26/11/2022
जि प प्रा शा सारवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची संविधान यात्रा जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी "जब तक सुरज चांद रहेगा संविधान तेरा नाम रहेगा", "गीता बायबल या हो कुराण सबके आगे है संविधान" .. अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दराने सोडला होता.
शाळेच्या मैदानात गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सदस्य विद्यार्थी शिक्षक पालक यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि भारतीय संविधानाचे प्रास्ताविक याचे सामूहिक वाचन घेण्यात आले. यावेळी शाळेतील ज्येष्ठ प्राथमिक पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर गिराम, शिक्षक चक्रधर बागल यांनी संविधानाबद्दल उपस्थित गावकरी विद्यार्थी पालक यांना माहिती सांगितली.
संविधान दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव काळात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा यामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, या स्पर्धेतील विजयी स्पर्धक आणि समस्त विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य बक्षिसाचे वाटप गावातील भीम आर्मी ग्रुप, लहुजी ग्रुप, दया सागर ग्रुप यांचे वतीने वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक तात्या काळे, भीमराव आबा काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्यकला दत्तात्रय, सरपंच जनार्दन काळे, उपसरपंच कैलास काळे, काळे, ग्रामपंचायत सदस्य विलास नरवडे, मुख्याध्यापिका श्रीमती विश्वलता गायकवाड, ग्रामसेविका साबळे मॅडम, जेष्ठ प्राथमिक पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर गिराम, पदवीधर शिक्षक अनंत कुमार शीलवंत, चक्रधर बागल, दीपा उंचेकर, जनाबाई भुंबे, अंगणवाडी कार्यकर्ते बेबीताई निंबाळकर, विविध ग्रुपचे सदस्य विकास मस्के, ताराचंद सरसंडे, शितल सोनवणे,दिलीप मंडलिक, गौतम खरात,विक्रम नरवडे, समाधान खरात, लखन काते, विजय सरसंडे,भारत खरात,संजीव सरसंडे, भीमा खरात, स्वप्नील नरवडे,आकाश मस्के, विष्णू नरवडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चक्रधर बागल यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत कुमार शीलवंत यांनी मानले.