Blood Donar Satara

Blood Donar Satara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Blood Donar Satara, Social service, Karad.

आज अचानक आलेल्या स्पंदन हॉस्पिटल कराड येथील B निगेटिव्ह रक्ताच्या पोस्ट साठी आपल्या संस्थेचे आदर्श मार्गदर्शक *श्री.राजू...
18/04/2024

आज अचानक आलेल्या स्पंदन हॉस्पिटल कराड येथील B निगेटिव्ह रक्ताच्या पोस्ट साठी आपल्या संस्थेचे आदर्श मार्गदर्शक *श्री.राजू गुरव* साहेब यांनी *महालक्ष्मी ब्लड सेंटर कराड* येथे रक्तदान केले.
आभार मानून आम्ही आपले कार्य लहान करणार नाही.कारण आपले कार्य हे या परिवारातील सर्व सदस्यांना एक शिकवण आहे.की ज्याला समाजासाठी काहीतरी मदत असेल,किंवा अडचणीच्या वेळी रक्त देणं असेल ज्याला हे करायचं आहे तो कोणतेही कारण देत बसत नाही..🙏🏻🙏🏻 सगळ्यात महत्वाचे म्हणजे गुरव साहेबाना आम्ही आज सकाळी 9 वाजता फोन करून रक्त लागणार असल्याचे कळवले होते.त्यातूनही त्यांनी त्यांच्या ऑफिस च्या वेळेची धावपळ मॅनेज करून *पाटण वरून कराड* येथे येऊन *रक्तदान* केले.*गुरव साहेब* आणि आपल्याला नेहमी सहकार्य करणारी आपली हक्काची *महालक्ष्मी ब्लड बँक कराड* यांनी केलेले सहकार्य हे खूप मोलाचे आहे.यासाठी आम्ही *ब्लड डोनर सातारा* परिवार आपले सदैव ऋणी राहू...
*ब्लड डोनर सातारा.🩸🩸*

🏆 ब्लड डोनर सातारा 🏆 आजची केस अनोखी गेली 3 दिवस झाले एका पेशंट ला  A-  हवे होते ते कित्येक रक्तदाते बंधू ना फोन करत होते...
26/09/2022

🏆 ब्लड डोनर सातारा 🏆
आजची केस अनोखी गेली 3 दिवस झाले एका पेशंट ला A- हवे होते ते कित्येक रक्तदाते बंधू ना फोन करत होते पण काही कारणास्तव आले नाहीत अश्या मध्ये आज 2 वाजता आपले हुकमी एक्का असणारे शिंदे साहेब सातारा यांना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास फोन आला त्यावेळी ते दुर्गामाता मंडळामध्ये कार्यकर्त्या सोबत काम करीत होते ते सोडून सातारा हुन कराड ला आले साहेब तुमच्या कार्याला तोडच नाही रक्तदान काय असते ते तुमच्या कडून शिकावे जय हो 🙏आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना🙏🎂🚩🤝

💞 ब्लड डोनर सातारा 💞 💘 SDP 💓जिंदाबाद 💘 सर्वत्र डेंगू ने हाहाकार माजला आहे डॉ बोलतात साथ आहे यावर एकमेव पर्याय प्लेटलेट्स...
22/09/2022

💞 ब्लड डोनर सातारा 💞
💘 SDP 💓जिंदाबाद 💘
सर्वत्र डेंगू ने हाहाकार माजला आहे डॉ बोलतात साथ आहे यावर एकमेव पर्याय प्लेटलेट्स आजच्या या घडीला प्लेटलेट्स देणारे देवमाणूस कारण नवीन कार्यकर्ते तयार होत नाहीत जे देतात त्यांचे खरंच मानावे तेवढे आभार कमीच आज आपले मार्गदर्शक असणारे गुरसाळे साहेब यांनी प्लेटलेट्स देऊन मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल अभिनंदन आपल्या सारखे गुरुजन असल्यावरती डेंगू नक्कीच पळ काढणार हेही तितकेच खरे साहेब 100 तोफांची सलामी🙏🎪🥈🌸

🙏 *ब्लड डोनर सातारा* 🙏      आज आलेल्या कृष्णा हॉस्पिटल येथील डिलिव्हरी पेशंट च्या पोस्ट साठी आपल्या परिवारातील सदस्य *श्...
17/09/2022

