SatvikJ

SatvikJ Satvik Knowledge

आज गुलाब दिवस म्हणून जुनी आठवण जागी झाली..! तू दिलेल्या गुलाबाची पाकळी-पाकळी जागी झाली..! म्हणून जपुन ठेवलेला तो गुलाब म...
07/02/2023

आज गुलाब दिवस म्हणून जुनी आठवण जागी झाली..!
तू दिलेल्या गुलाबाची पाकळी-पाकळी जागी झाली..!
म्हणून जपुन ठेवलेला तो गुलाब मी आज अलगद बाहेर काढला..!
बघताच जाणिव झाली आत्ता त्याच्यातील सुगंधच हरवला होता..!
पण गुलाबाचे काटे मात्र टोचण्यागत बनले होते..!

07/01/2023

*नं.. त..र ...?*

'नंतर' ने 'अंतर' वाढते...

आत्ताच दिवस सुरू झाला आणि ...
बघता बघता संध्याकाळ सुघ्दा होण्यास आली ...

सोमवार होता असे वाटत होते...
आणि शनिवार आलासुद्धा...
.. महिना संपत आला,.. वर्ष संपायला आले,.. वयाची ४०, ५०, ६० वर्षे केव्हां निघून गेली, हे कळलेच नाही..... आपले आई-वडील, आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले...
मग समजेना... आता मागे कसे फिरायचे?

जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे, त्याचा पूर्ण फायदा करून घ्या...

आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...
आपल्या आयुष्यात रंग भरा ...
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या ...
हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करा ...

उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका..... हे नंतर करीन,.. हे नंतर सांगीन,.. यावर नंतर विचार करीन,...

'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे?

आपण हे समजून घेत नाही की...
चहा थंड झाल्यानंतर ...
प्राधान्य बदलल्यानंतर ...
उत्साह निघून गेल्यानंतर...
आरोग्य बिघडल्यानंतर ...
मुले वयात आल्यानंतर ...
आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...
आश्वासन न पाळल्यानंतर...
दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
आयुष्य संपल्यानंतर .....आपल्याला कळते.....अरे बापरे!! उशीरच झाला की ...

म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका.

'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात.

दिवस आजचा ...
आणि क्षण आत्ताचा ...

आजची गोष्ट उद्यावर ढकलणे... आपल्याला झेपणारे नाही... कारण आता आपले वय उतरणीस लागले आहे...

बघू या की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोहोचवीत आहे?

कारण...
हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ..... तर कदाचित तो पुढे कधीच पाठविला जाणार नाही...

जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंत सुद्धा हा संदेश पोहचवा...

सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा...
🌹🙏

Last sunset in 2022.मावळत्या सूर्यासोबत सर्वांच्या आयुष्यातील अहंकार दूर होवो.आणि नवीन वर्षातील येणार प्रत्येक क्षण प्रत...
31/12/2022

Last sunset in 2022.
मावळत्या सूर्यासोबत सर्वांच्या आयुष्यातील अहंकार दूर होवो.
आणि नवीन वर्षातील येणार प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा सर्वांसाठी सुखाचा जावो.
सरत्या वर्षातील काही कडू गोड आठवणींचा ठेवा मनात जपून नव्या वर्षाचं स्वागत करूया.🙏🏻Happy New Year to All🎊

12/11/2022

आमचा सुपरहिरो🙏

प्रेम म्हणजे काय? वासना म्हणजे काय? किशोर वयात आल्यानंतर मुला  मुलींमध्ये कोणकोणते बदल होतात. पती-पत्नी संबंधांमध्ये असम...
20/10/2022

प्रेम म्हणजे काय? वासना म्हणजे काय? किशोर वयात आल्यानंतर मुला मुलींमध्ये कोणकोणते बदल होतात. पती-पत्नी संबंधांमध्ये असमाधानी राहण्याची कारणे काय आहेत. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आणि आपल्या प्रजनन संस्थेची सखोल माहिती देणारे पुस्तक मी लिहिले आहे.

शरीर प्रेम आणि वासना. हे पुस्तक तुम्ही Amazon Kindle var प्रकाशित केले आहे. सर्व वाचकांनी ते वाचून मला पुस्तकात दिलेल्या contact वर रिव्ह्यू द्यावा अशी नम्र विनंती.

पुस्तकाची ॲमेझॉन लिंक खाली दिली आहे, कृपया पुस्तकाचा आस्वाद घ्या आणि मला कळवा! .

