डिजिटल शेतकरी

डिजिटल शेतकरी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from डिजिटल शेतकरी, Political organisation, jalna, Jalna.
(1)

​🌾 डिजिटल शेतकरी 📱
महाराष्ट्रातील शेतकरी बंधुंसाठी हक्काचे पेज!
✅ शेतीविषयक नवीन जी.आर. व योजना
✅ शेती उपयोगी उपयुक्त बातम्या
✅ यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव
👇 पेजला नक्की फॉलो करा!

29/08/2026

🌾 ई-पीक पाहणीसाठी सहाय्यक शेतकऱ्यांकडून प्रति हेक्टर २०० रू मागत आहेत. आपल्याकडे किती पैसे मागत आहेत गाव व पैसे कमेंट करून नक्की सांगा

🌾 शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! जर तुमच्या Farmer ID (फार्मर आयडी) मध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर किंवा इतर तपशी...
29/08/2026

🌾 शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! जर तुमच्या Farmer ID (फार्मर आयडी) मध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर किंवा इतर तपशीलांमध्ये काही चूक झाली असेल, तर आता घाबरण्याचे कारण नाही. शासनाकडून Farmer ID दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
चुकीच्या माहितीमुळे योजनांचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते, त्यामुळे ही दुरुस्ती वेळेत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कशी कराल ऑनलाईन दुरुस्ती?

* अधिकृत संकेतस्थळ: शासनाच्या अधिकृत शेतकरी पोर्टलवर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर भेट द्या.
* लॉगिन करा: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून पोर्टलवर लॉगिन करा.
* तपशील तपासा: तुमच्या Farmer ID वरील माहितीची पडताळणी करा.
* दुरुस्ती अर्ज: ज्या माहितीत चूक आहे (उदा. नाव, आधार क्रमांक, किंवा सातबारा तपशील), ती माहिती योग्य कागदपत्रांसह अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
👉 आजच आपला Farmer ID तपासा आणि लवकरात लवकर ऑनलाईन दुरुस्ती करून घ्या!
माहिती गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त Like आणि Share नक्की करा.
#शेतकरी #योजना #कर्जमाफी #कर्जमुक्ती
डिजिटल शेतकरी

शेतकरी नेते Ajit Nawale  यांचे चुलते काल शेतात काम करत असताना 🐍सर्पदंशाने गेले. भावपूर्ण श्रद्धांजली
29/08/2026

शेतकरी नेते Ajit Nawale यांचे चुलते काल शेतात काम करत असताना 🐍सर्पदंशाने गेले. भावपूर्ण श्रद्धांजली

29/08/2026
मराठवाड्यातील अत्यल्प पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी 'पंतप्रधान पिक विमा' योजनेसह 'विशेष आर्थिक पॅकेज' द्वारे ...
28/08/2026

मराठवाड्यातील अत्यल्प पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी 'पंतप्रधान पिक विमा' योजनेसह 'विशेष आर्थिक पॅकेज' द्वारे मदत देण्याबाबत.

महोदय,

मराठवाड्यात जून व जुलै महिन्यात अत्यल्प व खंडित पाऊस झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह सर्व खरीप पिके गंभीर संकटात सापडली आहेत. जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. विहिरी व बोअरवेल आटत असल्याने पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा यांचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन दि. ३१ जुलै २०२६ रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याची मुदत किमान १५ दिवसांनी वाढविण्याची मागणी मी पत्राद्वारे आपणाकडे केली होती. आपल्या सकारात्मक निर्णयामुळे सदर मुदतवाढ मिळाली, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद...

मात्र, सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून केवळ मुदतवाढ पुरेशी नाही. त्यामुळे पुढीलप्रमाणे तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे असे वाटते, शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेऊन आपण तात्काळ कार्यवाही कराल याची मला खात्री आहे :

- नुकसानग्रस्त सर्व पिकांचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करावेत.

- पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई तातडीने मिळवून द्यावी.

- पीक विम्याच्या कक्षेबाहेर राहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करावे.

- सोयाबीनसह सर्व खरीप पिकांसाठी हेक्टरी विशेष नुकसानभरपाई द्यावी.

- शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करावे.

- पुढील हंगामासाठी बियाणे, खते व कृषी निविष्ठांसाठी विशेष मदत द्यावी.

- जनावरांसाठी चारा डेपो/चारा छावण्या व पाण्याची व्यवस्था करावी.

- गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा.

- परिस्थितीचा गावनिहाय आढावा घेऊन आवश्यक भागात दुष्काळसदृश परिस्थितीबाबत तातडीने निर्णय घ्यावा.

मराठवाड्यातील शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत असून शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन पीक विमा, विशेष आर्थिक पॅकेज, कर्ज सवलत तसेच पाणी व चारा उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, ही नम्र विनंती. सौ: बबनराव लोणीकर आमदार परतुर महाराष्ट्र
#जालना #परतुर #अंबड #घनसावंगी #परभणी #पाथरी #बीड #लातूर #धाराशिव #हिंगोली
Lokmat Prabhudeva GR Dattatray Bharane Devendra Fadnavis डिजिटल शेतकरी Raju Shetti

पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी! मराठवाड्यात मागील दीड महिन्याप...
28/08/2026

पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी!

मराठवाड्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्यामुळे अनेक भागांतील सोयाबीन पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पत्र देऊन संबंधित महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे व नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.

तसेच नुकसानग्रस्त व पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत तात्काळ आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सौ: ओमराजे निंबाळकर लोकसभा सदस्य, धाराशिव
#सोयाबीन #शेतकरी #पीकनुकसान #पीकनुकसानभरपाई #आर्थिकमदत #मराठवाडा #शेतकरीहित #कृषी #धाराशिव डिजिटल शेतकरी

28/08/2026

"ज्यांनी कधी कर्जच घेतले नाही... त्यांचा गुन्हा काय?"
​🟢थकबाकीदार: २ लाख माफ!
🟡 नियमित कर्जदार: ५० हजार माफ!
🔴 कर्ज न काढणारे: ? 🍌

28/08/2026

🌾 ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी धक्कादायक
साखरेचे भाव उतरले 4800 रू. क्विं. ने विक्री सुरू
काय कारण असेल कमेंट मध्ये नक्की सांगा

27/08/2026

🚨 मोठी बातमी: जून - जुलै 2026 ⛈️ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 23.33 कोटींचा निधी मंजूर! 17245 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार

27/08/2026

🌾नियमित कर्ज भरणारे मूर्ख झाले असे आम्हाला थकीत फुकटे म्हणतात. 😡
हे असे बोलणे योग्य आहे का

Address

Jalna
Jalna

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when डिजिटल शेतकरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to डिजिटल शेतकरी:

Shortcuts

Share