Mazi Kamptee Swachha Kamptee

Mazi Kamptee Swachha Kamptee Kamptee is a City in Kamptee Taluka in Nagpur District of Maharashtra State, India. It belongs to Vidarbh region . It belongs to Nagpur Division .

04/04/2017

Hiee everybody if any one near not having toilet at his home...plzzzz suggest him for visiting municipal council kamptee...we are helping them to build a toilet...

19/01/2015

हम एक सभ्य समाज के अंग और एक समृद्ध संस्कृति के उत्तराधिकारी हैं | स्वच्छता सभ्य और सुसंस्कृत होने की प्रथम एवं अनिवार्य शर्त है | भौतिक स्वच्छता वैचारिक , धार्मिक और आध्यात्मिक उन्नयन की आधार भूमि है | वैसे तो पशु पक्षी भी अपनी भौतिक स्वच्छता के प्रति सजग रहते हैं परन्तु मनुष्य तो इस सृष्टि का सर्वश्रेष्ठ प्राणी है अतः उसका उत्तरदायित्व मात्र स्वयं एवं घर परिवार तक सिमित नहीं रह सकता , उसको अपनी संवेदनशीलता का दायरा इससे आगे बढ़ कर ग्राम , मोहल्ला , देश और अनंत प्रकृति तक विस्तृत करना होगा | मनुष्य ईश्वर की ओर से इस प्रकृति का संरक्षक है |दुर्भाग्य से अपने देश में मनुष्य अपनी इस महती भूमिका को विस्मृत कर बैठा है | क्षुद्र स्वार्थों , आलस्य और प्रमाद ने प्रकृति एवं विशेषकर स्वच्छता के प्रति उसकी संवेदनाओं को अत्यंत संकुचित कर दिया है |यदि हम कुछ करना चाहें तो करने के लिए अनंत संभावनाएं हैं |

LITTERING RAILWAY PREMISES IS NOW A PUNISHABLE OFFENCE
15/12/2014

LITTERING RAILWAY PREMISES IS NOW A PUNISHABLE OFFENCE

05/11/2014
05/11/2014
05/11/2014

must watch...!!!

04/11/2014

जाणून घ्या डेंग्युची कारणे, लक्षणे व उपाय: ग्रामीण भागात गाव,वाडी, वस्तीवर सध्या डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहे . त्याचे खापर महापालिका व आरोग्यविभाग, प्रशासनावर फोडले जात आहे. मात्र, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शहरासाठी गावासाठी आपलीही काही जबाबदारी आहे. वेळीच उपाययोजना केल्यास त्यावर मात करणे शक्य आहे. त्यासाठी जाणून घ्या नेमके डेंग्यु म्हणजे काय, त्यामागची कारणे व उपाय...

>> ही आहेत कारणे
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा आजार विशिष्ट विषाणूंमुळे होतो. डेंग्युचा प्रसार "एडीस एजिप्टाय" नावाच्या डासापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. यामध्ये प्रामुख्याने इमारतीच्या, सिमेंटच्या टाक्यांमधील, रांजणामधील पाणी तसेच प्लास्टिकच्या बादल्या, रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, निरुपयोगी टायर्स, कुलर आदींमध्ये साठलेल्या पाण्यावर या डासांची उत्पत्ती होते.

>> डेंग्युचा डास कसा ओळखाल ?
हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ सेंटीमीटर असते, या डांसाची मादी डेंग्यू रुग्णाला चावल्यानंतर ती पुन्हा निरोगी व्यक्तीला चावते व निरोगी व्यक्तीला डेंग्यु होतो या प्रकारे या रोगाचा प्रसार होतो. साधारणपणे हे डास सकाळी अथवा संध्याकाळी चावते. जास्त दिवस पाणी साठलेले असल्यास त्यात हे डास(स्वच्छ पाण्यात)अंडी घालतात.एक डास एका वेळी दिडशे ते दोनशे अंडी घालतो त्यातून "एडीस एजिप्टाय"चा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो.

आपण हे करावे> कोरडा दिवस पाळावा , कोरडा दिवस म्हणजे आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे रिकामे करावेत उदा> रांजण, माठ, हौद , टाकी व इतर हे पाण्याचे साठे घासून पुसून कोरडे करून तीन चार तासा नंतर पाणी भरावे त्यामुळे डासाची उत्पत्ती होणार नाही.
>> ही आहेत लक्षणे
"एडीस एजिप्टाय" डासाच्या संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर डेंग्युची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) अशा दोन प्रकारे हा आजार फैलावतो. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी , अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. याखेरीज एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, चव आणि भूक नष्ट होणे, मळमळणे आणि उलट्या आदी लक्षणेही जाणवितात.

