16/08/2026
वंचित बहुजन आघाडी कल्याण-डोंबिवली महानगर जिल्हाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कमिटीचे सदस्य सारंग थोरात उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष विशाल विष्णू पावशे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सारंग थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत रमेश (पप्पू भाई) जाधव, अमर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीत अधिकृत जाहीर प्रवेश केला.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व ठराव:
* कल्याण-डोंबिवली महानगर जिल्हा कार्यकारिणीची पुनर्बांधणी करून संघटना अधिक मजबूत करणे.
* नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यावर सविस्तर चर्चा व नियोजन.
प्रमुख उपस्थित पदाधिकारी व मान्यवर:
* कमलेश उबाळे (महानगर अध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, कल्याण-डोंबिवली), रोहित डोळस (महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख),अमोल पंडित (कल्याण-डोंबिवली जिल्हा संघटक), नितीन गायकवाड (कल्याण पश्चिम शहराध्यक्ष),रतन जाधव (कल्याण ग्रामीण अध्यक्ष)
तसेच पक्षाचे अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.