13/03/2023
नमस्कार,
असं म्हणतात की मुलं ही देवाघरची फुलं असतात.
पण ह्या फुलांसारख्या मुलांची नीट काळजी घेतली नाही तर कुपोषण आणि त्यामुळे उद्भवणारे गंभीर आजार ह्यामुळे ही मुले व्याधीग्रस्त होऊन आपल्या जीवनातील आनंद गमावून बसतात आणि अनेक वेळा तर आपला जीव गमावतात.
ह्याचाच विचार करून साई विश्व फाऊंडेशनचे संस्थापक रो. मकरंद पुंडलिक ह्यांनी *कुपोषणमुक्त भारत* हे महत्वाकांक्षी मिशन हाती घेतले आहे.
त्यांच्या साई विश्व फाऊंडेशन ह्या संस्थेतर्फे तसेच वैयक्तिक पातळीवर आणि रोटरी सारख्या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने गेली दहा वर्षे हे मिशन देशातील तेरा राज्यांमध्ये यशस्वीपणे राबवले जात आहे. आजमितीला १०००० पेक्षा अधिक कुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करून त्यांना निरोगी करण्यात आले आहे.
आम्हाला मिळालेले यश हे जरी उत्साहवर्धक असले तरी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.
ह्याचाच विचार करून आम्ही कल्याण येथे एका निधी संकलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सुप्रसिद्ध मंगेशकर घराण्याचा वारसा यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका डॉ राधा मंगेशकरांचा *Evergreen Gems From Bollywood* हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक ७ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
ह्या कार्यक्रमाचे स्वागत मूल्य ₹५०० आणि ₹३०० इतके माफक ठेवण्यात आले आहे.
आपल्या सारख्या संवेदनशील नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण आमच्या ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या समोजपयोगी कार्यास हातभार लावावा.
साई विश्व फाऊंडेशनला दिलेल्या देणग्यांना आयकराच्या 80G कलमांतर्गत सूट मिळते.
आमच्या ह्या समोजपयोगी कार्यास देणगी देण्यासाठी सोबत दिलेला QR कोड कृपया स्कॅन करा. आपण खालील UPI द्वारे सुध्दा देणगी पाठवू शकता.
fcbizat0q2y@freecharge
देणगी पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट शेअर करावा ही विनंती.
ता.क. : आत्तापर्यंत बदलापूर, मँगलोर, दिल्ली, मुलुंड, खारघर, डोंबिवली येथील आमच्या मित्र मैत्रिणींनी ह्या कार्यक्रमाला देणगी दिली आहे त्या सर्वांना धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद,
रो. मकरंद पुंडलिक
संस्थापक अध्यक्ष
साई विश्व फाऊंडेशन
कल्याण
९९६७९१७६९०
*Mission To Make Malnutrition History In India*