शरीर, प्रेम आणि वासना: प्रेम आणि वासनातील फरक. (Marathi Edition)

शरीर, प्रेम आणि वासना: प्रेम आणि वासनातील फरक. (Marathi Edition) eBook : JADHAV, KAVITA, JAGTAP, MONIKA: Amazon.in: Kindle Store

20/09/2022

प्रियकर आणि प्रियसी मधील प्रेम :

कवी, लेखक आणि शायर लोकांनी या विषयी खूप सारे लिहून ठेवले आहे. खूप मोठ्या लेखांमध्ये जे सांगता येणार नाही ते एखादी चारोळी सांगून जाते. अशीच एक चारोळी मला इथे आठवते. शायद कोण आहे माहित नाही.
ना उसने कैद रख्खा।
और ना हमे उडणे की आरजू हुई।
खऱ्या प्रेमाचा अर्थ यापेक्षा वेगळा काय असू शकतो ?
वरील चारोळी संदर्भात मला एक छानशी प्रेम कथा सांगवी असे वाटते आहे.
एका युवतीला बाजारात फिरता फिरता तिला पिंजऱ्यात एक छानस पाखरू दिसलं. तिने ते पाखरू पिंजऱ्यासहित विकत घेतलं. घरी आणून तो पिंजरा छान बाल्कनी मध्ये लावला.
आता रोज ती त्या पाखराची काळजी घेऊ लागली. रोज त्या पाखराला खाऊ पिऊ घालू लागली. कारण तिला ते पाखरू खूप आवडू लागलं होतं.
पण तिच्या लक्षात यायला लागलं, की ते पाखरू खुश नाहीये, आपण त्याला एवढं सगळं देतोय पण त्याला हे सगळं बहुतेक नको असावा.
त्याच्या डोळ्यात तिला आकाशाची ओढ दिसू लागली, आता तिला त्या पाखराचे मन कळू लागलं होतं.
त्या पाखराच्या सहवासात राहून ती त्या पाखराच्या प्रेमात पडली होती. ते पाखरू फक्त शरीराने आपल्या जवळ आहे मनाने नाही याची जाणीव तिला झाली. मग त्या दिवशी तिने पाखराला आपल्या हातावर घेतल आणि हवेत सोडून दिला. ते पाखरू आकाशात उडून गेलं.
पाखरू आपल्यापासून लांब राहिला तरी चालेल पण आनंदी राहावं हीच तिची भावना होती. तिला त्या पाखराची सवय झाली होती. तिला त्या पाखरा शिवाय दिवसभर करमला नाही, पण तिला तिच्या कृतीचा पश्चाताप नव्हता. तिच्या आवडीपेक्षा तिला त्या पाखराचं स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं वाटू लागलं होतं.
रात्र झाली आणि ते पाखरू परत घरी आले, कारण आता ते पाखरू पण तिच्या प्रेमात पडलो होतो. तिला खूप आनंद झाला तिने त्याला खाऊ पिऊ घातलं.
दुसऱ्या दिवशी तिने त्या पिंजऱ्याचा दरवाजा काढून टाकला. पाखरांसाठी ही एक सांकेतिक कोण होती की ते आता स्वातंत्र्य आहे. त्याला जेव्हा हवं तेव्हा ते आकाशात उडून जाऊ शकतात, आणि हवं तेव्हा ते पिंजऱ्यात येऊ शकतात.
पण त्यानंतर ते पाखरू कधीच पिंजरा सोडून उडून गेलं नाही.
ना उसने कैद रख्खा।
और ना हमे उडणे की आरजू हुई।

जेव्हा तुम्हाला एखादं फुल आवडतं तेव्हा तुम्ही ते तोडून घेता, पण जेव्हा तुम्ही त्या फुलावर प्रेम करायला काय तेव्हा तुम्ही त्या मुलाच्या झाडाला रोज पाणी घालू लागतात. खऱ्या प्रेमाची कळी ही हळुवार उमळते, कळीचे जेव्हा फुलांमध्ये रूपांतर होते तेव्हा तुम्हाला उन्हातही मग सावली सारखे वाटते. वेदनेतही तुम्हाला हसू येते. प्रेमा विना सारेच फ़ीके आनंदाचे क्षणही मुके म्हणूनच प्रेमाला फुलवायचे असते. प्रेमाला फुलासारखे जपायचे असते आणि त्या फुलाच्या सुगंधातून आपले जीवन सुगंधी करायचे असते.
आता राहिला प्रश्न की असं प्रेम प्रत्येक व्यक्तीला मिळेल का ?
तर माहित नाही मिळेल का नाही ते, पण आपण तरी एखाद्या व्यक्तीवर असं प्रेम नक्कीच करू शकतो.

