Ignited Minds

Ignited Minds Ignited Minds is a platform to share your positive thoughts, ideas & experiences for Dharma & Rashtra

30/08/2026

नेपाल के उत्तरी सीमावर्ती क्षेत्र में आयी भयंकर बाढ़ से प्रभावित सभी मृतकों के परिजनों एवं पीड़ित तथा घायलों के प्रति राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गहरी संवेदना प्रकट करता है। नेपाल में बुधवार को सुबह आए भीषण बाढ़ के कारण रसुवा, धादिङ्ग, नुवाकोट, चितवन और पूर्वी नवलपरासी ज़िले प्रभावित हुए हैं। इन जिलों में आए भीषण आपदा में हजारों लोग प्रभावित हुए हैं।
इस आपदा में पीड़ितों के सहयोग हेतु हम सभी तत्पर हैं तथा हर सम्भव सहायता प्रदान करने का प्रयास करेंगे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समस्त लोगों से अनुरोध करता है कि इस अप्रत्याशित स्थिति में हर संभव सहायता हेतु आगे आएं।

दत्तात्रेय होसबाले
सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

30/08/2026

Swami Vivekananda said that every nation has a message to deliver, a mission to accomplish, and a destiny to fulfil. Bharat is there to realise, and from time to time make the world realise this unity in diversity. - Dr. Mohan ji Bhagwat at

30/08/2026

39 states , 853 cities, 6000 delegates, 250+ students from various universities, 250 organisations from USA have all come together to celebrate at MSG NYC.

30/08/2026

संघ स्वयंसेवकांकडून कचरावेचकांना 'सामाजिक रक्षाबंधन'

पुणे, दि. २८ ऑगस्ट २०२६ :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेतर्फे ‘नव सह्याद्री स्वच्छता कोठी’ येथे सामाजिक समरसतेचा संदेश देणारा ‘सामाजिक रक्षाबंधन’ उपक्रम उत्साहात पार पडला. शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या कचरावेचक आणि सफाई कामगारांना संघ स्वयंसेवकांनी राख्या बांधून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या या स्वच्छतादूतांचा गौरव करणे आणि समाजात एकात्मतेची भावना दृढ करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या वेळी सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. "आम्ही सर्व स्वच्छतादूतांचे ऋणी असून, समाजातील प्रत्येक घटक हा एकाच कुटुंबाचा भाग आहे," असा संदेश या प्रसंगी देण्यात आला.

कार्यक्रमास उपस्थित असलेले निवृत्त विंग कमांडर अविनाश मुठाळ यांनी सफाई कामगारांच्या योगदानाचे कौतुक केले. ते म्हणाले, "नागरिकांचे उत्तम आरोग्य हे सफाई कर्मचाऱ्यांच्या नियमित कष्टांवर अवलंबून असते. रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून ती सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना राखी बांधणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते." या वेळी त्यांनी कचरावेचकांनी स्वतःच्या आरोग्याचीही योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात ‘पंच परिवर्तना’च्या माध्यमातून विविध सेवा प्रकल्प राबवले जात आहेत. 'सामाजिक रक्षाबंधना'च्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र जोडण्याचे कार्य संघ करत असल्याचे प्रतिपादन कर्वेनगर भाग संघचालक उदयन पाठक यांनी या वेळी केले.

या सोहळ्याला परिसरातील सुमारे ६० महिला व पुरुष सफाई कर्मचारी, व्यावसायिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी ज्येष्ठ स्वयंसेवक उल्हास सावळेकर, प्रा. विवेक मांडके, अरविंद करंबेळकर, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मनोज साकळे, कृष्णा धनगर, मनोज मोहिते, अमर कांबळे, दत्ता दोडके, ओंकार बेनकर, दीपक भोंडे, दत्तात्रय जगताप, निखिल भिसे, गौरव अडगळे, माजी नगरसेविका ॲड. मिताली सावळेकर, वेदांत गवळेकर आणि सह्याद्री प्रभात शाखेचे सह-शिक्षक प्रकाश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

30/08/2026
28/08/2026

श्रावण पौर्णिमा
रक्षाबंधनाच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

23/08/2026

विश्व संवाद केंद्र, पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक...

23/08/2026

माओवाद्यांच्या निशान्यावर आता विद्यार्थी चळवळी
- नक्षलवाद अभ्यासक राजीव रंजन प्रसाद यांचा इशारा ;
- देवर्षी नारद माध्यम पुरस्कारांचे वितरण उत्साहात संपन्न

पुणे, दि. २२ ऑगस्ट २०२६:

संवैधानिक लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी माओवाद्यांनी आजवर शेतकरी, कामगार आणि आदिवासींचा हत्यार म्हणून वापर केला. मात्र, हे घटक दूर झाल्यावर आता माओवाद्यांनी आपले लक्ष विद्यार्थी चळवळींकडे वळवले असून समाजाने याबाबत वेळीच सावध व्हावे, असा गंभीर इशारा नक्षलवादाचे अभ्यासक आणि बस्तरचे भूमिपुत्र राजीव रंजन प्रसाद यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या 'देवर्षी नारद माध्यम पुरस्कार' सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून प्रसाद बोलत होते.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये व्हीएसके पुणे फाउंडेशनचे विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) यांच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले. 'महाराष्ट्र टाईम्स'च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी यांना 'ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार', तर 'सकाळ'चे विशेष बातमीदार मयुरेश प्रभुणे आणि 'प्रभात'च्या वरिष्ठ बातमीदार अंजली खमितकर यांना 'आश्वासक पत्रकारिता पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तसेच सोशल मीडिया विभागात मोनेश शेलार यांना सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यात पुणे श्रमिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उमेश शेळके आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचाही विशेष सत्कार झाला. मंचावर व्हीएसकेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, डीईएसचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे आणि कार्यवाह आनंद काटीकर उपस्थित होते.

