29/10/2025
*काँग्रेस खासदार कल्याण काळेंकडून सकल हिंदू समाजाच्या भावनांचा अवमान!*
_म्हणे, “२०२३ मधील गाय कापल्याचा व्हिडिओ आता बाहेर काढला!”_
यावर्षी गणपती उत्सव दरम्यान जालन्यात अस्लम कुरेशी या समाजकंटक जिहादी मानसिकतेच्या व्यक्तीने गोमातेचे अतिशय नृशंस प्रकारे हत्या केली, हत्या करताना गायीला आणि हिंदूंना शिवीगाळ केली आणि त्याचा व्हिडिओ करून समाज माध्यमात टाकला होता. ही उघडउघड जाणीवपूर्वक हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे कृत्य होते.
जालन्यातील सकल हिंदू समाज व दोनशेहून अधिक गणपती मंडळांनी जोपर्यंत जिहादी अस्लम कुरेशी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही गणपती विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत अस्लम कुरेशीला अटक करून गुन्हे नोंदवले.
पोलिस चौकशीत सदर व्हिडिओ आणि गोहत्या निष्पन्न झाल्यावर प्रकरण सध्या न्यायालयीन आहे.
तरीही मुस्लिम लांगुलचालनसाठी काँग्रेस खासदार कल्याण काळे म्हणतात की हा व्हिडिओ २०२३ मधील आहे. आणि गणपती मंडळांनी जातीय तेढ निर्माण होण्यासाठी अशी भूमिका घेतली. ही सकल हिंदू समाज आणि गणपती मंडळांसाठी अतिशय संतापजनक बाब आहे.
कल्याण काळेला भारतीय न्यायव्यवस्था आणि कायदे मान्य नाही का? की मुस्लिम लांगुलचालन करण्यासाठी काही बरळणार? सकल हिंदू समाज हे कदापि सहन करणार नाही.
खासदार कल्याण काळेंच्या वक्तव्याचा–
*जाहीर निषेध! जाहीर निषेध!!* 🏴
– सकल हिंदू समाज, जालना