघ

'आज  #मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्र.६ व ७ मधील श्रीराम नगर (भिल्लवाडी) येथील भव्य मुख्य प्रवेशद्वाराच्या पायाभरणी व भूमि...
01/08/2026

'आज #मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्र.६ व ७ मधील श्रीराम नगर (भिल्लवाडी) येथील भव्य मुख्य प्रवेशद्वाराच्या पायाभरणी व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून शुभारंभ करण्याचा मान लाभला.

या प्रवेशद्वाराच्या उभारणीमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच प्रभागाच्या विकासाला नवी ओळख मिळणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विकासकामांचा हा प्रवास सातत्याने सुरू असून, प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे.

याप्रसंगी प्रभाग क्रमांक ६ व ७ चे नगरसेवक, नागरिक बांधव, महिला भगिनी, युवा मित्रपरिवार तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#शिवसेना #मुक्ताईनगर_मतदारसंघ

'महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, पत्रकार आणि थोर समाजसुधारक  #लोकमान्य  #बाळ_गंगाधर_टिळक यांना स्मृतिदिनी त्यांच्या स्मृ...
01/08/2026

'महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, पत्रकार आणि थोर समाजसुधारक #लोकमान्य #बाळ_गंगाधर_टिळक यांना स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!

#लोकमान्य_टिळक

'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्याद्वारे जनजागृती करणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक आणि थोर लो...
01/08/2026

'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्याद्वारे जनजागृती करणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक आणि थोर लोकनाट्यकार #लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन..!

📍छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर | मुक्ताईनगर'राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसान...
31/07/2026

📍छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर | मुक्ताईनगर

'राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' आज #मुक्ताईनगर येथे उत्साहात पार पडले.

'या शिबिरामध्ये नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले, प्रमाणपत्रे, प्रलंबित प्रकरणे तसेच इतर महसुली कामांचे एकाच ठिकाणी जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने निराकरण करण्यात आले.

विविध शासकीय विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि तात्काळ लाभ मिळाला. यावेळी पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे, विविध प्रमाणपत्रे व दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरचे वाटप करून शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.

प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या सेवा वेळेत, पारदर्शक आणि प्रभावीपणे पोहोचाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारे हे शिबिर ठरले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.रोहन घुगे, आमदार श्री.नंदुभाऊ महाजन, उपविभागीय अधिकारी श्री.जितेंद्र पाटील, मुक्ताईनगर तहसीलदार श्री.वखारे, पोलीस उपाधीक्षक श्री.नंदराज पाटील, पोलीस निरीक्षक श्री.आशिष अडसूळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी,शिवसेना-युवासेना, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकाभिमुख प्रशासन...!सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर!

#छत्रपती_शिवाजी_महाराज_महसूल_समाधान_शिबिर #मुक्ताईनगर #महायुती #जनकल्याण #शिवसेना Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Gulabrao Patil गुलाबराव पाटील Shivsena - शिवसेना

🌼 गुरुपौर्णिमा निमित्त ओंकारेश्वर मंदिर,तामसवाडी(रावेर) येथे आयोजित गुरु दीक्षा, भव्य वृक्ष लागवड अभियान व संकल्प कार्यक...
30/07/2026

🌼 गुरुपौर्णिमा निमित्त ओंकारेश्वर मंदिर,तामसवाडी(रावेर) येथे आयोजित गुरु दीक्षा, भव्य वृक्ष लागवड अभियान व संकल्प कार्यक्रमास उपस्थिती 🌿

'गुरुपौर्णिमेच्या पावन शुभमुहूर्तावर ओंकारेश्वर मंदिर,तामसवाडी (ता. रावेर) येथे आयोजित गुरु दीक्षा, भव्य वृक्ष लागवड अभियान व संकल्प कार्यक्रमास माझा मुलगा चि.हर्षराज चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षदिंडी काढण्यात आली तसेच उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण करण्यात आले. "एक वृक्ष, एक संकल्प" या भावनेतून निसर्ग संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.

या पवित्र प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ, भाविक-भक्त यांच्यासमवेत वृक्ष संवर्धनाचा संदेश देत कार्यक्रम अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

गुरूंचे आशीर्वाद लाभोत आणि पर्यावरण संवर्धनाचा हा संकल्प अधिकाधिक बळकट होवो, हीच प्रार्थना. 🌿🙏

'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥'अज्ञानाचा अंधकार दूर करून ज...
29/07/2026

'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥

'अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या,आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या आणि प्रत्येक पावलावर योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

#गुरुपौर्णिमा

28/07/2026

'मुक्ताईनगर येथे राजमाता जिजाऊ ५ बसेस बस आगार डेपो येथे दाखल!

#मुक्ताईनगर

📍तांदलवाडी | ता.रावेर 'माझे जिवलग मित्र,विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार मा.नंदकिशोरभाऊ महाजन यांचा नागरी सत्कार सोहळा म...
27/07/2026

📍तांदलवाडी | ता.रावेर

'माझे जिवलग मित्र,विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार मा.नंदकिशोरभाऊ महाजन यांचा नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी नंदूभाऊंच्या पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.

जनतेच्या प्रश्नांना न्याय देत आपल्या कार्यातून समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण करावा, हीच मनःपूर्वक सदिच्छा.!

याप्रसंगी पालकमंत्री मा.श्री.गुलाबरावजी पाटील, जलसंपदा मंत्री मा.श्री.गिरीशभाऊ महाजन, सर्व आमदार महोदय, महापौर महोदय,नागराध्यक्ष,नगरसेवक महोदय तसेच शिवसेना-भाजप महायुती पदाधिकारी व पंचक्रोशीतील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#महायुती #मुक्ताईनगर_मतदारसंघ Nandkishor Mahajan
Gulabrao Ragunath Patil
Girish Mahajan

Address

Near ICICI Bank, Bhusawal Road
Jalgaon
425306

Telephone

+919970811555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrakant N Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chandrakant N Patil:

Shortcuts

Share