🙏 *ब्लड डोनर सातारा* 🙏
आज आलेल्या कृष्णा हॉस्पिटल येथील डिलिव्हरी पेशंट च्या पोस्ट साठी आपल्या परिवारातील सदस्य *श्री.सागर दादा* यांनी रक्तदान केले.दादांनी परवाच तीन महिने पूर्ण झाल्याचे ग्रुप वर कळवले होते,आणि गरज असल्यास कळविण्यास ही सांगितले होते,दादांसारख्या विचारांची समाजाला खरंच खूप गरज आहे,सागर दादा आपण आमच्या एका कॉल वर रक्तदान करण्यासाठी हजर झाला,खर तर या पोस्ट साठी आम्हाला आर्मी मधील एका जवानाचा कॉल आलेला की,आमच्या मित्रासाठी काहीतरी मदत करा,त्यांच्या ओळखीचे कराड येथे कोणी नाही.सागर दादा आपण केलेल्या योगदानासाठी ब्लड डोनर सातारा परिवार कडून आम्ही आपले आभार मानतो, आपणास व आपल्या कुटुंबास उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏ब्लड डोनर सातारा आपले सदैव ऋणी राहील🙏🙏🙏आजची पोस्ट अय्याज साहेबांच्या पुढाकाराने पूर्ण झाली आहे त्यामुळे त्यांचे ही मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद💘🩸

💞 ब्लड डोनर सातारा 💞 काल एक फोन आला कृष्णा हॉस्पिटल मध्ये 19 वर्ष असणारी मुलगी आहे तिच्या दोन्ही किडन्या फेल आहेत त्यामु...
24/06/2022

💞 ब्लड डोनर सातारा 💞
काल एक फोन आला कृष्णा हॉस्पिटल मध्ये 19 वर्ष असणारी मुलगी आहे तिच्या दोन्ही किडन्या फेल आहेत त्यामुळे रक्त द्यावे लागले यासाठी आपले प्लेटलेट्स ला नेहमी अग्रेसर असणारे संकल्प दादा यांनी आज ग्रुप वरचा मेसेज वाचुन रिप्लाय दिला दादांच्या या कार्याला सलाम🙏🌹💓 असा वाईट प्रसंग कुणावर येऊ नये त्यात परिस्थिती गरीब मुलीचे वडील मुंबई ला असतात पण कोरोना मुळे नोकरी ही गेली होती सध्या गावी असतात आता तर दुःखाचा डोंगर उभा फोन वरती बोलले त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून आले कोण आर्थिक मदत करतील का जर कोणाला शक्य असेल तर बगा नं पाठवू त्यांचा कारण कालच्या ही पोस्ट म्हणावा तसा रिस्पॉन्स आलेला नाही त्यामुळे त्यांना बोललो जर शक्य झाले तर नक्कीच देऊ 🙏🤝

💞 ब्लड डोनर सातारा 💞🥁 SDP जय हो🍬 प्लेटलेट्स ची केस कधी येईल याचा अंदाज ही करू शकत नाही अशीच आजची केस आपले हुकमी एक्का अस...
29/04/2022

💞 ब्लड डोनर सातारा 💞
🥁 SDP जय हो🍬 प्लेटलेट्स ची केस कधी येईल याचा अंदाज ही करू शकत नाही अशीच आजची केस आपले हुकमी एक्का असणारे दीपक दादांनी सकाळी 7 वाजता SDP दिल्या आजपर्यंत आपल्या परिवार मधील बरेच दादांनी रात्री 1 ला सुद्धा दिल्या पण एवढ्या सकाळी प्लेटलेट्स देणारी व्यक्ती पहिलीच तेही दीपक दादा यांचे मानावे तेवढे आभार कमीच दादासाहेब मनापासून आभार आणि धन्यवाद🙏🙏🍦🥈🎪

💘ब्लड डोनर सातारा 💘श्री दिपक पाटील आणि रक्तपरीवार व बापूजी रामचंद्र देव ट्रस्ट आणि चर्मकार समाज विठ्ठल  रखुमाई मंदिर  ट्...
15/02/2022