एखाद्या व्यक्तीवर नीस्वार्थ प्रेम करण्या आधी आपण त्या योग्यतेचे असले पाहिजे किंवा आपण आपली क्षमता विकसित केली पाहिजे. एखादी प्रौढ व्यक्ती शिक्षणाने, विचाराने, आर्थिक दृष्ट्या ने स्वावलंबी असेल आणि ही व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या व आपल्या शारीरिक क्षमतेचा, गरजांचा, वर्तमान चा विचार करण्यायोग्य सक्षम असेल तर ती व्यक्ती प्रेम विवाह किंवा प्रेमाच्या भानगडीत पडू शकते.

आज काल शाळा कॉलेजातील मुलं एकमेकांना बघता क्षणी प्रेमात पडतात. मग अभ्यासाच्या पुस्तकात तिचं किंवा त्याचं रूप दिसायला लागतं, जागेपण प्रेमाचे स्वप्न पडायला लागतात. ज्या वयात शिकायचं असतं त्या वयात मग भलत्याच भानगडी घडतात. मुला मुलींच्या डोक्याचा ताप वाढतो, अभ्यासाचा आणि करिअरचा सत्यानाश होतो आणि मग आयुष्याचं वाटोळ होतं.
अशी व्यक्ती मग ना प्रेम करण्याच्या लायकीची राहते न प्रेम मिळवण्याच्या. त्या व्यक्तीचा मग प्रेमावरचा विश्वास उडून जातो. त्या व्यक्तीच्या दृष्टीने मग स्त्री पुरुष संबंध हे उपभोगाची गोष्ट म्हणून राहून जाते. पुढे ती व्यक्ती ती गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल करते. एखादी अल्पवयीन पण लग्न योग्य व्यक्ती जर स्वतःच्या निर्णय ठामपणे घेऊ शकत नसेल, स्वतःच्या शारीरिक गरजांचा बाबत अनुभिग्न असेल, आर्थिक रित्या स्वावलंबी नसेल, विचाराने प्रगल्भ नसेल अशी व्यक्ती जर चुकीच्या वेळेस प्रेमाच्या मार्गावर चालू लागली तर विनाश काळे विपरीत बुद्धी असेच म्हणता येईल.

स्वतःवर प्रेम: स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय तर स्वतःची आर्थिक बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मेहनत घेणे. प्रेमाची सुरुवात ही स्वतःपासून करायला हवी. जगाची गती ही आपल्यापेक्षा जास्त आहे. त्या स्पर्धेत आपली दमछाक होणार हे निश्चित. अशा वेळेस या सगळ्या एकच गोष्ट अशी आहे की ती आपल्याला आत्मविश्वासाने जगायला शिकू शकते, तुम्हाला स्पर्धेत टिकून ठेवू शकते ती म्हणजे, तुमचे स्वतः वर प्रेम असणे. एरवी आपण स्वतःला बाजूला सारत इतरांचा अधिक विचार करतो, आता स्वतः चा विचार करायची हीच ती वेळ आहे, असे समजून वागायला सुरुवात करायला हवी. ज्याप्रमाणे आपण प्रियसीला आनंदी ठेवण्यासाठी मेहनत घेतो, प्रयत्न करतो त्याचप्रमाणे आपण स्वतःसाठी ही तेवढीच मेहनत घ्यायला हवी. स्वतःवर प्रेम करून आपण स्वतःला एक उत्कृष्ट स्थानावर नेऊन पोहोचवल्यानंतरच आपण इतरांना प्रेम देण्या योग्य बनतो. इतरांवर अपरिपक्व प्रेम करण्यापेक्षा आधी स्वतः वर प्रेम करा आणि स्वतःला एक परिपक व्यक्ती म्हणून सिद्ध करा. एक परिपक्व व्यक्तीच इतरांवर निस्वार्थ प्रेम करू शकतो. इतरांवर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या वर एक दिवस अमाप प्रेमाचा वर्षाव होतो, अशी माझी धारणा आहे.

13/07/2022

Address

KANPUR
Kanpur
208016

Telephone

08975998635

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SatvikJ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SatvikJ:

Share

Category