नक्षलवादाचा भीषण अनुभव मांडताना राजीव रंजन प्रसाद म्हणाले की, माओवादी विचारसरणी लोकशाही मार्गाने कधीही सत्तेवर येऊ शकत नाही. म्हणूनच बंदुकीच्या नळीतून सत्ता हस्तगत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी आदिवासींवर अमानुष अत्याचार केले, त्यांना विकासापासून दूर ठेवले आणि त्यांची मूळ संस्कृती नष्ट केली. जंगलातील नक्षलवाद ५० वर्षांनंतर आज घटला असला, तरी नागरी भागातील 'दिमागी नक्षलवाद' हे मोठे आव्हान ठरत आहे. शेतकरी व आदिवासींना माओवाद्यांचे खरे रूप समजल्याने त्यांनी या चळवळीला नकार दिला आहे. त्यामुळे आता आपली चळवळ जिवंत ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःची विचारसरणी आणि भूमिका इतिहासातील वास्तवाच्या आधारे पुन्हा तपासून पाहावी, असे आवाहन त्यांनी केले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना श्रीधर लोणी म्हणाले,"आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कमालीचे ध्रुवीकरण झाले आहे. पत्रकार आपल्या विचारांचा असेल तरच तो निष्पक्ष, असा सोयीस्कर समज पसरला आहे. परंतु, पत्रकाराने कोणत्याही छावणीत न राहता सर्वसामान्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. देशात आर्थिक प्रगती झाली असली तरी शिक्षण, आरोग्य आणि वाहतूक यांसारख्या मूलभूत सार्वजनिक सेवांचे खाजगीकरण होत आहे. परिणामी उत्पन्न वाढूनही सामान्य माणसाचे जगणे सुकर झालेले नाही.''

आपल्या भावना व्यक्त करताना अंजली खमितकर म्हणाल्या की, माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात मी अनेक स्थित्यंतरे पाहिली. धडाडीने काम केले म्हणूनच सुरक्षित कोषातून बाहेर पडता आले. डिजिटल युगातही मुद्रित माध्यमांवरील माझा विश्वास ठाम आहे, कारण आव्हाने पेलण्याची क्षमता असेल तर माध्यम कोणतेही असो, काम करता येते. मयुरेश प्रभुणे यांनी खंत व्यक्त करताना सांगितले,"समाजाप्रमाणेच प्रसारमाध्यमांमध्येही विज्ञानाला मुख्य धारेत स्थान मिळत नाही. ज्या दिवशी विज्ञान पत्रकारिता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मुख्य प्रवाहात येईल, त्याच दिवशी भारतीय समाज खऱ्या अर्थाने समृद्ध होईल." सोशल मीडियावरील आव्हानांवर बोलताना मोनेश शेलार म्हणाले की, सध्या इतिहासावर आणि वर्तमानावर वेगवेगळ्या विचारधारांचा प्रचंड भडीमार होत आहे. या गदारोळातून सत्य बाहेर काढून ते समाजासमोर निष्पक्षपणे मांडणे हे आजच्या डिजिटल माध्यमांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

प्रास्ताविकात अभय कुलकर्णी यांनी पत्रकारिता आणि माध्यमांच्या केंद्रस्थानी 'राष्ट्रीयत्व' असावे, या ध्येयाने विश्व संवाद केंद्र कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. तर ॲड. अशोक पलांडे यांनी माहितीच्या प्रचंड वेगात वाचकांपर्यंत अचूक आणि सत्य माहिती पोहोचवणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा काशिकर यांनी केले, तर आनंद काटीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
------------
फोटो ओळ
अम्फी थिएटर, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे : देवर्षी नारद माध्यम पुरस्कार वितरण सोहळा, यावेळी (डावीकडून) आनंद काटीकर, अॅड. अशोक पलांडे, मोनेश शेलार, मयुरेश प्रभुणे, राजीव रंजन प्रसाद, श्रीधर लोणी, अंजली खमितकर, अभय कुलकर्णी
------------

#नारदपुरस्कार

23/08/2026

JOIN RSS ला 'जेन-झी'चा प्रचंड प्रतिसाद..
👉🏼 ऑनलाइन नोंदणी अडीच पटीने वाढली...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाईन करण्यासाठी ६ महिन्यात १ लाख २३ हजार २८७ नागरिकांची नोंदणी..


Link https://www.rss.org/JoinRss_new/pages/joinrssInd.aspx

Address

Karad
415110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ignited Minds posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ignited Minds:

Shortcuts

Share

Category