💘ब्लड डोनर सातारा 💘
श्री दिपक पाटील आणि रक्तपरीवार व बापूजी रामचंद्र देव ट्रस्ट आणि चर्मकार समाज विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट कराड यांच्या सहयुक्त विद्यमाने आज भव्य रक्तदान सोहळा पार पडला यामध्ये आपल्या परिवार मधील दिपक साहेब, सुनील दादा,आणि मंदार साहेब हे दिग्गज कार्यकर्ते आपल्याला लाभले हे आपले भाग्यच कारण महालक्ष्मी ब्लड बँक मध्ये रक्ताचा पुरवठा करण्यासाठी हा सर्व खटाटोप कारण या बँक ने आजपर्यंत भरपूर साथ दिली त्यामुळे या दादा लोकांनी पुढाकार घेऊन शिबीर यशस्वीपणे पार पाडले यामध्ये दिग्गज रक्तदाते गुरू ,बंधू आणि भगिनींना मानाचा मुजरा अश्या प्रकारे 36 रक्तदाते नी रक्तदान करून मोलाचे योगदान दिले त्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद इथून पुढे जर 3 महिन्याला आपले थोरले बंधू शिबिर घेणार आहेत 🩸😊👑🍬🏆🤝💓🙏🌹🍦🍰

💪 ब्लड  डोनर सातारा 💪💞 SDP  जिंदाबाद  💞आमचे मार्गदर्शक  नेहमी माझा नं  कधी येणार दुसऱ्या दादा लोकांचा फोटो पाहिला की मला...
20/09/2021

💪 ब्लड डोनर सातारा 💪
💞 SDP जिंदाबाद 💞
आमचे मार्गदर्शक नेहमी माझा नं कधी येणार दुसऱ्या दादा लोकांचा फोटो पाहिला की मला डावलताय असे नेहमी बोलणारे गुरसाळे साहेब यांनी आज प्लेटलेट्स डोनेशन केले एका डेंगू पेशंट ला अर्जंट प्लेटलेट्स हव्या होत्या या साहेबांनी वेळात वेळ काढून हजेरी लावली तेही दिवसा नाहीतर नेहमी रात्री 11 नं त्यांची वेळ असते या साहेबांनी रक्तदान क्षेत्र मागे ठेऊन प्लेटलेट्स ला मान्यता दिली कारण त्यांना माहिती आहे प्लेटलेट्स ला सहजासहजी नवीन कार्यकर्ते तयार होत नाहीत असे आपल्या परिवार मध्ये दिग्गज साहेब लोक आहेत ही गोस्ट अभिमानास्पद आहे साहेबांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद🤝🙏🍔🍬🥇

🏆 ब्लड डोनर सातारा 🏆💘 SDP जिंदाबाद 💘💞आज गणेश चतुर्थी सर्वांची लगबग सुरू आहे यातच एक अर्जंट डेंगू पेशंट ची केस घरी गणपती ...
10/09/2021

🏆 ब्लड डोनर सातारा 🏆
💘 SDP जिंदाबाद 💘💞
आज गणेश चतुर्थी सर्वांची लगबग सुरू आहे यातच एक अर्जंट डेंगू पेशंट ची केस घरी गणपती बसवायची धावपळ त्यातच ब्लड बँक मधून फोन तेही आपले मार्गदर्शन करणारे राजेश साहेब यांना गेला आरास मागे ठेऊन पाहिले कर्तव्य समाजसेवा या असे मानणारे राजेश साहेब यांनी आज प्लेटलेट्स डोनेशन केले यातच कळते की आपल्या परिवार मधील कार्यकर्ते किती मोठे समाजसेवक आहेत याया कार्याला 100 तोफांची सलामी🙏🙏🥇👑🕺🤝💎
👏गणपती बाप्पा मोरया👏

💘 ब्लड डोनर सातारा 💘💪SDP 💪जिंदाबाद  सुट्टी नाय👍 गो कोरोना तसे गो डेंगू अशी बोलायची वेळ आली आहे सर्वत्र डेंगू चा हाहाकार ...
26/08/2021