>> हे आहेत उपाय
@ ताप असेपर्यंत आराम करा
@ताप कमी होण्यासाठी ‘पेरासिटेमोल’ गोळ्या घ्या
@ ताप अथवा वेदनाशामक म्हणून अस्पिरीन अथवा आयबुप्रोफेन गोळ्या घेऊ नयेत
@ निर्जलिकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजिवनी)
@ रक्तस्त्राव किंवा शोकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे.
@ अंग पूर्णपणे झाकणारे कपडे घालावेत
@ मच्छरदाणी किंवा क्रीमचा वापर करावा
@ साठवलेले किंवा साचलेले पाणी बदलावे तसेच तुंबलेल्या गटारी वाहती करावीत तसेच खाली न करता येणार्‍या पाणी साठ्यात, उद > टाकी हौद यामध्ये गप्पी मासे सोडावेत
आपल्या घरी डेंग्यू ताप सर्वेक्षणसाठी येणार्‍या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करा व आपण आथवा इतर कोणीही अजारी असल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केद्रात संपर्क साधावा

01/11/2014
31/10/2014

मा. पंतप्रधानांनी 02 ऑक्टोबर २०१४ पासून देशव्यापी " स्वच्छ भारत अभियान" सुरु करण्याची घोषणा नुकतीच केली. संपूर्ण देशाच्या स्वच्छतेचे हे अभियान 02 ऑक्टोबर २०१९ पर्यंत म्हणजे महात्मा गांधीजींच्या एकशे पन्नासाव्या जयंती पर्यंत चालणार आहे.

महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत फक्त स्वतंत्र भारत नव्हता. तर स्वच्छ भारत, स्वावलंबी भारत आणि निरोगी भारत हे त्यांचे स्वप्न होते. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि हळूहळू सार्वजनिक स्वच्छतेचा आपल्याला विसर पडला. आपलं घर झाडून तो कचरा रस्त्यावर ,मोकळ्या जागेत किंवा इकडे तिकडे टाकून देणे हि आपण आपल्या पुरती स्वच्छतेची व्याख्या बनवली. परिणामतः जागोजागी साचलेला कचरा एक मोठी समस्या बनली. साथीचे रोग नियंत्रणात राहाण कठीण झालं. डेंगू मलेरियाने जागोजागी ठाण मांडल.
" माझ्या स्वप्नातला भारत " या त्यांच्या पुस्तकात महात्मा गांधीजी लिहितात " पाश्चीमात्यान कडून आपण एक अवश्य शिकू शकतो ते म्हणजे शहर सफाईचे शास्त्र, सार्वजनीक सफाईचे शास्त्र, सामुदायिक स्वच्छता आणि आरोग्याचे शास्त्र जे कि वयक्तिक स्वच्छतेच्या आणि परिसर स्वच्छतेच्या नियमांच्या काटेकोर पालनापासून सुरु होते. पाश्चीमात्यांच्या अनेक चांगल्या- वाईट गोष्टींचे आम्ही भारतीयांनी अनुकरण केले पण हे मात्र राहून गेले. केंद्र सरकारचे हे अभियान म्हणजे आपल्या साठी एक सुवर्ण संधी आहे. आपल्या मनाला ,शरीराला,घराला,परिसराला स्वच्छ बनवण्यासाठी पाऊल उचलण्याची.
एखादे मोठे अभियान यशस्वी तेव्हाच होते जेव्हा लोक मनापासून त्यात सहभाग नोंदवतात. मनाची हि तयारी होण्यासाठी हि शपथ.
"मी स्वतः स्वच्छतेच्या प्रती सतर्क राहीन आणि त्यासाठी वेळ देईन.
मी वर्षभरात १०० तास म्हणजे प्रत्येक आठवड्यात दोन तास स्वच्छतेसाठी श्रमदान करीन.
मी अस्वच्छता करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही.
मी स्वच्छतेची सुरवात स्वतः पासून माझ्या परिवारापासून ,माझी गल्ली माझ्या कामाच्या ठिकाणापासून करीन "

31/10/2014

घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. यातले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान असल्यामुळे निर्माण होत असतात. याबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती करणे महत्त्वाचे आहे. परिसर स्वच्छतेचे महत्त्व हे जाणून घेत असतानाच अस्वच्छतेमुळे अनेक रोग आजार होतात हे लक्षात येते.
परिसर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची आहे/ या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. वैयक्तिक स्वच्छते इतकेच परिसर स्वच्छतेला महत्त्व आहे. आपले घर व त्याचा परिसर स्वच्छ ठेवले तरच आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६०% आजार किंवा रोग सुरक्षित/ शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात. विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी, प्रदूषित परिसरच प्रतिकूल परिणाम करतो. परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे...

31/10/2014

जाहीर आवाहन कामठी शहरातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव / दुर्गा उत्सव मंडळ युवा मंडळ व सेवाभावी संस्था यांना नगर परिषद कामठी तर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की,दि.१ नोव्हेंबर २०१४ रोजी होणाऱ्या "स्वच्छ भारत " अभियाना मध्ये सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ करावा . अभियाना अंतर्गत केलेल्या सफाईचे फोटो "Mazi Kamptee Swachha Kamptee" ya facebook पेज वर अपलोड करावेत . किंवा ८६००३८०८५७ या मोबाईल नंबर वर whatsap द्वारे पाठवावेत. मुख्याधिकारी कामठी

Address

NH 7 Near Bus Stand Square Kamptee Nagar Parishad
Kamptee
441002

Telephone

+918600380857

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mazi Kamptee Swachha Kamptee posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mazi Kamptee Swachha Kamptee:

Share