💘 ब्लड डोनर सातारा 💘
💪SDP 💪जिंदाबाद
सुट्टी नाय👍 गो कोरोना तसे गो डेंगू अशी बोलायची वेळ आली आहे सर्वत्र डेंगू चा हाहाकार त्यामुळे प्लेटलेट्स ला वाढती मागणी पण आपल्या परिवार मध्ये दिग्गज दादा लोक असल्यावर टेन्शन से कामच नाही आज आमचे थोरले बंधू राहुल दादांनी प्लेटलेट्स दान करून मोलाचे योगदान दिले याया दादांची ड्युटी पुणे मध्ये असल्या कारणाने वेळ देता येत नव्हता पण याअगोदर कराड मध्ये होते त्यावेळी जर 15 दिवसाला SDP साठी हजर आता कराड ला बदली झाली त्यामुळे आता अजून जोमाने प्लेटलेट्स साठी सज्ज 💎🏆एक एक हिरे आहेत त्यांचे बद्दल बोलावे तेवढे थोडेच👏आज सातारा मध्ये महेश दादांनी A- डोनेशन केले हे त्यांचे 15 वे होते आणि राहुल दादांनी आज रक्तदान व प्लेटलेट्स मिळून 39 वेळा डोनेशन केले दोन्ही दादांच्या या कार्याला सलाम🙏🥳🥇🥇🍔याबरोबरच आपले कोल्हापूर थोरले बंधू असिफ भैया यांना कोल्हापूर ची एक पोस्ट होती SDP ची पण ती O+ होती आणि यांचा A+ तरीही ते तिथे गेले विनंती केली माझे घ्या आणि दुसऱ्या कोणत्या तरी पेशंट द्या पण घ्या बरेच दिवस झालेत डोनेशन करून पण त्या डॉ घेतलेच नाही भैया साहेब नाराज झालेत त्यांनी मागील वेळी कराड येऊन SDP दिली आहे त्यांचा नं कधी येतोय ते वाटच पहात असतात ही किमया काय आहे ते आजपर्यंत समजले नाही की प्लेटलेट्स साठी एवढी अतुरता आपल्या परिवार मध्ये आहे ही बाब अभिमानास्पद आहे असेच सामाजिक कार्यकर्ते मिळोत ही प्रार्थना🍦🕺🌹💞👏

🏆 ब्लड डोनर सातारा 🏆 जय हो👑 SDP जिंदाबाद 👑आमचे मार्गदर्शक असणारे गुरसाळे साहेब 24 तास अविरत पणे समाजसेवेच्या स्वाधीन करण...
25/08/2021

🏆 ब्लड डोनर सातारा 🏆
जय हो👑 SDP जिंदाबाद 👑
आमचे मार्गदर्शक असणारे गुरसाळे साहेब 24 तास अविरत पणे समाजसेवेच्या स्वाधीन करणारे रात्री अपरात्री मदतीला धावून येणारे असे साहेब आपल्या परिवार मध्ये असल्यावर डेंगू पेशंट नक्कीच वाचणार साहेबांनी आज प्लेटलेट्स दान करून मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद🙏💘😊🍔💪👌💎 असे हिरे आहेत म्हणून तर आपला परिवार अविरतपणे कार्य करत आहे नाहीतर कधीच ग्रुप बंद करावा लागला असता कारण सध्या रक्तदान क्षेत्रात कार्यरत असलेली संख्या कमी आहेत आणि शिबिर ही होत नाहीत तरी गणपती उत्सव मध्ये तरी रक्तदान शिबिर व्हावेत ही नम्र विनंती जर कोण घेणार असतील तर जरूर कळवावे कारण त्याच वेळी बरेच ठिकाणी शिबिर होत असतात त्यावेळी ब्लड बँक च्या तारखा मिळणे कठीण होते म्हणून अगोदरच कळवावे 🙏💞

*Blood donor Satara* B+veKrishna hospital delivery patient साठी डोनर लागणार होता अय्याज भैय्या वडगाव यांचे मित्रवर्य साग...
15/08/2021

*Blood donor Satara*

B+ve
Krishna hospital delivery patient साठी डोनर लागणार होता
अय्याज भैय्या वडगाव यांचे मित्रवर्य सागरदादा कदम यांनी फोन केला तर लगेचच ब्लड बॅंक मध्ये पोचले आणि रक्तदान केले आहे तिथेच स्पष्ट होते की *रक्तदान करण्याबाबत सजगता किती आहे ते!!!!!!!*

*सागरदादा* अत्यंत आभारी आहे न् *अय्याज भैय्यां* च्याही तत्परतेला सलाम

Address

Karad
415110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Blood Donar Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category